काँग्रेस पक्षाची २६ नोव्हेंबर रोजी ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’.

Date:

प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार..

मुंबई, दि. २२ नोव्हेंबर २०२६ :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत निवडणूक आयोगालाही कठपुतली बाहुली बनवले आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एसआयआरच्या माध्यमातून काढून घेण्याचे काम भाजपा निवडणुक आयोगाच्या मदतीने करत आहे. मतचोरी व निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जबाबदार आहेत, ते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होत नाहीत.

‘अब की बार, ४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याचे भाजपाचे मनसुबे जनतेने निवडणुकीत हाणून पाडले. आता डिलिमिटेशन आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा सर्व कारभार हुकूमशाहीचा आहे. देशाचे संविधान वाचवणे ही आजची गरज असून काँग्रेस पक्षाने संविधानाच्या रक्षणासाठी देशव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने लोकशाही व संविधान रक्षणासाठी वारंवार आंदोलने केली आहेत. संविधानाने दिलेली लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे जपण्यासाठी तसेच संविधानाच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रसने या रॅलीचे आयोजन केले आहे.

संविधान बचाव रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सहप्रभारी, खासदार, आमदार, लोकसभा व जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, लोकप्रतिनिधी सर्व फ्रंटल, सेल व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी पुणे, दि.२२: ग्रामीण भागातील...

प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना दूरदर्शनचा सर्वोच्च ‘टॉप ग्रेड’ दर्जा!

प्रसार भारतीच्या केंद्रीय नृत्य निवड प्रक्रियेत कथक नृत्यासाठी निवड;...

परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत महसूल विभागास्तरावर शिबिरांचे आयोजन

पुणे, दि. २२: ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेरोजगार युवक-युवतींसाठी...