Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नव्या पिढीसाठी ‘जॉनसन्स’ने केल्या सुधारणा, सौम्यतेची निवड करण्याची संधी

Date:

नव्या सुजाण पालकांच्या गरजा ओळखून ‘बेबी केअर’ उत्पादनांची सुधारीत श्रेणी सादर

मुंबई: आपल्या बाळाची उत्तम काळजी घेण्यास जॉनसन्स कटिबध्द आहे. नव्याने आई झालेल्या स्त्रियांच्या नेमक्या गरजा व अपेक्षा जॉनसन्स कंपनी चांगल्या प्रकारे ओळखते. बाळाचा जन्म झाल्या दिवसापासून त्याच्या काळजीची व संरक्षणाची जबाबदारी जणू जॉनसन्स घेते, हा विश्वास जगभरातील पालक, डॉक्टर, परिचालिका व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना गेल्या अनेक पिढ्यांपासून आहे. जगभरातील या पालकांच्या काही मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ‘जॉनसन्स’ने आपल्या काही उत्पादनांमध्ये काही घटक मिसळून सुधारणा केल्या आहेत. तसेच नवीन स्वरुपाचे पॅकेजिंगही केले आहे. त्यामुळे बाळांची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाईल.

‘जॉनसन अॅन्ड जॉनसन’च्या ‘बेबी केअर’ विभागाच्या जागतिक प्रमुख दीप्ता खन्ना म्हणाल्या, की ‘बेबी केअर’च्या सुविधा पुरवणे एक कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. पालकांच्या दृष्टीकोनातून ‘बेबी केअर’मधील कला चांगल्या प्रकारे समजून घेता येते. त्यामुळेच बाळाच्या त्वचेसाठी पालक जे उत्पादन निवडतील, त्याबद्दल त्यांची पूर्ण खात्री असायला हवी, असे आम्हाला वाटते. ही उत्पादने पूर्णपणे पारदर्शी असली तरच हे शक्य होईल, हे लक्षात घेऊन उत्पादनातील सर्व घटक द्रव्यांची माहिती आम्ही बाटल्यांवर छापायला सुरुवात केली आहे … अगदी उत्पादनातील सुगंध कोणत्या घटकाने निर्माण झाला, ते सुध्दा! ‘पंप पॅक्स’सारखी उत्पादने एका हातात धरून वापरता येणे, ‘पॅकेजिंग’वर ‘सेफ्टी लॉक’ची सुविधा असणे, यांसारख्या नावीन्यपूर्ण गोष्टी आम्ही अमलात आणल्या आहेत. बाळाची काळजी सुरक्षितपणे व सहजगत्या घेता यावी, याचा आम्ही यातून विचार केला आहे.

सुमारे साडेपाच लाख जणांवर चाचण्या घेतल्यानंतरच ही नवीन उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नव्याने बनवलेली उत्पादने ही बाळाची त्वचा केवळ स्वच्छ व ओलसर करण्यासाठीच उपयोगी नाहीत, तर प्रत्येक क्षणी मातेच्या हातांनी बाळाला मायेचा स्पर्श जाणवण्यासाठी व त्यांच्यातील बंध बळकट करण्यासाठीही उपयोगी आहेत.

ही नवीन उत्पादने सादर करताना ‘जॉनसन अॅन्ड जॉनसन इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक विकास श्रीनिवास म्हणाले, की बाळासाठी जे काही उत्कृष्ट असेल, ते त्याला मिळवून देण्यासाठी जॉनसन्स कंपनी मागेपुढे पाहात नाही. ‘सौम्यतेची निवड’ (चूज जेंटल) हे आमचे निव्वऴ घोषवाक्य नसून बाळाला सौम्यपणे व सुरक्षितपणे हाताळण्यासाठी पालकांना आम्ही देत असलेली हमी आहे. याकरीता ‘जॉनसन्स’चा नेहमीचा सर्वोच्च दर्जा पणाला लावण्यात आला आहे. जगभरातील अनेक पालकांची मते विचारात घेतल्यावंतर आम्ही उत्पादनांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत व एक नवीनच परिमाण निर्माण केले आहे.

उत्पादनांमध्ये केलेल्या काही महत्वाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे

  • घटक मूलद्रव्यांच्या संख्येत कपात : उत्पादनांमध्ये भरमसाट घटक द्रव्यांची संख्या असण्यापेक्षा आवश्यक तितकीच ती ठेवणे श्रेयस्कर आहे, हे लक्षात घेऊन आम्ही या घटकद्रव्यांची संख्या निम्मी केली आहेत. पॅराबेन्स, थॅलेट्स, फॉरमॅल्डिहाईड यांसारखी प्रीझर्व्हेटिव्हज आणि सल्फेट यांचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. सर्व जगात अतिशय लोकप्रिय असलेला ‘जॉनसन्स’चा शॅम्पूदेखील त्याच्या नेहमीच्या सोनेरी रंगात बनविण्याएेवजी पारदर्शी स्वच्छ रंगात बनवून तशाच पारदर्शक पिवळ्या रंगाच्या बाटलीतून सादर करण्यात आला आहे.
  • सुधारीत अनुभूती : ‘जॉनसन्स’चे प्रत्येक उत्पादन आता अधिक सौम्य आणि पालकांना वेगळी अनुभूती देणारे असेल. जास्त फेस येणारा परंतु त्वरीत धुतला जाणारा शॅम्पू, केसांची निगा राखण्यासाठी सुधारीत स्वरुपाचे कंडिशनिंग, तसेच त्वचेत लवकर मुरणारी आणि तेलकटपणा नसलेली हलक्या स्वरुपाची लोशन्स ही नवीन श्रेणीची वैशिष्ट्ये आहेत.
  • पालकांना व्यवस्थित हाताळता येईल, असे पॅकेजिंग : बाळाला अंघोळ घालताना पालकांना येणारा नेहमीचा अनुभव म्हणजे बाळाचे अंग निसरडे होणे. नवीन उत्पादनांचे आकार व पॅकेजिंग हे नावीन्यपूर्ण पध्दतीने बनवून, या उत्पादनांच्या बाटल्या एका हातात धरून बाळाला अंघोळ घालता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा हात मोकळा राहून त्या हातात बाळाला सुरक्षितपणे सांभाळणे पालकांना शक्य होईल.
  • जागतिक गुणवत्ता : ‘जॉनसन्स’ची उत्पादने शंभर टक्के सौम्य असतात. त्यांतील सुगंध निर्माण करणारी घटक द्रव्येदेखील ‘इंटरनॅशनल फ्रेग्रन्स असोसिएशन’च्या निकषांनुसार असतात. तसेच त्यांच्यावर सुरक्षाविषयक 5 टप्प्यांची प्रक्रिया झालेली असते.
  • सुगंधित उत्पादनांमध्ये 25 टक्क्यांहून कमी प्रमाणात सुगंधित द्रव्ये असून ती अतिशय शुध्द स्वरुपात असतील, याची खात्री केली जाते.
  • सुगंधित द्रव्यांमध्ये घातक द्रव्ये अजिबात नसतील वा नंतरही निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.

‘बेबी केअर’च्या क्षेत्रात काही निश्चित मापडंद निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘जॉनसन्स’मध्ये काम करण्यात येते. ‘बेबी केअर’साठी सर्वोत्कृष्ट दर्जा उपलब्ध करून देण्याच्याच उद्देशाने सौम्यतेची निवड या श्रेणीची निर्मिती झाली आहे. आमच्या संशोधनामध्ये शास्त्रीय पुरावा महत्वाचा मानला जातो. बाऴाच्या त्वचेचे मूलभूत ज्ञान मिळवण्यायाठी उपलब्ध असलेल्या शास्त्रीय माहितीमध्ये आम्ही मोलाची भर घातली आहे. आमच्या उत्पादनांमधील प्रत्येक घटक द्रव्याची चाचणी 12 महिने इतक्या कालावधीसाठी घेतली जाते. त्यानंतरच ती द्रव्ये सुरक्षित म्हणून गणली जातात, असे ‘जॉनसन अॅन्ड जॉनसन’च्या संशोधन व विकास विभागाचे वरिष्ठ संचालक राम शुक्ला यांनी सांगितले.

‘जॉनसन्स’ने केलेल्या संशोधनाचामुळे बाळाच्या त्वचेच्या निगेबाबत नवीन मापदंड निर्माण झाले आहेत. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स’ (आयएपी) आणि ‘ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया’ (टीएनएआय) यांनी ते मान्य केले आहेत. ‘जॉनसन्स’चे प्रत्येक उत्पादन हे अमेरिकन व युरोपीय निकषांवर खरे उतरते.

‘जॉनसन्स’विषयी ..

क्लिनिक चाचण्यांमधून सौम्यतेची खात्री देणाऱ्या उत्पादनांमुळे, मातांमध्ये ‘बेबी केअ’रच्या बाबतीत ‘जॉनसन्स’चे नाव विश्वासार्ह ठरले आहे. तसेच डॉक्टरांनीदेखील ‘जॉनसन्स’च्या नावाची शिफारस गेली 120 वर्षे केलेली आहे. मुलांच्या नाजूक त्वचेला आरोग्यदायी ठेवण्यासाठी काय करावे लागते याबाबतचा हा ‘जॉनसन्स’चा वारसा अतिशय घट्ट असून त्यामुळेच भारतातील मातांमध्ये ‘जॉन्सन्स बेबी’ हा सर्वात प्रिय ब्रॅंड ठरला आहे. सुरक्षित आणि सौम्य उत्पादने सादर करण्याच्या पलिकडे जाऊन बाळाच्या त्वचेची संपूर्ण काळजी घेण्यात व त्याच्या सर्वांगामध्ये चैतन्य निर्माण करण्यात ‘जॉनसन्स’ला जास्त रस आहे. जगभरातील बालकांच्या आयुष्याची सुरुवात उत्तम प्रकारे व्हावी आणि त्यांच्या पालकांना व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना त्या सुरुवातीच्या संगोपनामध्ये स्वतः सहभागी होता यावे, हे ‘जॉनसन्स’साठी महत्वाचे कार्य आहे. बाळाचे संगोपन करीत असताना त्याला अधिकाधिक चांगल्या गोष्टी द्याव्या लागतात, हे ‘जॉनसन्स’ला कळते. त्यामुळेच बाळाच्या संगोपनाचे शास्त्र विकसीत करून त्यात निश्चित मापदंड निर्माण करण्याचे ‘जॉनसन्स’चे काम अव्याहतपणे सुरू आहे. ‘जॉनसन्स’ची बालकांसाठी व मोठ्यांसाठीची उत्पादने 175 देशांमध्ये उपलब्ध असून आतापर्यंत 8 अब्ज बालकांना या उत्पादनांचा लाभ झालेला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...