गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन
पिंपरी । प्रतिनिधी :
गणेशोत्सवा निमित्त पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे काढण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार रामशेठ ठाकुर आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना रामशेठ ठाकुर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले व केवळ वृत्तपत्र संघटना एवढ्यावरच मर्यादीत न राहता सामाजिक कार्यात समिती नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. यावेळी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील, सहसचिव अमोल सांगळे, खजिनदार शैलेश ठाकुर, ज्ञानेश्वर कोळी, प्रसिद्धी प्रमुख राकेश खराडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कांबळे, सुमीत टुंगलाईट; एकनाथ सांगळे, रायगड अध्यक्ष दिलीप गायकर, नवी मुंबई उपाध्यक्ष लालचंद यादव, राहूल जाधव, प्रतीक चाळके, सुनील चौधरी, बिजु वर्गीस, ज्ञानेश्वर सार्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.