Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

पृथ्वीमातेचे जतन करण्याचे, वसुंधरेवर प्रेम करण्याचे आणि हरित आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळण्याचे टाटा पॉवरतर्फे सर्वांना आवाहन

  कंपनीच्या 'सस्टेनेबल इज अटेनेबल' चळवळीशी सुसंगत COP 28 मध्ये ‘दुनिया अपने  हवाले’ ही नवीन ब्रँड फिल्म सादर मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक टाटा पॉवरने  “पृथ्वी मातेचे...

भारतीय लष्करासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 5,336.25 कोटी रूपयांचा 10 वर्षासाठी करार

संरक्षण मंत्रालयाने 15 डिसेंबर 2023 रोजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे सोबत 10 वर्षांच्या कालावधीसाठी, एकूण 5,336.25 कोटी रुपये खर्चाच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी ऐतिहासिक...

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांसाठी सादर केले क्रांतिकारी HIFU तंत्रज्ञान

मुंबई,: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पर्याय म्हणून हाय-इन्टेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड (HIFU) हे क्रांतिकारी तंत्रज्ञान सादर केल्याची घोषणा केली आहे. HIFU या अत्याधुनिक उपचारामध्ये प्रोस्टेट कॅन्सर पेशींना टार्गेट करून त्या नष्ट करण्यासाठी हाय-फ्रिक्वेन्सी साउंड वेव्ज वापरल्या जातात. शरीरावर कमीत कमी चिरा देऊन केल्या जाणाऱ्या या तंत्रामध्ये फोकल अबलेशनचा वापर केला जातो, कॅन्सर रुग्णांच्या देखभालीमध्ये ही खूप मोठी भरारी आहे. जराही चूक न होता, संपूर्ण देखभाल करत प्रोस्टेट कॅन्सर नेमका जिथे झाला आहे त्या जागी उपचार करण्याचा टार्गेटेड दृष्टिकोन यामध्ये अवलंबिला जातो. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे रोबोटिक सर्जरीचे हेड आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ युवराज टी बी यांनी सांगितले, "कॅन्सरवरील पारंपरिक उपचारांना नॉन-इन्व्हेसिव्ह पर्याय असलेले HIFU हे लोकलाईज्ड प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी आदर्श आहे. फोकल अबलेशनमध्ये जिथे कॅन्सरची जखम किंवा ट्युमर आहे फक्त त्याच जागी लक्ष केंद्रित आणि टार्गेट करून, अति तापमानाचा वापर करून कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात. प्रोस्टेट ग्रंथींच्या इतर भागांमध्ये सर्वसामान्य पेशींना कोणतेही नुकसान होणे टाळले जाते. रेडिएशनसारख्या आधीच्या उपचारांनंतर बचाव उपचार करू पाहणाऱ्या रुग्णांसाठी देखील HIFU लाभदायक ठरू शकते." प्रोस्टेट कॅन्सर हा भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या, सर्वात जास्त प्रमाण असलेल्या पहिल्या दहा कॅन्सरपैकी एक आहे. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने HIFU आणणे हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्य देखभाल क्षेत्रातील दिग्गजांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलने प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये अत्याधुनिक प्रगती घडवून आणण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. नावीन्यपूर्णतेप्रती या वचनबद्धतेमुळे प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यात आलेल्या रुग्णांना सर्वात जास्त प्रभावी आणि शरीरावर कमीत कमी चिरा, जखमा करून करता येतील असे उपचार मिळतील. HIFU मुळे रुग्णांना अनेक वेगवेगळे लाभ मिळतात. हे उपचार शरीरावर कमीत कमी चिरा देऊन करता येत असल्याने पारंपरिक सर्जिकल प्रक्रियांमध्ये संभवणारी गुंतागुंत होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. HIFU सर्वसाधारण ऍनेस्थेशिया देऊन करता येते, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्ण आरामात राहू शकतो. हे तंत्रज्ञान अतिशय अचूक असल्यामुळे आजूबाजूच्या टिश्यूना काहीही नुकसान होत नाही, दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील असे साईड इफेक्ट्स होण्याचे प्रमाण कमी होते आणि रुग्णाची जीवन गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. कमीत कमी वेदना आणि असुविधा सहन करून रुग्णांना हे उपचार करून घेता येतात, तसेच उपचारांनंतर आपली दैनंदिन कामे करू लागणे हे कमीत कमी दिवसात सुरु करता येते. प्रोस्टेट कॅन्सरवरील इतर उपचारांमध्ये होणारे, असंयम आणि नपुंसकत्व असे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका HIFU मध्ये कमी असतो.  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "शरीराचे नुकसान कमीत कमी होईल आणि उपचारांचा प्रभाव जास्तीत जास्त होईल अशा प्रकारे अतिशय अचूक उपचारांच्या साहाय्याने आमच्या रुग्णांना कॅन्सरच्या विरोधात लढण्यात मदत करावी हे आमचे लक्ष्य आहे. या संदर्भात HIFU अतिशय उपयुक्त आहे. यामुळे आम्ही कॅन्सरवरील उपचारांचा आणखी एक पर्याय उपलब्ध करवून दिला आहे, इतकेच नव्हे तर, आमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणारा चांगला आणि सहज अनुभव देखील वाढला आहे. आमच्या रुग्णांना सर्वात जास्त प्रगत व प्रभावी उपचार पुरवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे."

कॉलेज रायव्हल्स येतेय पुण्यात,एका थरारक गेमिंग एक्स्ट्रागान्झासाठी तयार व्हा!

पुणे, 15 डिसेंबर 2023 : एस्पोर्ट्स उद्योगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अॅम्पवर्स डीएमआय आता संपूर्ण भारत दौर्‍याच्या पुढे चालू ठेवत आता बहुप्रतीक्षित 'कॉलेज रायव्हल्स' स्पर्धा पुण्यात आणण्याच्या तयारीत आहे. गेमिंग समुदायाच्या मनामनात आधीच घर केलेला हा कार्यक्रम आता आपल्या नाविन्यपूर्ण गेमिंग ट्रकसह पुण्याच्या प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूमधील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून प्रचंड उत्साह, सोशल मीडियावर स्पर्धेची स्थिर उपस्थिती, त्याच्या वेगाने वाढणाऱ्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. 'कॉलेज रायव्हल्स' स्पर्धा भारतातील शैक्षणिक संस्थांमधील भरभराट होत असलेल्या गेमिंग समुदायाशी सक्रियपणे संपर्क साधून एस्पोर्ट्स प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर देते. एस्पोर्ट्स खेळाडूंची खरी गेमिंग क्षमता अनलॉक करणार्‍या उत्साहवर्धक अनुभुतीची हमी देणारी एक अत्यंत अपेक्षित स्पर्धा शहरात येऊ घातली आहे. या विलक्षण प्रवासात सहभागी होण्यासाठी 'कॉलेज रायव्हल्स'मध्ये शहराच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आणि गेमर्सचे स्वागत आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांसह ८५००+ किलोमीटरचा प्रवास करून, 'कॉलेज रायव्हल्स'चा मोबाईल गेमिंग ट्रक आता पुण्यात दाखल झाला आहे. येथे, ते खेळाडूंच्या निवडीवर देखरेख करेल आणि गेमिंगचा अभूतपूर्व अनुभव देईल. यात सहभागी होणारे प्रखर एस्पोर्ट्सच्या जगात, प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात आणि इन्फ्ल्युअर्सशी संवाद साधत, डायनॅमिक लाइव्ह डीजे परफॉर्मन्सचा आनंद घेत आणि करमणुकीच्या जगात तल्लीन होतील. बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI), काउंटर-स्ट्राइक, फिफा २०२३, रोड टू व्हेलोर : एम्पायर्स, व्हेलोरंट आणि टेकन७ अशा सहा वेगवेगळ्या श्रेणीत गेम्ससाठी संपूर्ण भारतातील विद्यार्थी नोंदणी करत आहेत. आजपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही चॅनेलद्वारे ६३ हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. कॉलेज रायव्हल्स तरुणांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वीपणे यशस्वी झाले आहेत. पुण्यात होणारी कॉलेज रायव्हल्स ही स्पर्धा म्हणजे स्पर्धात्मक गेमिंग आणि महाविद्यालयांमध्ये एकता वाढवण्याच्या अॅम्पवर्स डीएमआयच्या ध्येयातील नवीन अध्यायाचे प्रतीक आहे.विद्यार्थीच्या. पुढे, विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP), सिंहगड इन्स्टिट्यूट, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे इंटरएक्टिव्ह गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, यापुढे संगीताचा आनंद लुटता येईल.  अॅम्पवर्सचे भारतातील प्रमुख अश्विन हरयानी म्हणाले की, “पुण्यामध्ये कॉलेज रायव्हल्सचे लाँचिंग ही भारतातील महाविद्यालयांमधील गेमिंग समुदायाला सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये आम्ही जो उत्साह पाहिला तो खरोखरच प्रेरणादायी आहे आणि आता, आम्ही पुण्यात पाऊल ठेवत असताना, आम्ही गेमिंगचा उत्साह आणखी वाढवण्यास तयार आहोत. आम्ही स्पर्धात्मक गेमिंगच्या क्षेत्रात एक रोमांचक प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत.”

स्वराजच्या क्रांतीकारी कापणी तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद

पितमपूर, १४ डिसेंबर २०२३ – भारतातील पहिल्या, देशांतर्गत बनवण्यात आलेल्या कापणी यंत्राचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या विभागाने भारतीय...

Popular