हैद्राबाद, – पीपीएस मोटर्स – मोठ्या वाहन समूहाचा भाग – देशातील सर्वात मोठ्या वाहन समूहांपैकी एक असलेल्या कंपनीने ४०,००० फोक्सवॅगन वाहनांच्या विक्रीचा टप्पा साध्य केल्याचे जाहीर केले असून, हा विक्रम करणारी ती भारतातील पहिलीच मल्टी– स्टेट डीलर ठरली आहे. पीपीएस मोटर्सकडे फोक्सवॅगनचे सर्वाधिक टचपॉइंट्स आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाम या पाच राज्यांत मिळून एकूण ३३ टचपॉइंट्स कार्यरत आहेत.
कोविड महामारीनंतर वाहन उद्योगात मंदी येऊनही पीपीएस मोटर्सने ३३ टच पॉइंट्सपर्यंत विस्तार करत, कंपनी फोक्सवॅगनसाठी सर्वात मोठे नेटवर्क भागीदार बनली आहे. सध्या भारतात प्रत्येक दहावे फोक्सवॅगन वाहन पीपीएस मोटर्सच्या माध्यमातून विकले जाते. यावरून कंपनीचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान आणि ग्राहक समाधानाप्रति असामान्य बांधिलकी दिसून येते. पीपीएस मोटर्स – फोक्सवॅगन टचपॉइंट्सना गुगलवर असलेले ४.८ रेटिंग दर्जेदार सेवा आणि ग्राहकांना मिळणारे समाधान दर्शविणारे आहे.
पीपीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव संघवी याप्रसंगी म्हणाले, ‘गेल्या दीड दशकांच्या या प्रवासात फोक्सवॅगनसह भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत असून, हा काळ आमच्यासाठी फलदायी होता. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्याप्रमुळे पीपीएस मोटर्सला ४०,००० कार विक्रीचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. फोक्सवॅगनची सर्वात मोठी भागीदार असल्याचा आणि भारतातील प्रत्येक दहावी फोक्सवॅग पीपीएस मोटर्सतर्फे विकली जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’
याप्रसंगी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक श्री. आशिष गुप्ता म्हणाले, ‘या असामान्य कामगिरीसाठी आम्ही पीपीएस मोटर्सचे अभिनंदन करतो. ते बऱ्याच काळापासून आमचे भागीदार आहेत आणि प्रमुख बाजारपेठांत फोक्सवॅगनच्या विकासाला चालना देत आहेत. आम्हाला विश्वास वाटतो की, पीपीएस मोटर्स आमच्या विस्तारित फोक्सवॅगन कुटुंबाला दर्जेदार ग्राहकसेवा पुरवत सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित करेल.’
४०,००० वी फोक्सवॅगन कार, रिफ्लेक्स सिल्व्हर कलर्ड व्हर्च्युस कम्फर्टलाइन हैद्राबादमधील कुकटपल्ली सिटी शोरूममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या भागीदारीत पीपीएस मोटर्सने १५ पुरस्कार व मानसन्मान मिळविले आहेत. पीपीएस मोटर्स संपूर्ण भारतातील विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून फोक्सवॅगनने २०१९, २०२०, २०२१, २०२३ मध्ये सर्वोच्च विक्री योगदान पुरस्कार, फोकस सेगमेंट २०२३ मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार, बेस्ट एक्सचेंज सेल्स पेनट्रेशनचा पुरस्कार सलग तीन वर्ष (२०२१, २०२२, २०२३), सर्वोच्च विक्री पुरस्कार तैगुन आणि तिगुन, तसेच पीपीएस मोटर्सकडून इतर सन्मानांसह सादर केला आहे.