Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

किरण बेदींद्वारे सेफ्टी अलार्मसह एव्हरेडीच्या सायरन टॉर्चचे अनावरण

Date:

महिला सुरक्षेला बळकट बनविणारा एक नवोपक्रम
– एव्हरेडीचा सायरन टॉर्च हे एक अनोखे आणि क्रांतिकारी उत्पादन आहे. हा टॉर्च सुरू कराल, तेव्हा त्याला जोडून असलेली साखळी खेचल्यावर एक 100dbA क्षमतेच्या सुरक्षा अलार्मचा आवाज होईल, ज्यामुळे संकटकाळात मदत मागण्यासोबतच आसपासच्या लोकांना सावध करता येते.

– एव्हरेडीच्या या नवीन सायरन टॉर्चबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी #AwaazUthaneyKaPower ही मोहीम कर्णबधिर आणि मूक महिलांद्वारे चालविली जाते. या मोहिमेचे उद्दिष्ट महिलांना, तसेच अन्य लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि सुरक्षा साधनांसह सक्षम करणे, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करणे, हे आहे.


मुंबई, १६ जुलै २०२४:
 शक्ती, कामगिरी आणि विश्वासार्हतेचा समानार्थी असलेला भारताचा नंबर 1 बॅटरी ब्रँड एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि. (EIIL) यांनी भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सुरक्षा अलार्मसह फ्लॅशलाइट – एव्हरेडी सायरन टॉर्चचे उद्घाटन केले. मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या अनोख्या सायरन फ्लॅशलाइटला 100dbA आवाजाचा सुरक्षा अलार्म आहे. याला लागून असलेली चेन खेचली जाते, तेव्हा हा अलार्म वाजतो. महिला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या या नवीन लाँच केलेल्या सायरन फ्लॅशलाइटचे उद्दिष्ट दैनंदिन जीवनातील सुरक्षा वाढविणे आहे. या नावीन्यपूर्ण उत्पादनाला ब्रँडच्या #AwaazUthaneyKaPower या नवीन मोहिमेचे पाठबळ आहे, ज्याचे नेतृत्व कर्णबधिर आणि मूक लोकांकडून केले जाते. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या उत्पादनाची आवश्यकता अधोरेखित केली जाते.
#AwaazUthaneyKaPower मोहिमेसाठी एव्हरेडीने भारतातील कर्णबधिर समुदायाला भेडसावणाऱ्या “ॲक्सेसिबिलिटी”शी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत संस्था India Signing Hands सोबत हातमिळवणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हे प्रयत्न असून ही मोहीम ओगिल्वी इंडियाने तयार केलेल्या मूक संवादाच्या शक्तीशी जोडली आहे. एकट्या राहणाऱ्या कर्णबधिर आणि मूक महिलांचे अनेक आव्हानात्मक, वेदनादायक अनुभव सांकेतिक भाषेतून सांगत चित्रपटात मांडण्यात आले आहे. एखाद्या धोकादायक परिस्थितीच्या खूप जवळ किंवा अनेकदा इव्ह-टीझिंगचा अनुभव आल्याचे त्या सांगतात. एव्हरेडी सायरन टॉर्च अशा महिलांचे संरक्षण करण्यासही सक्षम आहे, कारण आव्हानात्मक परिस्थितीत सामान्य महिला आरडाओरडा करून मदत मागतील, पण ज्या महिला मूक आहेत, त्या काय करणार? त्यांच्यासाठी या सायरन टॉर्चचा जास्त उपयोग होणार आहे. 100-डेसिबल SOS अलार्ममुळे महिला आपल्यासोबत होणारे गैरवर्तन टाळण्यासाठी इतरांकडे मदत मागू शकतील. “अब आवाज में भी उठाउंगी” या संदेशाद्वारे महिलांना सक्षम करून त्यांनी स्वतःसाठी उभे राहावे, यासाठी हा चित्रपट इतरांना प्रोत्साहित करतो.

 डॉ. किरण बेदी यावेळी म्हणाल्या, “स्त्रीची शारीरिक आणि आंतरिक सुरक्षिततेची भावना तिला सक्षम करते; तिच्या मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित वाटण्यासाठी काही वेळा बाह्य साधनांची आवश्यकता असते – मग त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अवेळी बाहेर जाणे असो किंवा दूरचा प्रवास करणे असो. एव्हरेडीचा अनोखा सायरन टॉर्च हे महिलांना सुरक्षिततेची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण सुरक्षेबद्दल कोणतीही भीती न बाळगता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आपल्याला बळ देते.”

“#AwaazUthaneyKaPower मोहिमेला पाठिंबा देताना मला अभिमान वाटतो आणि महिला सक्षमीकरणाचे आमचे सामाईक ध्येय पुढे नेण्यासाठी, तसेच सर्वांसाठी एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी माझी NGO, नवज्योती इंडिया फाउंडेशन आणि इंडिया व्हिजन फाउंडेशनसोबत ही भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असेही त्या पुढे म्हणाल्या.

श्री. अनिर्बन बॅनर्जी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि एसबीयू प्रमुख (बॅटरी आणि फ्लॅशलाइट्स), एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि. म्हणाले की, “एव्हरेडी हे प्रदीर्घ चालणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे. याच वैशिष्ट्यामुळे आम्हाला सायरन टॉर्चच्या रचनेची प्रेरणा मिळाली – एक परिवर्तनकारी उपाय जो निव्वळ कार्यक्षमतेच्या पलीकडे जातो आणि देशभरातील महिलांना सक्षम करतो, तसेच स्वप्ने पाहण्याची मुभा देतो. महिलांची सुरक्षा हा केंद्रबिंदू असल्याने, उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्णतेची आमची वचनबद्धता एक सक्षम उपकरण तयार करण्यास प्रवृत्त करते, तसेच महत्त्वाचे म्हणजे, अडचणीत असताना न ओरडताही महिलांना आवाज करण्यास सक्षम करते. गैरवर्तन टाळण्यासाठी आणि आसपासच्या लोकांना सावध करण्यासाठी हा 100-डेसिबल SOS अलार्म आहे. परवडणारे, आटोपशीर आणि अनोखे असे हे उत्पादन महिलांच्या जीवनावर लक्षणीय परिणाम करेल, याचा आम्हाला विश्वास आहे. ग्रामीण भागातील निर्जन शेतजमिनी ते शहरी भागातील रात्रीच्या एकट्या प्रवासापर्यंत सर्वांनाच त्यांच्यातील शक्ती ओळखण्यासाठी ही सायरन टॉर्च मदत करेल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि स्वत:साठी, तसेच पर्यायाने समाजासाठी एक सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी सक्षम करेल.


“आवाजहीनांचा आवाज बनणे हे सोपे काम नाही, पण जेव्हा सुजॉय आणि त्याच्या टीमला या मोहिमेसाठी मूक कलाकार वापरण्याची कल्पना सुचली, तेव्हा मात्र पुढचा मार्ग सोपा होता. पडद्यावरील कलाकारांचे मौन स्त्रियांना रोजच्या रोज तोंड द्याव्या लागणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देते. आपल्या मूक हावभावांद्वारे, चित्रपटातील पात्रे या स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या भीतिदायक, अपमानजनक गोष्टी पडद्यावर साकारतात. यातूनच प्रत्येक जण या विरोधात आवाज करायला शिकेल आणि सायलेंट टॉर्चचे काम हेच आहे,” सुकेश नायक, मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर, ओगिल्वी इंडिया यांनी टिप्पणी केली.
एव्हरेडी सायरन टॉर्च हे केवळ एक उत्पादन नाही; हे सुरक्षितता, सशक्तीकरण आणि संकट काळात आवाज उठविण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. 120 x 32 सेमी आकाराचा हा टॉर्च एक अतिशय कॉम्पॅक्ट आणि हँडबॅग अनुकूल टॉर्च आहे. तीन रंगांमध्ये, USB TYPE-B चार्जिंगच्या सोयीनुसार येणारा हा टॉर्च तीन विविध लायटिंग मोड ऑफर करतो, ज्यामुळे तो विविध परिस्थितींसाठी सक्षम मल्टीफंक्शनल डिव्हाइस बनतो. याची INR 225 ही परवडण्याजोगी किंमत असल्यामुळे हे उत्पादन बाजारपेठेत खळबळ उडवून देणारे असून, सर्व स्तरातील लोकांना घेता येईल असे आहे. #AwaazUthaneyKaPower मोहिमेद्वारे आणि प्रेरणादायी व्यक्ती, तसेच संस्थांच्या भागीदारीद्वारे, एव्हरेडी महिलांची सुरक्षा, तसेच निर्भयतेवर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५० हजाराच्या कर्जाने घेतले शेतकरी माय लेकरांचे जीव

गेवराई -कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या‎आडूला दोरीने गळफास...

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११...

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले-जखमींवर उपचाराचा सर्व खर्च...