Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८’ सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यात संपन्न

Date:

पुणे-‘विनय अरान्हा प्रेझेंट्स मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८, पॉवर्ड बाय हयात या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच येथे शानदार वातावरणात शानदार सोहळ्याने संपन्न झाली. संगीत, नृत्य व प्रेक्षकांची भरभरुन दाद अशा वातावरणात एकूण ३२ स्पर्धकांनी प्रतिष्ठेच्या सन्मानांसाठी चुरशीने स्पर्धा लढवली. हयात पुणे हॉटेलमध्ये झालेल्या या महाअंतिम फेरीसाठी बॉलिवूडमधील नामवंत आणि शहरातील ख्यातनाम व्यक्ती उपस्थित होत्या.

या सौंदर्य़ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून युक्ता मुखी, अदिती गोवित्रीकर, शिबानी कश्यप, सोनल चौहान, शरहान सिंग यांनी काम पाहिले व त्यांना विनय अरान्हा, सपना आनंद छाजेड, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास यांचीही साथ लाभली. प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता अमन वर्मा याने दिमाखदार व मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. शिबानी कश्यपने आपल्या मधुर आवाजात तिची देशभर प्रसिद्ध झालेली गाणी सादर करुन प्रेक्षकांना डोलायला लावले.

डिवा सौंदर्य स्पर्धेतील चैतन्यशील जोडी असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात सिल्व्हर (वय २० ते ३४) व गोल्ड (वय ३५ व पुढे) अशा दोन श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या १२ स्पर्धकांतून ६ सर्वोत्तम विजेते निवडण्याचे आव्हान सन्माननीय परीक्षकांपुढे होते.

अंतिम फेरीत पोचलेल्या स्पर्धकांना दिवा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांकडून आधीचे ३ दिवस मार्गदर्शन मिळाले. त्याच्या बळावर या स्पर्धकांनी आत्मविश्वासाने सौंदर्य, शैली व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवत विजेतेपदाचा मुकूट पटकावला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

टायटल विजेते

मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८ – सिल्व्हर : गौरांगी श्रावत

मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८ – गोल्ड : रुपाली सावंत

सब-टायटल विजेते :

फर्स्ट रनर-अप – सिल्व्हर : वृषाली तायाडे

फर्स्ट रनर-अप – गोल्ड : सिमरन गोधवानी

सेकंड रनर-अप – सिल्व्हर : पिया पावानी

सेकंड रनर-अप – गोल्ड : शुभांगी जोशी

याखेरीज देशाच्या चार भागांतून चार क्वीन्सही निवडण्यात आल्या. यामध्ये क्वीन ऑफ नॉर्थ म्हणून कनिका श्रीवास्तव, क्वीन ऑफ वेस्ट म्हणून शुभांगिनी सांगळे, क्वीन ऑफ साऊथ म्हणून हेमलता शर्मा, क्वीन ऑफ सेंट्रल इंडिया म्हणून अंशुली भांड यांची निवड झाली.

विजेत्यांना मानाचा मुकूट, रोख पारितोषिके (खुशबू कारवातर्फे) व अलंकार (मोदसूत्रतर्फे) देऊन गौरवण्यात आले.

मिसेस युनायटेड नेशन इंटरनॅशनल २०१८ स्पर्धेतील फर्स्ट रनर अप विजेत्या फरहा अन्वर या सौंदर्य स्पर्धेचा ब्रँड चेहरा होत्या. सोहळ्यातील नृत्यांचे संयोजन पूजा सिंग यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...