५५ हजार क्युसेक् पाणी सोडणार होता तर सावध का नाही केले ? चौकशी करणार k: ३५ हजार क्युसेक् सोडले असते तर पूर आला नसता .. मुरलीधर मोहोळ म्हणाले …
पुणे- पाटबंधारे खात्याने खडकवासल्यातून ३५ हजार क्युसेक्स ने पाणी सोडल्याचे म्हटले असले तरी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांना मात्र त्यावर विश्वास नसल्याचे दिसून आले आहे . आज त्यांनी ५५ हजार क्युसेक्स ने पाणी सोडल्याने एवढा मोठा पूर आला , आणि जर एवढे पाणी सोडायचे होते तर अगोदर सावध का नाही केले ? असा पाटबंधारे वर ठपका ठेवत महापालिका आणि पाटबंधारे यांच्यात समन्वय नसल्याचा देखील आरोप केला आहे . याबाबत चौकशी होईल पण सध्या आता पूरग्रस्तांना दिलासा देण्याची प्राथमिकता राहील असे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
अधिवेशन चालू असताना दिल्लीतून मोहोळ पूरस्थिती मुळे पुण्यात संध्याकाळी उशिरा दाखल झाले. त्यांनी येताच पूरस्थितीची, पूरग्रस्तांची पाहणी केली आणि आपत्ती नियंत्रण कक्षांना भेटी देऊन माहिती घेतली त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला