सुनिल बल्लाळ आणि प्रशांत ठोंबरे दोन नवे उपायुक्त
पुणे :महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नांदेडच्या जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोर्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरूवारी यासंदर्भातील आदेश काढले असून शुक्रवारी त्या पदभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.
शासनाने एका तक्रारीवरून महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन केले होते.त्याच्या निलंबनानंतर मागील दीड महिन्यांपासून महापालिका सेवेतील उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्य प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
दरम्यान, बुधवारी रात्री राज्य शासनाने आणखी दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांची महापालिकेमध्ये नियुक्ती केली आहे.
यामध्ये गोंदिया नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सुनिल बल्लाळ आणि चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी प्रशांत ठोंबरे यांचा समावेश आहे. हे दोघे देखिल गुरूवारी महापालिकेत दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्यावेळी शासन सेवेतील पाच उपायुक्तांची शहरातून बदली झाली होती.
त्यापैकी उपायुक्त चेतना केरूरे आणि आशा राउत यांनी मॅटमध्ये या बदलीला आव्हान दिले होते.
मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांची पुन्हा महापालिकेत नियुक्ती केली आहे.
उपायुक्तांच्या चार जागा भरल्याने विद्यमान उपायुक्तांचे अतिरिक्त पदभार हलके होणार असून काहींची खांदेपालट होईल,