मुंबई: के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने (केसीएमईटी) के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अब्रॉडसाठी आलेल्या 1066 अर्जांपैकी 82 उमेदवारांना शिष्यवृत्ती दिल्याचे आज जाहीर केले. भारतातील सर्वोत्तम व गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या हेतूने दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीच्या धारकांच्या संख्येत या वर्षी 45% वाढ झाली असून एकूण शिष्यवृत्त्यांचे मूल्य 2.92 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. निवडण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये, आयआयटीमधून ग्रॅज्युएट झालेले 23 विद्यार्थी आहेत व उर्वरित विद्यार्थी बिट्स पिलानी, एसआरसीसी, नॅशनल लॉ स्कूल्स, सिम्बायोसिस, सेंट झेविअर्स, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व एनआयडी अशा अन्य नामवंत शैक्षणिक संस्थांमधले आहेत. उमेदवारांनी परदेशातील सर्वोधिक क्रमवारीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले आहेत – हार्वर्ड स्टॅनफर्ड, कोलंबिया, कार्नेज मेलन, यूसी बार्कले, पेनसिल्व्हानिया, ऑक्सफर्ड, एलएसई व केम्ब्रिज. विद्यार्थी कम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग, एमबीए, लॉ, पब्लिक पॉलिसी व अर्थशास्त्र अशा विषयांत पोस्ट-ग्रॅज्युएशन करत आहेत.
दोन दिवस मुलाखती घेतल्यानंतर, के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे चेअरमन इमेरिटस केशुब महिंद्रायांनी सांगितले, “सकारात्मक बदल करण्यासाठी शिक्षण हे सर्वोत्तम शस्त्र असते आणि त्यासाठी दरवर्षी देशातील सर्वोत्तम व गुणवान विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थी स्वतःचा ठसा निर्माण करतील आणि देशाचे ऋण फेडून उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान देतील, याची खात्री आहे.”
निवड समितीमध्ये विविध मान्यवरांचा समावेश होता – केशुब महिंद्रा, चेअरमन इमेरिटस, महिंद्रा अँड महिंद्रा लि.; आनंद महिंद्रा, अध्यक्ष,महिंद्रा समूह; भारत दोशी, अध्यक्ष, महिंद्रा इंटरट्रेड लि.; उल्हास यारगॉप, समूह अध्यक्ष – आयटी सेक्टर, ग्रुप सीटीओ व समूह कार्यकारी मंडळाचे सदस्य, महिंद्रा अँड महिंद्रा लि.; डॉ. इंदू शहानी, संस्थापक डीन – इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंट्रप्रिन्युअरशिप (आयएसएमई) व अध्यक्ष, इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन; रंजन पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सल्लागार, ग्लोबल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट कन्सल्टंट अँड चेंज मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि ऐश्वर्या रामकृष्णन, अध्यक्षांचे ईए, महिंद्रा समूह. या समितीने, निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या दोन दिवस मुलाखती घेतल्या आणि मुलाखती दिलेल्या सर्व 82 उमेदवारांना के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अब्रॉड देण्याची शिफारस करण्यात आली.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले, “शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी आम्हाला मिळणाऱ्या अर्जांच्या संख्येमध्ये व गुणवत्तेमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. प्रत्येक अर्जाचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे आणि ते खरेच प्रेरणादायी आहे. प्रगती करण्यासाठी उमेदवार या संधीचा योग्य उपयोग करतील आणि वैविध्यपूर्ण व महत्त्वपूर्ण मार्गांनी भारताला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.”
संस्थापक के. सी. महिंद्रा यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टने सुरू केलेली ही पहिली शिष्यवृत्ती आहे आणि गुणवान भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी यामुळे संधी दिली जात आहे.
के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (केसीएमईटी)
देशात साक्षरता व उच्च शिक्षण यांना चालना देण्याच्या हेतूने दिवंगत के. सी. महिंद्रा यांनी सन 1953 मध्ये के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टची (केसीएमईटी) स्थापना केली. शिक्षणाद्वारे, आर्थिक सहाय्य व ओळख देण्याच्या माध्यमातून भारतातील सर्व वयोगटातील व उत्पन्न गटातील लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याच्या उद्देशाने, केसीएमईटीने अनेक शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत.स्थापनेपासून, या उपक्रमांनी निधी, शिष्यवृत्ती व कर्जे या स्वरूपात 3763.25 दशलक्ष रुपयांची (64.95 दशलक्ष डॉलर) तरतूद करून अंदाजे 400,000 पात्र व गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवले आहेत.
महिंद्राविषयी 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.