पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

Date:

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएलसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेची खास सभा आयोजित करणार असून, त्याची तारीख गटनेत्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भिमाले म्हणाले, “आज स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीएमएल संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी सविस्तर चर्चा करण्यासाठी खास सभा घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी बस खरेदी, ताफ्याचे आधुनिकीकरण, वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या बसची समस्या, कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व इतर आर्थिक देयके, मनुष्यबळाची उपलब्धता, देखभाल-दुरुस्ती व्यवस्था तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा खास सभेत सविस्तर आढावा घेण्यात यावा असे सुचविण्यात आले.”

यावेळी पीएमपीएमएल प्रशासनाकडून विद्यमान बस ताफा, नव्या बस खरेदीची प्रक्रिया, आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, बस देखभाल व्यवस्था, महसूल वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश
भिमाले यांनी दिले.

भिमाले म्हणाले, “पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असून प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ समस्यांवर चर्चा न करता कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर खास सभेत भर दिला जाईल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

FDA अधिकारी स्वतःला देव समजतात का? मुंबई हायकोर्टाचे कार्यपद्धतीवर कडक ताशेरे

‘स्वतःचे नियम वाचत नाहीत, कायद्याची माहिती नसताना थेट कारवाई’;...

एव्हरेस्ट आणि LGच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर FSSAIची मनाई

तपासणीत गुणवत्ता निकषांचा भंग; आवश्यक ५ टक्क्यांच्या तुलनेत अल्कोहोलमध्ये...