Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

स्वराजच्या क्रांतीकारी कापणी तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद

पितमपूर, १४ डिसेंबर २०२३ – भारतातील पहिल्या, देशांतर्गत बनवण्यात आलेल्या कापणी यंत्राचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या विभागाने भारतीय...

शेफलर इंडियाने दुसऱ्या वार्षिक सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा केली 

·         १० प्रभावी कल्पनांची निवड करून त्यांचा पुढील विकास आणि इन्क्युबेशनसाठी पुरस्कृत करण्यात आले. ·         सर्वसमावेशक वृद्धी आणि विकास सक्षम करण्यासाठी सोशल इनोवेशनला प्रोत्साहन देणारा मंच.  पुणे १२ डिसेंबर, २०२३:  शेफलर इंडिया लिमिटेडने (बीएसई: ५०५७९०, एनएसई: SCHAEFFLER) आपला वार्षिक उपक्रम सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. च्या सहयोगाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम शेफलार इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत राबवण्यात येत आहे. समाजातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोवेशन्सना वाढवण्यासाठी, पाठिंबा देणे हा याचा उद्देश आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आणि शेफलरने समुदायांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतील अशा नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना चालना देण्याचे मिशन सुरु केले. पर्यावरणात्मक शाश्वततेपासून तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक उपाययोजनांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नावीन्य दर्शवणाऱ्या १० विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षीच्या १३० प्रवेशिकांमधून करण्यात आली. पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन अनोखे आहेत. सामाजिक नावीन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टिमला चालना देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पांमधून दिसून येते. पुरस्कारांसाठीच्या ज्युरीमध्ये शेफलर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पॅनलचा समावेश होता. शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम आणि शेफलर इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट - एचआर आणि हेड - सीएसआर श्री शंतनू घोषाल ज्युरीचे अध्यक्ष होते. करो संभवचे संस्थापक, प्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री. प्रांशू सिंघल हे देखील यावेळी उपस्थित होते.  शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम यांनी सांगितले, "समाजामध्ये सार्थक परिवर्तन घडवून आणेल अशा नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्राम सामाजिक प्रगतीप्रती आमची निष्ठा दर्शवतो. सहभागी झालेल्या सर्वांनी दाखवलेली हुशारी, कल्पकता आणि निर्धार याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे निवडण्यात आलेले प्रकल्प आपल्या काळातील सर्वाधिक गंभीर समस्यांचे निवारण करण्याची नाविन्यपूर्ण विचारांमध्ये असलेली क्षमता दर्शवतात. शेफलर इंडियामध्ये आम्ही शाश्वत, परिणामकारक बदल घडवून आणणाऱ्या अग्रणी कल्पनांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो." करो संभवचे संस्थापक श्री. प्रांशू सिंघल यांनी सांगितले, "शेफलर इंडियाच्या सोशल इनोवेशन फेलोशिप प्रोग्रामचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या माझ्या कामाशी हा प्रकल्प सुसंगत आहे. या सर्व विजेत्यांची कल्पकता आणि क्षमता आठवण करून देतात की नाविन्यपूर्ण विचारसरणी आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव निर्माण करू शकते. या सर्व फेलोजचे मनःपूर्वक अभिनंदन. इतक्या प्रभावी परिवर्तनाला चालना देण्याच्या शेफलर इंडियाच्या वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे देखील अभिनंदन करतो." विजेते: 1. कार्तिकज्योती एम आणि योगराज जोशुआ के – टॉक अ‍ॅली: एक नाविन्यपूर्ण हातमोजे उपकरण जे सांकेतिक भाषेचे बोलल्या जाणार्‍या भाषेत भाषांतर करते, कर्णबधिर व्यक्तींसाठी इतरांसोबत संवाद साधणे सुलभ करते. 2. निधी - नेमा एआय: ब्रेन स्कॅन तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याचे अनुभव वैयक्तिकृत करणारा अत्याधुनिक आरोग्य-एडटेक प्लॅटफॉर्म. 3. अविनाश यादव आणि अर्पित क्षीरसागर - इलेक्टिका: इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची कार्यक्षमता वाढवणारी क्रांतिकारी ईव्ही बॅटरी स्वॅपिंग सेवा. 4. ऐश्वर्या कर्नाटकी आणि परीक्षित सोहोनी - ग्लोवॅट्रिक्सस फिफ्थ सेन्स: रिअल-टाइममध्ये सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्यासाठी स्मार्टवॉच तंत्रज्ञान आणि हातमोजे एकत्र करणारे उपकरण. 5. वगीशा ठाकूर आणि सुब्रह्मण्य शास्त्री - थिंकगुड: लघु, मध्यम व्यवसाय आणि प्रभावशाली संस्थांसाठी ब्रँडिंग आणि संवाद धोरणे प्रदान करणारे डिजिटल व्यासपीठ. 6. शिवम बत्रा आणि नागेन प्रताप सिंग - सर्कुललिफ्ट: एआय आणि ऑटोमेशनद्वारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेला तंत्रज्ञान मंच. 7. वेंकट रमण मट्टपर्थी - ब्लू लोटस सोल्यूशन्स: हवामान बदलाविरोधात लढण्यासाठी शाश्वत उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 8. डॉ. सर्जेराव दोलताडे - लिकश्युअर: कॅव्हिटेशन तत्त्वांचा वापर करून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन. 9. अक्षय कावळे आणि अक्षय वैराळे- अॅग्रोश्युअर प्रॉडक्ट्स अँड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड: महिला व पुरुष दोघांनाही सहजपणे वापरता येतील अशी शेती उपकरणे आणून, शेतीमध्ये समावेशकता वाढवणे. 10. सिद्धेश साकोरे आणि स्वप्नाली ढवळे- अॅग्रो रेंजर्स: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कृषी वनीकरण मॉडेल्सची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत काम करणे. प्रत्येक विजेत्याला शेफलर इंडियाकडून मार्गदर्शन, नेटवर्किंग संधी आणि नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी फंडिंग या स्वरूपात मदत मिळेल. सर्व १० विजेत्यांना त्यांच्या उपाययोजना अधिक विकसित करता याव्यात आणि वाढवता याव्यात यासाठी मदत म्हणून भारतातील एक आघाडीचे बिझनेस स्कूल असलेल्या आयआयएम अहमदाबादच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन आणि एन्ट्रप्रिन्युअरशिपमध्ये तीस आठवड्यांची हायब्रिड मेंटॉरशिप मिळेल. सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामसह शेफलर इंडियाच्या सर्व सीएसआर उपक्रमांमधून कंपनीची शाश्वत विकासाप्रती बांधिलकी व जबाबदारीचे भान असलेले कॉर्पोरेट नागरिक म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित केली जाते. आपल्या या प्रयत्नांमधून शेफलर इंडिया आपल्या समुदायांच्या सामाजिक व आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देत आहे.

फेडेक्स ने IIT बॉम्बे आणि IIT मद्रासला USD10 दशलक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे

मुंबई, डिसेंबर 12, 2023 — फेडेक्स एक्सप्रेस (FedEx), FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक. या कंपनीने तंत्रज्ञान (IIT) बॉम्बे आणि मद्रास या...

टाटा पॉवर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांची भागीदारी:भारतभर ५०० पेक्षा जास्त वेगवान आणि अल्ट्रा-वेगवान ईव्ही चार्जिंग पॉईंट्स तैनात करणार

पुणे-११ डिसेंबर, २०२३:  टाटा पॉवर समूहातील एक कंपनी आणि आघाडीच्या ईव्ही चार्जिंग सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक, टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांच्या दरम्यान एक समझोता करार करण्यात आला आहे.  भारतभर वेगवान आणि अल्ट्रावेगवान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर आयओसीएलच्या विविध रिटेल आउटलेट्सच्या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल करणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, पुणे आणि कोची यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, सालेम-कोची हायवे, गुंटूर-चेन्नई हायवे आणि गोल्डन क्वाड्रीलॅटरल यासारख्या मोठ्या महामार्गांवर हे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले जातील. विविध शहरांदरम्यान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगचे विश्वसनीय आणि विशाल नेटवर्क उभारण्यावर ही धोरणात्मक भागीदारी लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करत असताना ईव्ही मालकांना रेन्जची चिंता करावी लागणार नाही. टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे हेड श्री. वीरेंद्र गोयल यांनी सांगितले, "देशात ईव्ही चार्जिंगचे विशाल नेटवर्क स्थापित करण्याच्या दृष्टीने आयओसीएलसोबत आमची भागीदारी हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आम्ही उचलत आहोत. आयओसीएलच्या विशाल उपस्थितीचा उपयोग करवून घेत टाटा पॉवर देशभरातील विविध प्रदेशांमध्ये वेगवान आणि अति वेगवान चार्जिंग पॉईंट्स उभारेल, त्यामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मोबिलिटी भवितव्य निर्माण करण्यासाठी पोहोच व समावेशकता यामध्ये योगदान दिले जाईल." तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नाविन्यपूर्ण सुविधा यांच्यामार्फत ईव्ही युजर्सना अधिकाधिक प्रगत अनुभव मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर वचनबद्ध आहे. टाटा पॉवर ईझेड चार्ज ऍप आणि इंडियनऑइल ई-चार्ज मोबाईल ऍप या दोन्हींमार्फत अगदी सहजपणे ईव्ही चार्जिंग करून घेण्याचा दुहेरी लाभ ईव्ही युजर्सना मिळवता येईल. या दोन्ही ऍप्सच्या साहाय्याने युजर्स आपल्या जवळचे व सोयीचे चार्जर्स शोधून ते बुक करू शकतील. इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याच्या वाढत्या ट्रेंडला अनुसरून उत्पादने, सेवासुविधा सादर करण्याची कॉर्पोरेशनची बांधिलकी अधोरेखित करत, आयओसीएलचे कार्यकारी संचालक (रिटेल-एनअँडई) श्री. सौमित्र श्रीवास्तव यांनी सांगितले, "ऊर्जा सुविधा आउटलेट्सना परिपूर्ण बनवण्यासाठी रिटेल नेटवर्कमध्ये परिवर्तन घडवून आणून २०२४ सालापर्यंत १०००० ईव्ही चार्जिंग स्टेशन्स पुरवण्याची आयओसीएलची योजना आहे. सध्या ६००० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग स्टेशन्स असून, आमची कंपनी स्वतःची पोहोच सातत्याने वाढवत आहे. टाटा पॉवरसोबत आमची धोरणात्मक भागीदारी या परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. या क्षेत्रातील आव्हानांना दूर सारून संधींचा लाभ घेण्यासाठी आयओसीएलमध्ये आम्ही सज्ज आहोत, ज्यामुळे अधिक पर्यावरणपूरक मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल सहजसाध्य होईल."समझोता करारावर स्वाक्षऱ्या करताना टाटा पॉवर आणि आयओसीएलच्या अधिकाऱ्यांबरोबरीनेच आयओसीएलचे रिटेल ट्रान्सफॉर्मेशनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. के नवीन चरण, मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे चीफ जनरल मॅनेजर श्री सौमित्र चक्रबोर्ती आणि टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंटचे हेड श्री वीरेंद्र गोयल उपस्थित होते. जवळपास ६०% इतक्या लक्षणीय बाजारपेठ हिस्सेदारीसह टाटा पॉवरने इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग क्षेत्रातील नेतृत्वस्थान पटकावले आहे. टाटा पॉवरचे संपूर्ण देशभरातील विशाल नेटवर्क ४२० शहरांमध्ये पसरलेले आहे, त्यामध्ये ६२००० पेक्षा जास्त होम चार्जर्स, ४९०० सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स तसेच ४३० बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, जी वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि देशभरात चार्जिंग सुविधा पोहोचवत आहेत. हे नेटवर्क सातत्याने वाढत असून संपूर्ण देशभरता इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगची पोहोच वाढवण्याप्रती टाटा पॉवरची अढळ निष्ठा दर्शवते.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सिक्युरिटी एक्स्पो आणि कॉन्फरन्स – IFSEC INDIA 2023 मध्ये नाविन्यपूर्ण ऑफरिंगसहसुरक्षा मानकांची केली पुर्नव्याख्या

·         ब्रँड दिल्लीतील प्रगती मैदान येथे घर आणि संस्थात्मक सुरक्षा ऑफरिंग सादर करत आहे दिल्ली, ११ डिसेंबर २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचा एक भाग...

Popular