पुणे दि. 25/07/2024– खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू असणारा 40000 क्युसेक विसर्ग कमी करून रात्री 12.00वा. 31000क्यूसेक करण्यात येणारआहे.अशी माहिती कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिली आहे.
पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पानशेत धरण जलाशय आज दिनांक 25 जुलै 2024 रोजी रात्री 11:00 वाजता 83 % टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून किंव्हा विद्युत निर्मिती केंद्रा मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.तरी नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री मोहोळ पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पूरग्रस्त राहत असलेल्या ठिकाणी , तसेच आपत्ती निवारण केंद्रांना भेटी दिल्या. उद्या सकाळी त्यांनी ११ वाजता वरिष्ठ स्तरावर पूरग्रस्तांच्या समस्यांबाबत माहिती घेणे आणि तातडीची मदत पुरवणे बाबत बैठक बोलाविली आहे.
दरम्यान वारजेतील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पुरात मरण पावल्याचे वृत्त येथे समजले आहे . रात्री अचानक पाऊस सुरू झाला आणि नदीपात्रातील पाणी वाढले. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला होता. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत..


लोणावळा धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात ४११ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. पर्ज्यन्यवृष्टीत वाढ होतअसून विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, 4 तलाव तुडुंब
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटलेली आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे
कोयनेच्या पाणी पातळीत वाढ, लोकांना संतर्क राहण्याचे आदेशआज 25 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता धरणामध्ये एकूण 78.29 टीएमसी ७४.३८ % पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून 10 हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल. धरण पायथा विद्युत गृहामधील1050 क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 21,050 क्युसेक असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.