मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

Date:

बोनसप्रश्नी राष्ट्रीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांच्यासोबत बैठक

पुणे, : पुणे महानगरपालिकेत कार्यरत सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना यापूर्वी त्यांच्या मासिक वेतनामध्ये बोनसची रक्कम देण्यात येत होती. मात्र, Payment of Bonus Act मधील तरतुदीनुसार ज्या कामगारांचे वेतन २१ हजार रुपयांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांना बोनस देता येणार नाही, असा निर्णय मनपा प्रशासनाने नुकताच घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात आज कामगार नेते व नगरसेवक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी कंत्राटी कामगारांच्या वेतनातून बोनसच्या मूळ रकमेची कपात करण्याबाबत देण्यात आलेले आदेश प्रशासनाने मागे घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. तसेच, कंत्राटी कामगारांना यापुढेही बोनस देता येईल का, याबाबत विधी विभागाचा सल्ला घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी राष्ट्रीय सणांच्या सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा दुहेरी पगार (डबल वेतन) तसेच एक अतिरिक्त पगार गेल्या वर्षभरात कोणत्याही कंत्राटदाराने दिलेला नसल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

या प्रकरणाची प्रशासनामार्फत तपासणी करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी शिष्टमंडळाला दिले.

कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय मजदूर संघ सातत्याने पाठपुरावा करीत असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खळबळजनक! कोर्ट सुरू असतानाच अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाकडून...

भारतात 70 मिमी रॉकेट सिस्टिम्सचे उत्पादन; थेल्स-कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्सची धोरणात्मक भागीदारी

अनगाइडेड आणि लेझर-गाइडेड रॉकेट्ससाठी तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक उत्पादन आणि...

भारतात लघु शस्त्रे आणि ‘काउंटर-यूएएस’ क्षमता विकसित करण्यासाठी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स-एफएन हर्स्टल यांच्यात करार

स्वतंत्र उत्पादन केंद्र, तंत्रज्ञान सहकार्य आणि संभाव्य संयुक्त उपक्रमाचा...