· या सुविधा केंद्रात गोदामाची जागा 0.४ दशलक्ष चौ. फूट आहे
· ७ महिन्यांत बांधकाम पूर्ण
पुणे, २५ एप्रिल २०२४: गोदाम आणि दळणवळण क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनडीआर वेअरहाऊसिंगने आज पुण्यात आपल्या नवीन अत्याधुनिक सुविधा केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली. उद्घाटन सोहळा २५ एप्रिल २०२४ रोजी पार पडला.
हा प्रकल्प एनडीआर वेअरहाऊसिंगच्या विस्तार योजनेचा एक भाग असून पुण्यात ८० एकरांपेक्षा जास्त भूसंपादनाचे काम सुरू किंवा नियोजित आहे. यातून अतिरिक्त १.८ दशलक्ष चौरस फूट औद्योगिक आणि गोदामांच्या जागेची क्षमता दिसून येते.
हे सुविधा केंद्र एका भारतीय बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीला भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.
पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यामध्ये स्थित नवीन सुविधा केंद्रामध्ये अंदाजे 0.४ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे गोदाम आहे आणि ते केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत बांधले गेले आहे. गोदामाच्या लक्षवेधी वैशिष्ट्यांमध्ये उष्णतारोधक छप्पर आणि बाजूच्या भिंतींचा समावेश असून त्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे प्रति तास ६ वेळा हवा बदल होतात. त्याच्या आकारमानाच्या आणि प्रगत बांधकामाव्यतिरिक्त या सुविधा केंद्रामध्ये ६०० वन वृक्षांची लागवड आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) यासारख्या शाश्वत घटकांचा समावेश आहे.
१९८६ पासून सुरुवात झाल्यापासून आपली परंपरा जपत एनडीआर वेअरहाऊसिंग भारतातील एक प्रमुख वेअरहाऊसिंग पॉवरहाऊस म्हणून विकसित झाले आहे. ते देशभरात किफायतशीर दरात अतुलनीय दर्जेदार औद्योगिक आणि वितरण केंद्रे सादर करते. सध्या, एनडीआर कडे १७ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त गोदामांची जागा आहे आणि ती ते चालवतात. जोडीला अतिरिक्त ४ दशलक्ष चौरस फूटाचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये फॉर्च्युन 100 कंपन्या, आघाडीच्या भारतीय कॉर्पोरेट्स, ई-कॉमर्स बड्या कंपन्या आणि 3PL यांचा समावेश आहे.
एनडीआर वेअरहाऊसिंगचे झोनल हेड (पश्चिम) रामचंद्रन राजाराम म्हणाले, “पुण्यातील आमचे नवीन सुविधा केंद्र एनडीआर वेअरहाऊसिंगच्या नाविन्यपूर्णता आणि शाश्वतता यासाठीच्या बांधिलकीची पावती आहे. या क्षेत्रात आमचे स्थान मजबूत करत आणि उद्योगक्षेत्रासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करत या अत्याधुनिक सुविधाकेंद्राचे उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे सुविधाकेंद्र म्हणजे केवळ पुण्यातील वेअरहाउसिंग सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीला पुरे करण्याचे साधन आहे असे नाही तर त्यातून पर्यावरणाप्रती असलेली आमची बांधिलकी देखील प्रतिबिंबित होते. उद्योगातील आमचे नेतृत्व आणखी मजबूत करत आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक गोदाम आणि दळणवळण सुविधा पुरविण्यासाठी आम्ही चांगल्या स्थितीत आहोत.”
एनडीआर वेअरहाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड हे भारतातील पहिले “पर्पेच्युअल वेअरहाऊसिंग आणि इंडस्ट्रियल पार्क्स InvIT” या एनडीआर InvIT ट्रस्टचे प्रायोजक आहेत. InvIT खाजगीरित्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सूचीबद्ध केले गेले.