टाटा ऍसेट मॅनेजमेंटने भारतातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला

Date:

मुंबई,: म्युच्युअल फंड उद्योगातील आघाडीच्या टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने देशातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. यामध्ये निफ्टी ५०० चा भाग असलेल्या काही कंपन्या सामील आहेत. टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्सला (टीआरआय म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स) ट्रॅक करेल.  

हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे. गुंतवणूकदारांना प्रवास, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी देण्यासाठी हा फंड अतिशय काळजीपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. इंडेक्समधील कंपन्या आपापल्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये होत असलेले बदल आणि डिस्क्रिशनरी खर्चांमध्ये होत असलेली वाढ यामुळे त्यांना अनेक लाभ मिळत आहेत.

इंडेक्स फंडच्या लॉन्च प्रसंगी, टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री आनंद वरदराजन यांनी सांगितले, वाढते डिस्पोजेबल उत्पन्नपायाभूत सोयीसुविधांचा विकास जसे कीउत्तम हायवे कनेक्टिव्हिटीअधिक चांगल्या  वेगवान रेल्वे सुविधा  नवीन विमानतळांनी प्रवास करणे अधिक सोपेवेगवान आणि सुरक्षित केले आहेदेशांतर्गत विमान प्रवास सुविधाहॉटेल्सरेस्टोरंट आणि प्रवासामध्ये वेगाने वाढ होत आहेपर्यटन क्षेत्रासाठी हा अतिशय चांगला संकेत आहेसर्व प्रकारच्या प्रवासांमध्ये वाढ होत आहेमग तीर्थयात्रा असोव्यवसायासाठीवैद्यकीय कारणांसाठी असो किंवा सुट्टीसाठी असोत्यामुळे पर्यटन हे एक क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे आणि या क्षेत्राच्या विकासाचे लाभ मिळवण्यासाठी यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.”

टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडची सुरुवात अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गुंतवणूक व उपभोगामुळे उल्लेखनीय लवचिकता दर्शवत आहे. भारतामध्ये मध्यमवर्गामध्ये वाढ होत असल्याने इच्छा-आकांक्षा म्हणून, अनुभव मिळावेत म्हणून केल्या जाणाऱ्या प्रवासांत वाढ होत आहे, पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळत आहे, हवाईमार्ग क्षमतांचा विस्तार होत आहे, त्यामुळे प्रवास करणे अधिक सहजसुलभ बनले आहे.

त्याखेरीज तंत्रज्ञानामध्ये प्रगतीमुळे ऑनलाईन रेस्टोरंट ऍग्रीगेटर्स आणि वाढत्या डिलिव्हरी अर्थव्यवस्थेबरोबरीनेच प्रवास व रेस्टोरंट क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेगवेगळी ठिकाणे व अनुभवांची ओळख करून देत आहेत, त्यामुळे प्रवास करण्याच्या इच्छेला प्रोत्साहन मिळत आहे. श्री. वरदराजन यांनी सांगितले, “परिणामी, भारताचा प्रवास आणि पर्यटनावरील खर्च २०१९ मध्ये १४० बिलियन डॉलर्सवरून २०३० पर्यंत ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. (स्रोत: युरोमॉनिटर, सिस्टमॅट्रिक्स इन्स्टिट्यूशनल रिसर्च)”

इंडेक्स पद्धत:

टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडमध्ये सध्या १७ स्टॉक आहेत. (२१ जून २०२४ पर्यंत) त्याच्या इंडेक्स पद्धतीमध्ये पर्यटनाशी संबंधित सर्व सेगमेंट्सचे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व व्हावे यासाठी काटेकोर मापदंडांचे पालन केले जाते. इंडेक्समध्ये कमाल स्टॉक स्तराची सीमा २०% आहे. या इंडेक्समध्ये मूळ इंडेक्स निफ्टी ५०० मधून जास्तीत जास्त ३० स्टॉक असू शकतात. वैविध्य आणि जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत, इंडेक्स घटकांना फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायजेशनच्या आधारे भारित केले जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...