पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून उंच उंच इमारतींना परवानग्या: पाणी समस्येला महापालिकाच जबाबदार

Date:

पुणे- पुण्यातील धरणे ,पाणी क्षमता, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या याकडे लक्ष न देता महापालिकेने उंच उंच उत्तुंग इमारतींना परवानग्या दिल्या आणि जेथे ५–१० नागरिक राहत, तेथे सध्या उंच इमारती होऊन ४००-५०० नागरिक राहू लागले यामुळेच पुण्यात पाण्याची अवस्था गंभीर बनत चालली आहे, ड्रेनेजची देखील दुरवस्था होते आहे. पाणी क्षमता , रस्त्यांची रुंदी … ज्या प्रमाणात बांधकामांना परवानग्या दिल्या त्या प्रमाणात वाढलीच नाही . त्यामुळे यापुढे जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणी कोटा मंजूर करवून घेतल्या शिवाय आणि पाण्याची उपलब्धता केल्या शिवाय युनिफाईड डि. सी. रूल अंतर्गत जादा एफ.एस.आय व नवीन बांधकाम परवानगी देऊ नये अशी स्पष्ट मागणी पुन्हा एकदा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे. शहरातील वृक्षतोड , डोंगरफोड या सर्वांना येथे महापालिकेचा कारभार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फक्त निसर्गावर खापर फोडणे योग्य होणार नाही महापालिकेचेही नियोजन त्यामगे आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र पाठविले आहे . त्यात म्हटले आहे कि,’
पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर बनले असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशी पाण्याची उपलब्धता सद्यस्थितीत नाही. यंदा अल निनोचा दुष्परिणाम त्यामुळे होणारा उशिरा व अपुरा पाऊस त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगांव यातील कमी पाणीसाठा हा पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणना प्रमाणे ३० लाखाच्या आसपास होती, सध्या ही लोकसंख्या पुणे मनपाचे क्षेत्रात ८० लाखाच्या पुढे गेली असून फ्लोटिंग लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पुणे शहरासाठी कायमस्वरूपी अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर होत नाही तोपर्यंत युनिफाईड डि.सी. रूल अंतर्गत वाढीव एफएसआय व नव्याने बांधकाम परवानगी देऊ नये ही आपणास विनंती आहे. जर युनिफाईड डि.सी. रूल नुसार वाढीव एफएसआय दिला गेल्यास अधिक उंच इमारती वाढून लोकसंख्येची घनता कमालीची वाढेल. तसेच मर्यादित क्षेत्रात लोकसंख्याही बेसुमार वाढेल. अनेक बांगल्यामध्ये जेथे ५–१० नागरिक राहतात, तेथे सध्या उंच इमारती होऊन ४००-५०० नागरिक राहत आहेत. अशा प्रकारे बेसुमार लोकसंख्या वाढून अन्य नागरी प्रश्न वाढतीलच शिवाय ‘पाणीबाणी’ निर्माण होऊन सध्याच्या मूळ पुणेकराना ‘पाणी पाणी’ असं आक्रोश करावा लागेल.
सध्याची पुण्याची परिस्थिती व पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता पुणेकरांचे जीवन किमान सुसह्य राहावे व पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी वेळीच खबरदारी म्हणून, जलसंपदा विभाग पुण्यासाठी कायमस्वरूपी अतिरिक्त टीमसी पाणी मंजूर करून उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत युनिफाईड डि.सी. रूल अंतर्गत अधिक एफएसआय व नव्याने बांधकाम परवानगी देऊ नये अशी विनंती मी पुनश्च आपणास करतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन- अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर

पुणे- आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या...

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज• आषाढी वारीसाठी...

खडकवासला विधानसभा मतदारसंघात ३० जूनपासून EF फॉर्म वितरण; आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन

EF form म्हणजे“मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी गणना फॉर्म” पुणे...