Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आता ॲपवर मिळवा भाड्याने बाईक, मोबिक्विक आणि ओएनएन बाईक्सची भागीदारी

Date:

नवी दिल्ली- मोबिक्विक, भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने आज लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर बनवणाऱ्या ‘ओएनएन बाईक्स’ या बाईक रेंटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रवेशाची घोषणा केली आहे. मोबिक्विक यूजर मोबिक्विक अ‍ॅपद्वारे बाईक, स्कूटर किंवा स्कूटी भाड्याने घेऊ शकतात. शहरांतर्गत प्रवास त्रासमुक्त, परवडणारा आणि सोयीचा बनवणे हा या भागीदारीमागचा उद्देश आहे. सध्या ही सेवा बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, कोटा, मैसूर आणि उदयपूर या 6 प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार असून पुढील काळात आणखी काही शहरांमध्ये या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण पातळीत होणारी वाढ, जागेची मर्यादा या विविध कारणांमुळे भारतातील टियर 1, 2 आणि 3 नगरे आणि शहरांत दुचाकी हा प्राधान्य दिला जाणारा पर्याय आहे. आजच्या काळात स्वत:ची वाहने खरेदी करण्यापेक्षा भाडे तत्त्वावर वाहने घेण्यास पसंती देण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रारंभिक ऑफर म्हणून, मोबिक्विक यूजर सुपरकॅश मूल्याच्या 5% पर्यंत सूट मिळवण्यासाठी सुपरकॅशचा वापर करू शकतात.

या नवीन क्षेत्रातील प्रवेशाविषयी बोलताना, श्री. बिक्रम बिर सिंह, वरिष्ठ संचालक आणि व्यवसाय प्रमुख, मोबिक्वि म्हणाले की, “आमच्या अंतर्गत संशोधनानुसार टियर 1/2 आणि 3 शहरांत महिला आणि तरुणांसह सर्वच युजरची रेंटल क्षेत्रात दुचाकीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आम्ही अधिकाधिक कृती आणि जेथे दुचाकी रेंटल एक आशादायी श्रेणी ठरू शकते अशा टियर-1 नगरे आणि शहरांपलीकडे असलेल्या असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचा समतोल साधण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही ओएनएन बाईक्सच्या सहयोगाने ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि भविष्यात या श्रेणीमध्ये प्रभावी वाढ दिसून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.”

श्री. आकाशदीप सिंघल, मुख्य विपणन अधिकारी आणि सह-संस्थापक, ओएनएन बाईक्स, म्हणाले, “मोबिक्विकसोबत आमच्या भागीदारीबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. हे भारताचे दुसरे सर्वांत मोठे मोबाईल वॉलेट आहे आणि ही भागीदारी शहरांमधील लाखो नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. तसेच, ही भागीदारी प्रवास करणार्‍यांना बाईक भाड्याने घेण्याची आणि मोबिक्विक ॲपद्वारे पेमेंट करण्याची सोय प्रदान करेल. आम्हाला भारतातील प्रमुख 10 शहरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आमच्या 3500+ बाईक्सच्या मजबूत ताफ्याचा अभिमान वाटतो. मोबाईल वॉलेट क्षेत्रामध्ये ‘पसंतीचा भागीदार’ म्हणून मोबिक्विकसोबत, आम्ही अधिकाधिक युजरपर्यंत पोहोचणे आणि भारतीयांसाठी त्यांच्या पहिल्या आणि अंतिम स्थानाच्या कनेक्टिव्हिटी समस्येबद्दल संबोधण्याची आशा करीत आहोत.”

भारत सरकारने वर्तमान आर्थिक वर्षात 30 अब्ज व्यवहारांचे भव्य लक्ष साधण्याचा मानस बाळगला आहे ज्यात मोबाईल वॉलेट कंपनीद्वारे 6.3 अब्ज व्यवहारांच्या अपेक्षांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या भागीदारीमुळे देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. अमेरिका आणि चीन या देशांपाठोपाठ ग्राहकांना डॉक-लेस सेवांचा लाभ देऊन विलक्षण अनुभव प्राप्त करण्यावर आपला भारत देश भर देत आहे.

 मोबिक्विकविषयी

मोबिक्विक हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे 3 दशलक्ष थेट व्यापारी आणि 260 दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन 2009 मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडिया टेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1 आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनण्याचे आणि सन 2022 पर्यंत अब्जावधी भारतीयांना डिजिटल पेमेंट, कर्ज, विमा आणि गुंतवणूकीसाठी एकच मंच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे

ओएनएन बाईक्सविषयी

ओएनएन बाईक्स हे एक रेंटल प्लॅटफॉर्म जेथे तुम्हाला बाईक भाड्याने मिळू शकते आणि रोजच्या प्रवासाला अधिक सोपे बनवण्यास, प्रवासाचा वेळ सार्थक, त्रास-मुक्त आणि अधिक परवडणारा बनवण्यास मदत करते! कंपनीकडे सुमारे 3500+ बाईक्सची क्षमता असून बंगळुरू, हैदराबाद, मौसूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, जयपूर, कोटा आणि उदयपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रत्यक्ष सेवा पुरविण्यात येते. या सेवांमध्ये शहरांतर्गत, दोन शहरांतर्गत, कमी आणि अधिक अंतराच्या राईडसाठी भाडेपट्ट्यावरील मॉडेलचा समावेश होतो. भारतामध्ये डॉक-लेस स्कूटर शेअरिंगसाठी हे अग्रक्रमी आहेत. ॲमेझॉन, उबर, ओला, स्विग्गी, फूडपांडा, फ्यूचर ग्रुप, इलास्टिक रन, चाय पॉईंट, फासूस, गोझेफो, फार्मईझी, निन्जाकार्ट, उर्बन लॅडर इ. प्रमुख ब्रँड्सने यांच्या उपास आणि सेवांचा लाभ घेतला आहे. ओएनएन बाईक्स हे बी2बी मध्ये विभिन्नता आणणारे पहिले रेंटल स्टार्ट-अप आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...