My Marathi https://mymarathi.net Fri, 04 Dec 2020 15:16:27 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=5.5.3 पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत जयंत आसगावकर विजयी https://mymarathi.net/local-pune/jayant-asgaonkar-wins-pune-division-teachers-constituency-election/ Fri, 04 Dec 2020 15:13:47 +0000 https://mymarathi.net/?p=81924             पुणे, दि. 04-  पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. 
           श्री. आसगावकर यांना 25 हजार 985  मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे श्री. आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते. 

]]>
६ डिसेंबरला ड्राय डे… https://mymarathi.net/news/dgipr-820/ Fri, 04 Dec 2020 14:01:52 +0000 https://mymarathi.net/?p=81920 मुंबई, दि. 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर परिसरात मद्य विक्रीच्या किरकोळ अनुज्ञप्त्या बंद असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करी रोड स्टेशनपर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगरपर्यंत हद्दीमधील भागात स्थित असणाऱ्या तसेच सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, ॲन्टॉपहिल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करुत मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद  आहे.

]]>
पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 580 https://mymarathi.net/local-pune/the-number-of-active-patients-in-pune-division-is-14-thousand-580/ Fri, 04 Dec 2020 13:46:23 +0000 https://mymarathi.net/?p=81918 पुणे विभागातील 5 लाख 9 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 39 हजार 439 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.4 :- पुणे विभागातील 5 लाख 9 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 39 हजार 439 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 580 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 45 हजार 533 रुग्णांपैकी 3 लाख 26 हजार 10 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.35 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 522 रुग्णांपैकी 49 हजार 155 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 642 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 362 रुग्णांपैकी 42 हजार 695 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 56 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 912 रुग्णांपैकी 44 हजार 803 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 110 रुग्णांपैकी 47 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 172 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 793, सातारा जिल्ह्यात 153, सोलापूर जिल्ह्यात 180, सांगली जिल्ह्यात 34 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 614 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 1052, सातारा जिल्हयामध्ये 285, सोलापूर जिल्हयामध्ये 173, सांगली जिल्हयामध्ये 45 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 59 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 16 हजार 523 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 39 हजार 439 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 3 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

]]>
रेराच्या कारणाने बांधकामांची दस्त नोंदणी थांबविल्याने दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो कुटुंबांना वाऱ्यावर सोडू नका -खर्डेकर यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती https://mymarathi.net/local-pune/dont-leave-millions-of-families-trapped-in-a-vicious-cycle-of-de-registration-of-constructions-due-to-rera/ Fri, 04 Dec 2020 13:42:23 +0000 https://mymarathi.net/?p=81915 पुणे -महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे आणि एकूणच महापालिका लगतची सर्व ग्रामीण भागातील शेकडो,हजारो बांधकामांची रेरा नोंदणी नसल्याच्या कारणाने दस्त नोंदणी थांबविल्याने सुरु झालेल्या दुष्टचक्रात अडकून पडली आहेत .ज्याचा भयाण फटका केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर अनेक कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था ,बैंका आणि विशेष म्हणजे हि बांधकामे बुकिंग केलेली अगर त्यासाठी कर्ज घेतलेली लाखो कुटुंबातील व्यक्तींना थेट बसला आहे याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष क्रियेटीव्ह फौन्डेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी वेधले आहे.

या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कडे एक विशिष्ट डेडलाईन ठरवून त्यापूर्वीच्या बांधकामाना रेरा ची अट शिथिल करून त्यांची दस्त नोंदणी सुरु करावी अशी मागणी केली आहे .या विषयी खर्डेकर यांनी सांगितले कि,पुणे महापालिकेच्या हद्दीत वाढ करुन उर्वरित २३ गावे पुणे मनपा त समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही राज्य सरकारने सुरु केली असल्याचे वाचनात आले.खरेतर ही गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करणे संयुक्तिक ठरणार आहे,कारण एकतर कोरोनाच्या संकटामुळे पुणे शहरातील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत,अर्थचक्र थांबल्यामुळे राज्य सरकार देखील विकासासाठी निधी देण्यात असमर्थ असल्याचे दिसून येते.अगोदर घेतलेल्या ११ गावांना ही याचा फटका बसला आहेच.मात्र आत्ताचे निवेदन समावेश करावा किंवा नाही याच्याशी संबंधित नाही.पण आज आपण लक्ष वेधू इच्छितो ते ह्या गावां मधील अनधिकृत बांधकामां कडे.हजारो इमारती आज बांधून तयार आहेत.मात्र या इमारतीं मधील सदनिकेच्या दस्त नोंदणीचा विषय अतिशय गंभीर असून अनेक मंडळी रेरा च्या निर्णयाने उद्ध्वस्त होत आहेत.वस्तुतः दस्त नोंदणी थांबवणे कोणत्याही कायद्यात बसत नाही असे तज्ञांचे मत आहे..
तसे निकाल ही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.
एकवेळ यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचा विचार करु नका पण ज्या हजारो नागरिकांनी फ्लॅट बुक केले,कर्ज काढले,हप्ते ही सुरु झाले त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे / या सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही आणि दस्त नोंदणी होत नसल्याने त्यांना कर्जाचे अंतिम disbursement ही होत नाही. रेराच्या नोव्हेंबरच्या पत्रामुळे ही वेळ आली आहे.
जर प्रामाणिकपणे अनधिकृत बांधकाम थांबवायचे असेल तर एक डेडलाईन ठरवून द्यावी की समजा ३१ डिसेंबर २०२० नंतर रेराच्या परवानगी शिवाय होणाऱ्या बांधकामांची नोंदणी होणार नाही.पण आज ज्या शेकडो इमारती ग्रामीण भागात उभ्या आहेत त्यांचे भविष्यच अधांतरी आहे.
ही बांधकामे होत असताना सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होते हे उघडच आहे.
तरी गावे पुण्यात घेत असताना या विषयाचा गांभीर्याने विचार करावा व सदनिका खरेदीदारांना दिलासा द्यावा.ह्या बांधकामां वर हातोडा चालविण्याची कारवाई करणे राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान करण्यासारखे आहे.यापूर्वी अनेक बांधकामे कधी गुंठेवारीत तर कधी दंड आकारुन नियमित केली आहेत.त्याच धर्तीवर गावांच्या समावेशापूर्वी ह्या बांधकामांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
बैठया घरांची ही खरेदी विक्री ची दस्तनोंदणी होत नाहीये हे ही त्रासदायक ठरत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हवेली आणि मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी थांबवली आहे,उर्वरीत सर्वत्र फ्लॅट चे व तुकडा जमीनीचे दस्त केले जात आहेत. रहिवासी,औद्योगिक व शेती झोन मधील जमीन मिळकतींचे व नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींच्या फ्लॅट मिळकतीचे खरेदी दस्तांची नोंदणी करण्यावर फक्त हवेली व मुळशीत घालण्यात आलेले निर्बंध अन्यायकारक आहेत.असे आपले स्पष्ट मत आहे.तरी या विषयात उपमुख्यमंत्र्यांनी मार्ग आढावा अशी विनंती संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

]]>
ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न तातडीने थांबवा-खा. वंदना चव्हाण https://mymarathi.net/local-pune/immediately-stop-trying-to-sell-or-rent-out-amenity-space-vandana-chavan/ Fri, 04 Dec 2020 12:40:30 +0000 https://mymarathi.net/?p=81912 पुणे-ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा यासाठी खासदार श्रीमती. वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्राद्वारे निवेदन दिले.

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या ॲमेनिटी स्पेस उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा किंवा त्या भाडेतत्वार देण्याचा घाट घालत असल्याचे समजते. शहरीकरण वाढत असताना अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेल्यास शहरासाठी ही अत्यंत दुर्देवी आणि चुकीची घटना असेल. 

पुण्याची लोकसंख्या ४० लाखांवर पोचली आहे. तसेच राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात स्थलांतरीत होणारया नागरिकांची संख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेतला तर, वाढत्या पायाभूत सुविधांवरील ताण वाढत आहे. त्यासाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज वाढत आहे. तसेच शहराच्या सुनियोजीत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणीही पुरेशा वेगाने होत नसल्याचे गेल्या तीन वर्षांतील महापालिकेतील कारभारावरून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत नागरी सुविधांच्या जागा विकण्याचे प्रयोजन काय आहे, हे समजत नाही. 

पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये मुळात क्रिडांगण, गार्डन, पार्क, शाळा, आरोग्यकेंद्रे, क्रिडा संकुल, भाजी मार्केट,  बालवाडी आदी विविध सुविधांसाठी जागा प्रचलित मानांकनापेक्षा कमी आहेत. सार्वजनिक उपयोगासाठी ॲमेनिटी स्पेसचा वापर व्हावा हा मूळ उद्देश ॲमेनिटी स्पेसचा आहे आणि तोच विसरून निर्णय घेणे योग्य ठरणार नाही; हे समाजहिताच्या विरोधात असेल.  विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डिसी रूल) ॲमेनिटी स्पेसच्या जागांची विक्री करता येत नाही. तरीही महापालिकेने तसा प्रयत्न केल्यास पुणेकर म्हणून आमचा ह्या निर्णयाला कडाडून विरोध असेल. 

वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, स्थलांतर लक्षात घेता नागरी सुविधा वाढविण्यावर व त्या विकसित करण्यावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणीही वेगाने केली पाहिजे. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार नियोजन करावे, अतिरिक्त उधळपट्टी थांबवावी यामुळे खर्चात बचत होईल आणि तो निधी आवश्यक असलेल्या नागरी हिताच्या कामांसाठी वापरता येईल. त्यामुळे ॲमेनिटी  स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न आपण तातडीने थांबवावा. 

अनेक वर्षांपासून मी ॲमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करावा अशी मागणी प्रशासनाकडे करत आहे, परंतु याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत ही शोकांतिका आहे. या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा आपणांस विनंती करते की, ॲमेनिटी स्पेससाठीचा मास्टर प्लॅन तयार करावा, यासाठी एक लोकप्रतिनिधी व एक पुणेकर म्हणून मी आवश्यक ते सहकार्य निश्चित करेल. 

]]>
अहंपणामुळेच ही वेळ आली- एकनाथ खडसे https://mymarathi.net/politician/this-time-came-because-of-ego-eknath-khadse/ Fri, 04 Dec 2020 12:20:14 +0000 https://mymarathi.net/?p=81909 जळगाव– ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,’ अशा शब्दांत खडसेंनी टीका केली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल आज लागले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, ‘या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. एखादा व्यक्तू पक्षातून बाहेर पडल्यावर काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटलांना कळेल. निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी’, असा घणाघात खडसेंनी केला.

]]>
महाराष्ट्रातील चित्र आता बदलतेय-शरद पवार https://mymarathi.net/politician/the-picture-in-maharashtra-is-changing-now-sharad-pawar/ Fri, 04 Dec 2020 12:10:51 +0000 https://mymarathi.net/?p=81906 पुणे– ‘धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. मात्र इतर ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.

पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. याविषयी प्रतिक्रिया देतांना पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकांपासून भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलेले नव्हते. पण यावेळी पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. हा बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असे या निकालातून दिसते’ असे पवार म्हणाले आहेत.

]]>
देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य राहुल गांधी यांच्यात नाही- शरद पवार https://mymarathi.net/politician/rahul-gandhi-does-not-have-the-consistency-to-run-a-country-sharad-pawars-opinion-about-rahul-gandhi/ Fri, 04 Dec 2020 12:01:04 +0000 https://mymarathi.net/?p=81902 मुंबई– ‘राहुल गांधी यांच्यात देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य नाही,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. याशिवाय, पवारांनी अमेरिके माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून राहुल गांधींवर केलेल्या टीकेलाही अयोग्य म्हटले आहे.

‘सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.’ सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळेच, पवारांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते.

राहुल गांधीवरील ओबामांची टीका अयोग्य

बराक ओबामा यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवर शरद पवार म्हणाले की, ‘आपल्या देशातील नेत्यांबद्दल काहीही बोलू शकतो. पण, दुसऱ्या देशातील नेत्यांबाबत काही बोलणार नाही.इतकच म्हणेल की, राहुल यांच्यावर ओबामा यांनी केलेली टीका अयोग्य होती.’

काही दिवसांपूर्वी बराक ओबामा यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात त्यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांना नर्वस विद्यार्थी म्हणत, त्यांच्या आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे म्हटले होते. यावरुन देशात खूप चर्चा झाली होती.

]]>
ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन https://mymarathi.net/news/the-chief-minister-congratulated-ranjit-singh-disley-a-global-teacher-award-winning-zilla-parishad-teacher/ Fri, 04 Dec 2020 11:53:13 +0000 https://mymarathi.net/?p=81898 मुंबई : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले.

यावेळी  रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.

क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 7 कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

]]>
सरकारच्या वर्षापूर्तीनंतरचा आघाडीचा पहिला विजय- आबा बागुल https://mymarathi.net/local-pune/the-first-victory-of-the-government-after-a-year-aba-bagul/ Fri, 04 Dec 2020 11:48:45 +0000 https://mymarathi.net/?p=81896
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार विजयी झाले, वर्षापूर्तीनंतरची ही पहिलीच निवडणूक जिंकल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांच्या एकजुटीचा विजय विधानपरिषद निवडणुकीत झाला असे बागुल यांनी म्हटले असून पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार जयंत आसगांवकर यांचे अभिनंदन केले आहे.

यापुढील काळातही आघाडी एकजुटीने काम करेल, असा विश्वास बागुल यांनी व्यक्त केला आहे.

]]>