मुंबई, ११ जुलै २०२४ – बँक ऑफ इंडियातर्फे १० जुलै २०२४ रोजी भारत सरकारला ९३५.४४ कोटी रुपयांची लाभांशाची रक्कम धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच चार कार्यकारी संचालकांनी माननीय वित्त मंत्री श्री. निर्मला सीतारामन यांना हा धनादेश प्रदान केला. यावेळी श्री. भूषण कुमार सिन्हा, सरकारी नॉमिनी संचालक, बँक ऑफ इंडिया हे ही उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रती इक्विटी शेयर २.८० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पूर्ण वर्षातील बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा ५७ टक्क्यांनी वाढला असून आर्थिक वर्ष २३ मधील ४०२३ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २४ मध्ये ६३१८ कोटी रुपयांवर गेला आहे.
भारत सरकारला यशस्वीपणे लाभांश देत बँक ऑफ इंडियाने आपली दमदार आर्थिक कामगिरी तसेच भागधारकांसाठी मूल्य तयार करण्याचे ध्येय दाखवून दिले आहे. ही कामगिरी बँकेची गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण परतावे देण्याची क्षमता अधोरेखित करणारी आहे.