जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे फ्लेक्झिबल पॉवर सिस्टीम्स– स्मार्ट ग्रिड क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाला चालना दिली जाणार
मुंबई आणि बेंगळुरू- अमेरिकी २४ अब्ज डॉलर्स जेएसडब्ल्यू समूहाने त्रिपक्षीय सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. संस्थेने विश्वेवरैय्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठाशी संबंधित व कर्नाटक राज्य सरकारची मंजुरी असलेली सरकार स्वायत्त खासगी अभियांत्रिकी एमएस रामय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीने (एमएसआरआयटी) आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित सेवा व प्रशिक्षण, तसेच स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचे डिझाइन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शारिका एंटरप्रायझेस कंपनीचा विभाग शारिका स्मार्टेक यांच्यासह हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पारंपरिक ऊर्जा यंत्रणांचे नावीन्यपूर्ण सुविधांच्या मदतीने परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणेत रूपांतर केले जाणार आहे. या त्रिपक्षीय करारानुसार बेंगळुरू येथील एमएसआरआयटीच्या कॅम्पसमध्ये स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानासाठी जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स (जेएसडब्ल्यू- सीओई) स्थापन केले जाणार आहे. या करारानुसार जेएसडब्ल्यू समूह जेएसडब्ल्यू- सीओईसाठी आवश्यक वित्तपुरवठा करेल, तर एमएसआरआयटी जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना व समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावेल. शारिका स्मार्टटेक या संस्थेची नॉलेज पार्टनर असेल आणि कंपनीद्वारे जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना, कामकाज व हाताळणीसाठी मदत केली जाईल.
या सामंजस्य करारातील तीन पक्ष समाजाच्या एकत्रित शक्तीचा वापर करून सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना देऊन कर्मचारी, इंजिनीअर्स व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देतील. जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे शिक्षण, प्रशिक्षण आणि विकासासाठी प्लॅटफॉर्म पुरविला जाईल. हे अत्याधुनिक जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स शिक्षण आणि प्रशिक्षण मोड्युल्समध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी इंजिनीअरिंग व्यावसायिकांच्या नव्या पिढीला, पूरक स्टार्टअप्सना ‘लॅब एक सेवा म्हणून’ पुरवतील आणि त्या दरम्यान टेस्टिंग व सल्लासेवेच्या स्वरूपात मदत करतील. यामुळे वेगाने बदलत असलेल्या ऊर्जा यंत्रणा क्षेत्रात सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना मिळेल.
एआय, डीप लर्निंग, बिग डेटा, ब्लॉकचेन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशनच्या येण्यामुळे ऊर्जा यंत्रणा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण सुविधांची मागणी अतिशय महत्त्वाची झाली आहे. एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स आधुनिक शिक्षण, डिझाइन, विकास आणि स्मार्ट ग्रिड किंवा परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणा क्षेत्रासाठी अंमलबजावणी क्षमता पुरवेल.
स्मार्ट ग्रिड ऊर्जा यंत्रणा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत, दरम्यान इंजिनीअर्स, पदवीधर आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाला आधुनिक कौशल्ये व ज्ञान देऊन सक्षम केले जाणार आहे. त्यांच्या मदतीने एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स कुशल मनुष्यबळचा स्तर उंचावेल आणि त्यांची निर्मिती करेल. या उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सेंटर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक विकासाला चालना देईल.
एम.एस. रामैय्या नगर, एमएसआरआयटी पोस्ट, बेंगळुरू, 560054 येथे वसलेले जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स ऊर्जा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाचे केंद्र बनून या उद्योगाचा विकास आणि प्रगतीसाठी योगदान देईल.