Home Blog Page 19

‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुण्यात आंदोलन:अभिजीत दिपकेंच्या सरकारकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

पुणे-

कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन केले . पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले यावेळी आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी विविध अशयांचे पोस्टर्स सोबत आणले होते. एका पोस्टरवर लिहिले होते, ‘देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि पेपर फोडण्यात धर्मेंद्र’. एकूणच विद्यार्थ्यांकडून चांगलाच प्रतिसाद या आंदोलनाला मिळत असल्याचे दिसत आहे.यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांना या लोकांमुळे आत्महत्या करावी लागली आहे. तरी सुद्धा हे लोक बिनलाजासारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत. या सिस्टममुळे या विद्यार्थ्यांना जीव द्यावा लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यावर सरकारने कारवाईमध्ये बदली केली आहे, राजीनामा घेऊ शकले नाहीत.

https://www.facebook.com/MyMarathiNews/
(व्हिडीओ पहा आमच्या फेस बुक पेजवर )https://www.facebook.com/share/v/18MSWweomQ

सोनम वांगचूक म्हणाले, आपल्या देशात असे म्हटले जाते की ‘तमसो मा ज्योतिर्गमय’. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण आणि पर्यावरण हे दोन माझे मुद्दे आहेत. सत्य आणि अहिंसा माझा मार्ग आहे आणि न्याय हे माझे ध्येय आहे. पुढे ते म्हणाले, जो अन्याय परीक्षांमध्ये होत आहे, मला तर शिक्षणात मोठा अंधकार दिसत आहे. परीक्षेतही घोटाळे व्हायला लागले तर विद्यार्थी कुठे जाणार? याचे उत्तर आपण मागितले पाहिजे.

सोनम वांगचुक म्हणाले, अंधकार मधून उजाळाकडे गेले पाहिजे. शिक्षण आणि पर्यावरण हे जीवनातील महत्वाचे घटक आहे. दिपके यांनी शिक्षण अनुषंगाने आंदोलन सुरू केले हो बाब आनंददायी आहे. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य यांची भूमी आहे त्याला मी नमन करतो. शिक्षण क्षेत्रात अन्याय होत आहे. शिक्षणात मला अंधकार दिसत असून पेपर फुटीचे प्रकार दुर्देवी आहे. अशावेळी सरकार नेमके काय करत आहे. विद्यार्थी यांचे नुकसान झाल्यावर त्यांनी कुठे जायचे हा प्रश्न निर्माण होतो आहे. जे चुकीचे घडत आहे त्याला जबाबदार कोणाला तरी धरले गेले पाहिजे. सरकारने नीट परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करणे गरजेचे आहे जे तळागाळात जातील. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकले नाही पाहिजे. लोकशाही मध्ये लोकांनी उत्तर मागितल्यावर त्याचे उत्तर दिले गेले पाहिजे. आंदोलन सरकार विरोधात नसून ज्या चुका आहे त्या दुरुस्त करून सरकारने पुढे गेले पाहिजे. जे चाटूगिरी करतात ते खरे नसून जे दोष दाखवून देतात ते समजून घेतले पाहिजे. पर्यावरण बाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. मला पुणे आणि महाराष्ट्र मधून आशेची किरण दिसत आहे. सत्य आणि अंहिसा आमचा रस्ता आहे. मीडियाने देखील सत्याची कास धरावी. पंतप्रधान यांनी मन की बात मधून मिडियाला स्वातंत्र द्यावे. मिडिया जोपर्यंत स्वच्छ नसेल तोपर्यंत खरी माहिती लोकांपर्यंत पोहचणार नाही. अहिंसामुळे दिल्ली मध्ये आंदोलनास सरकारकडून परवानगी दिली गेली. न्याय मिळवणे आपले लक्ष्य आहे.

तुमच्या सर्वांच्या शक्तीमुळे मला अटक नाही झाली- अभिजीत दिपके

यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, मला जरी अटक झाली तरी चालेल कारण मला माहीत होते की तुम्ही लोक हे आंदोलन पुढे चालवणार. तुमच्या शक्तीमुळेच मला हे लोक अटक करू शकले नाहीत. मी जेव्हा अमेरिकेतून निघालो तेव्हा माझी आई खूप रडली. जेवढी मी अमेरिकेला जाताना रडली नव्हती. कारण तिला भीती होती की माझ्यासोबत बरेवाईट होईल. ही भीती असंख्य पालकांना वाटत असते. मला हेच सांगायचे आहे की तुमच्या मुला-मुलींना बोलवण्यापासून थांबवू नका. जेलमध्ये मी जाईल, पण त्यांना बोलू द्या.

पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, जेव्हा मी हे सुरू केले यात तुमच्या सर्वांचा देखील राग होता. जंतर-मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा ते पूर्ण भरले होते. तिथल्या पेक्ष जास्त कॉकरोच पुण्यात येतील असे मी म्हटले होते आणि ते झाले आहे. आम्ही काय मागत आहोत? विद्यार्थ्यांसोबत जो अन्याय झाला आहे त्यांची जिम्मेदारी घेतली पाहिजे. कधीपर्यंत बिनलाजाप्रमाणे खुर्चीवर बसून राहणार? जे आपले विश्वगुरु आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यासाठी हे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत की तुमचा मंत्री? असा सवाल दिपके यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून विचारला.

अभिजीत दिपके म्हणाले, सोनम वांगचूक देशातील सर्वात चांगले एज्युकेशनिस्टया आहेत, त्यांना शिक्षा मंत्री करण्याच्या ऐवजी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगात टाकायची गरज काय आहे? जर तुम्ही नीट काम केले असते तर मला अमेरिकेतून इथे यायची गरज पडली नसती.

यापुढे हिंदू-मुस्लिम राजकारण नाही चालणार

मागच्या 10-12 वर्षात जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपले काय नुकसान होत आहे ते आता आपल्याला कळत आहे. देशात नुसते हिंदू-मुसलमान सुरू आहे. त्यांना हेच करायचे आहे. जेव्हा तुम्ही हिंदू म्हणून किंवा मुसलमान म्हणून विचार कराल तेव्हा तुम्ही शिक्षणाचा विचार करणार नाही, महागाईचा विचार नाही करणार, यापुढे आता हिंदू-मुस्लिमचे राजकारण नाही चालणार. याच गोष्टीमुळे आपल्याकडे 40 टक्के पेक्षा जास्त बेरोजगारी आहे. आपल्याला काय मिळत आहे? रस्त्यावर खड्डे मिळत आहेत. आपल्याला कोसळणारे पूल भेटत आहेत, त्यात हिंदूही मरत आहेत आणि मुस्लिमही मरत आहेत. सगळे जग पुढे चालले आहे आणि आपण काय करतोय? यापुढे कोणीही हिंदू मुस्लिमच्या राजकारणात पडणार नाही.

20 तारखेला सगळे विद्यार्थी दिल्लीला येतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असेही दिपके यांनी यावेळी जाहीर केले आहे. शनिवारपर्यंत राजीनामा नाही घेतला तर आम्ही 20 तारखेला दिल्लीत येणार, असा पुन्हा एकदा इशारा दिपके यांनी दिला आहे.

टीकेला प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की हे अराजक तत्त्व आहे. मला त्यांना विचारायचे आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? संविधान हातात घेतले होते, त्याला अराजक म्हणाले होते, मला सांगा संविधानात कुठे लिहिले आहे की पहाटे शपथविधी घेऊ शकता? असा सवाल देखील अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.

मागण्या:

1.पेपरलीक जेव्हा जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला 10 हजार देण्यात यावे. जर एखादी परिसखा ऐनवेळी रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली तर सरकारने विद्यार्थ्यांना ताबडतोब 10 हजार रुपये भरपाई दिली पाहिजे. परीक्षा रिजल्टला जितके महीने उशीर होईल तसेच रिजल्ट उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिजल्टला जितके महीने उशीर होईल तितके महीने प्रती महिना 10 हजार द्यावे लागतील.

  1. 72 तासांच्या आत बॅकअप डेलि एक्झॅमचे आयोजन केले पाहिजे. प्रत्येक मोठ्या परीक्षेचा बॅकअप तारीख ठरली पाहिजे.
  2. हे जे ओएसएम चालू आहे, विद्यार्थी हाताने परीक्षा लिहीत आहेत, तर ते पेपर सुद्धा तुम्हाला फिजिकलीच तपसावे लागतील. ते ऑनलाइन चेक करून चालणार नाही.
  3. उशिरा होणाऱ्या परीक्षेत वयोमार्यादेत सवलत देण्यात यावी. कारण हे तुमचे अपयश आहे, विद्यार्थ्यांचे नाही.
  4. परीक्षेच्या 7 दिवस आधी कम्प्युटर टेस्टचे ऑडिट झाले पाहिजे.

आणि अजून एक मागणी आहे की जे एनसीआरटीमधून मराठा साम्राज्याचा नकाशा काढला आहे तो परत आणावा लागेल, अशी मागणी देखील दिपके यांनी यावेळी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे.

या आंदोलनासाठी पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील मनुष्यबळ, वाहतूक शाखेची पथके आणि इतर विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परिसरात आणि प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे आंदोलन आज सायंकाळी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सुरू होणार आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार, या आंदोलनात 3 ते 4 हजार विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवार सहभागी होऊ शकतात.

पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यामुळे विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतील युवक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी संपूर्ण कार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीचा आरोप आहे की, देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. विशेषतः नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद आणि विविध भरती प्रक्रियांतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.

6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पहिले मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे घालून निषेध नोंदवला होता. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली.

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’अभिवाचन, नृत्य, नाट्य, संगीतातून उलगडले कुसुमाग्रज

रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद

पुणे : ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ अशी गीते, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’, ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ आदी काव्यरचना, ‘नदी बाई माय माझी’, ‘हासरा लाजरा श्रावण आला’ अशा गीतांवर सादर करण्यात आलेला नृत्याविष्कार, ‘कणा’ ‘गाभारा’ तसेच ‘लिलाव’ या काव्यांचे नाट्य रुपांतर आणि अभिवाचनातून कुसुमाग्रज उलगडत गेले.

निमित्त होते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर आधारित ‘गगनीचा अढळ तारा’ हा अभिवाचन, नाट्य, नृत्य, संगीतमय कार्यक्रमाचे. रसिक कलारंजन पुणे तर्फे भरत नाट्य मंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी २५ कलाकारांच्या सहभागातून हा अनोखा कार्यक्रम भरत नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला. बाल कलाकारांपासून ज्येष्ठ कलकारांनी आपल्या अभिनय कौशल्यातून रसिकांना खिळवून ठेवले.

कार्यक्रमाचे संहिता लेखन अंजली दफ्तरदार यांचे होते तर दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी, नृत्य दिग्दर्शन सुचित्रा मेडदकर आणि संगीत संयोजन अभिजित पाटसकर यांनी केले.

माणसाच्या मनातील गाभाऱ्यातल्या देवाला शोधणाऱ्या कुसुमाग्रजांनी विषयांच्या चौकटीत बांधता न येणारे काव्य निर्माण केले. त्यांच्या काव्य रचनांमधून वंचित समाजाविषयी असलेली कणव, त्यांचे दु:ख पाहून आलेला हताशपणा, शेतकऱ्यांच्या दुर्दशेतून मनाला झालेल्या वेदना, मायभूमीचे, मातीचे प्रेम, राष्ट्रासाठी असलेली ओढ, स्वातंत्र्यदेवीची महती अशा विविध विषयांवरील साकारलेले काव्य, नाट्य रसिकांना विशेष भावले.

अनेक थोर साहित्यिकांशी कुसुमाग्रज यांचे असलेले मैत्र, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण तसेच नाट्यप्रसंग

विशेष दाद मिळावून गेले. कुसुमाग्रज यांनी साध्या-सोप्या, कमी जोडाक्षरे असलेल्या रचना बाल कलाकारांनी अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना आनंदीत केले.

कुटुंबात तात्या म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज स्वभावाने कसे मिश्किल होते, त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या, त्यांचा संवेदनशील स्वभाव कसा होता आदी वैशिष्ट्ये अंजली दफ्तरदार, अनुराधा कुलकर्णी, दिपाली निरगुडकर यांच्या प्रभावी अभिवाचनातून रसिकांसमोर उलगडली.

साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे विचार असणाऱ्या कुसुमाग्रज यांनी उत्तमोत्तम नाटकांचे लेखन केले आहे. त्यातील ‘नटसम्राट’ या सुप्रसिद्ध नाटकातील प्रसंग ज्येष्ठ कलाकार अरुण पटवर्धन यांनी ताकदीने सादर केले. ‘गर्जा जयजयकार’, ‘आवडतो मज अथांग सागर’, ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’, ‘जाता जाता गाईन मी’, ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ आदी गीते सादर करण्यात आली. संध्या कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य देवीची कविता ऐकवून रसिकांना स्तिमित केले. ‘पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ या काव्याच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद देत वन्समोअरची मागणी केली.

कधी हसायला तर कधी विचार करायला लावणाऱ्या, देशप्रेम जागृत करणाऱ्या, डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृतींचे प्रभावी सादरीकरण पाहून रसिक भारावून गेले.

कार्यक्रमात शुभ्रा सातभाई, आद्या सोहनी, अवनी कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, प्रज्ञा समर्थ, धनश्री रत्नालिकर, श्वेता सोहनी, हर्षदा टिल्लू, प्रसन्न सोहनी, स्वप्नील सातभाई, श्रीशैल शेलार या कलाकारांचा सहभाग होता. तर मधुमिता देवधर, अभिजित नांदगावकर (गायन), अमोल भट (तबला), रोहित गरुड (सतार) यांची साथ लाभली.

सुरुवातीस भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी प्रमुख कलाकारांचा सन्मान केला. चारुलता पाटणकर यांनी भरत नाट्य मंदिराच्या सांस्कृतिक उपक्रमांची तर बिपिन दफ्तरदार यांनी रसिक कलारंजन संस्थेविषयी माहिती सांगितली.

वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख ; पावसाळ्यात व्यापक मोहीम

पुणे : शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुणे महापालिकेकडून यंदाच्या पावसाळ्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात शहरात ५० लाख झाडे लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य दिले जाणार असून शहरातील टेकड्या, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.

वृक्षलागवड मोहिमेत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील टेकड्यांवर वृक्षलागवड करण्यासंदर्भात लवकरच महापालिकेत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये नियोजन निश्चित केले जाणार आहे.

दरम्यान, विकासकामांच्या नावाखाली जुनी आणि ऐतिहासिक झाडे तोडण्यास परवानगी देता कामा नये, अशी भूमिका भिमाले यांनी स्पष्ट केली. शंभर, दीडशे किंवा दोनशे वर्षांपूर्वीची झाडे जतन करणे ही महापालिकेची जबाबदारी असून विकासकामे थांबली तरी चालतील, मात्र अशा झाडांची तोड होऊ नये, असे त्यांनी सांगितले.

बेकायदेशीररीत्या झाडे तोडणाऱ्या किंवा काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकरणांत संबंधितांना निलंबित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. झाडांबाबत महापालिकेच्या नियमावलीत जे नियम आहेत त्यांचे काटेकोर पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादे झाड काढावे लागल्यास त्याबदल्यात किमान दुप्पट झाडे लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड या दोन्ही बाबींवर समान भर दिला जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने विविध ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा विस्तार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याअंतर्गत संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंगची पुनर्बांधणी करून अधिक क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार सुरू असून, शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही ‘बांधा वापरा आणि हस्तातंरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नवीन पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

सध्या बंद असलेले संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्या जागेवर अधिक वाहनक्षमतेचे आधुनिक बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आणि बदलत्या आकारमानाचा विचार करून नव्या पार्किंगची रचना करण्यात येणार आहे. विशेषतः मोठ्या वाहनांच्या उंचीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले जाणार असल्याची त्यांनी सांगितले.

याशिवाय मंडई, नारायण पेठ आणि संभाजी उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठरावीक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पार्किंग क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.

या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. अहवालातील शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

शिक्षण समितीच्या मार्फत आकांक्षा फाउंडेशनचा प्रस्ताव सादर करण्याच्या भिमालेंच्या सूचना

पुणे : पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळा पुढील नऊ वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला असून, त्यासाठी सुमारे १०१.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर न आणता थेट स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर फेरविचार करुन शिक्षण समितीच्या मार्फत हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशन या खासगी संस्थेला प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष २५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव होता. सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थ्यांच्या आधारावर हा खर्च दरवर्षी ११ कोटी २५ लाख रुपये इतका होणार असून, नऊ वर्षांच्या करार कालावधीत महापालिकेवर तब्बल १०१ कोटी २५ लाख रुपयांचे आर्थिक दायित्व येणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर एवढा मोठा भार पडणार आहे. याचा विचार करुन त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळेच प्रस्तावावर फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

सोमवार पेठ, भवानी पेठ, बोपोडी, येरवडा आणि कोरेगाव पार्क येथील इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा सध्या आकांक्षा फाउंडेशनमार्फत चालविल्या जात आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या इमारती, वीजबिल, देखभाल-दुरुस्ती, विद्यार्थ्यांचे गणवेश, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), मध्यान्ह भोजन आणि इतर मूलभूत सुविधा यांचा खर्च महापालिकाच करीत आहे.

पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; सुमारे ७० टक्के करारनामे जमा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ११ जून : प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून सुमारे ७० टक्के करारनामे जमा झाले आहेत. त्यासाठी आता पर्यंत ९५०कोटी रुपयांचे वाटप झाले असून २००० कोटी रुपये पुढच्या आठवड्यात प्राप्त होतील. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादन करताना काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्र आणि इतर महसुली प्रक्रिया प्रलंबित आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी त्यास काहीसा कालावधी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. संबंधित सर्व बाबींचा विचार करून जमीन अधिग्रहणास सहमती व मोबदला स्वीकारण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डुडी यांनी स्पष्ट केले.

या मुदतवाढीमुळे प्रलंबित कागदपत्रे आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ

पुणे, दि. 11: केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मार्जिन मनी योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५ टक्के रकमेपैकी जास्तीत जास्त १५ टक्के सबसिडी (मार्जिन मनी) राज्य शासनामार्फत देण्यात येते. लाभार्थ्यांनी १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी वितरित करण्यात येते.

इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

नदीपात्रात घोड्यांचे तबेले अन घोडागाड्यांचे अतिक्रमण

पुणे-पुण्यात पावसाने अद्यापही एन्ट्री केलेली नाही पण या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नदीपात्रात घोड्यांचे तबेले अन घोडागाड्यांचे अतिक्रमण आता कायमच दिसून येऊ लागले असून क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी तक्रार करताच अतिक्रमण विभागाचे सोमनाथ बनकर
यांनी तातडीने यावर कारवाई केली आहे. मात्र हि कारवाई तेवढ्यापुरती ठरणार यात पुणेकरांना कोणतीही शंका उरलेली नाही .

याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे कि,’बाबा भिडे पुल ते राजपूत वीट भट्टी ह्या नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत. अधूनमधून नागरिकांनी तक्रारी केल्या की कारवाई चा फार्स केला जातो आणि पुन्हा ” आहे ते आहेच ” !!आता तर बाबा भिडे पुलाजवळ जेथे खाद्य पदार्थांची चौपाटी आहे तेथे किमान 20 घोडागाड्या उभ्या असतात आणि पुलाखाली तर तबेलाच झाला आहे. येथे घोडे बांधलेले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. अर्थातच यांस मनपा प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नसावी असा आमचा समज आहे.पुणेकरांना आता याची सवय झाली असून ” हे असेच चालायचे ” असं म्हणून नागरिक निमूटपणे सहन करतात. या उद्योगामागील अर्थपूर्ण संबंधाची माहिती सर्वांनाच आहे,मात्र ” अतिक्रमण ” या विषयावरील पुणेकरांच्या भावना तीव्र असून नागरिकांचे मौन ही वादळापूर्वीची शांतता आहे याची नोंद घ्यावी.असेही त्यांनी म्हटले आहे.


सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा;पहा वेळापत्रक

0

महापौर,सभागृहनेते ,अतिरिक्त आयुक्तांचे नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन

पुणे:
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर २०२६) सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या अत्यंत मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवार दिनांक १५ जून २०२६ पासून पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे ,सभागृहनेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले , अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर , पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

धरणांमधील सद्यस्थिती:
खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या केवळ ५.०३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी पुणे मनपासाठी प्रत्यक्ष वापरायोग्य पाणी फक्त ३.० टीएमसी इतकेच आहे. हे प्रमाण शहराच्या नेहमीच्या पाणी वाटपाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे आगामी काळातील टंचाई टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

नागरिकांसाठी महापालिकेची नियमावली व आवाहन:

  • बांधकामासाठी पिण्याचे पाणी बंद: कोणत्याही बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. त्यासाठी एसटीपीचे (STP) पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरावे.
  • गळती रोखा: घरातील तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहातील नळ, फ्लश टाक्या आणि पाईपलाईनची गळती तातडीने दुरुस्त करावी. शासकीय आणि मनपा इमारतींमधील गळती थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • वाशिंग सेंटर्स बंद: सार्वजनिक आणि खाजगी वाहन धुण्याची सेंटर्स (Washing Centers) बंद ठेवण्यात यावीत. वाहने, अंगण किंवा पदपथ धुण्यासाठी पालिकेचे पाणी वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • स्विमिंग पूल व उद्याने: खाजगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल, तसेच उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद करावा.
  • सोसायट्यांसाठी नियम: ज्या खाजगी सोसायट्यांमध्ये एसटीपी (STP) प्लांट आहेत, त्यांनी ते सुरू ठेवून त्या पाण्याचा पुनर्वापर गार्डनिंग व फ्लशिंगसाठी करणे बंधनकारक आहे.
  • अपव्यय टाळा: आंघोळ, भांडी आणि कपडे धुण्यासाठी गरजेपुरतेच पाणी वापरावे. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अनधिकृत नळजोडांवर कारवाई: शहरात कुठेही अनधिकृत नळजोड आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल आणि संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातील.
    तक्रारींसाठी संपर्क:
    पाणी कपातीच्या काळात पाणीपुरवठा विषयक काही तक्रार असल्यास नागरिकांनी 1800-1030-222 या टोल फ्री क्रमांकावर, 9689900002 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ‘Pmc Care App’ वर संपर्क साधावा. तसेच वेळापत्रकातील तातडीच्या बदलांची माहिती पालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर दिली जाईल.

पाण्याचे संपूर्ण पुण्यातील विविध भागातील वेळापत्रक पाहण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजवर https://www.facebook.com/share/p/1B85Gtnvyz/ महापालिकेचे अधिकृत पत्रक पाहू शकता



१. चतुशृंगी विभाग (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
पर्वती एलएलआर व एसएनडीटी एमएलआर
१. श्री. प्रवीणकुमार भावसार (उप अभियंता): ९६८९९३११४४
२. श्री. राजेश खाडे (उप अभियंता): ९६८९९३१६०७
३. श्री. ऋतुराज दीक्षित (कनिष्ठ अभियंता): ९०११८७३४३६
४. श्रीमती वैशाली भूक्तर (कनिष्ठ अभियंता): ९७६४४०१७७७ (प्रभाग क्र. २९)
सम तारीख
आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचनगल्ली, भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, राजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण
सकाळी ५.०० ते ११.००
एचएलआर
१. श्री. प्रवीणकुमार भावसार (उप अभियंता): ९६८९९३११४४
२. श्री. ऋतुराज दीक्षित (कनिष्ठ अभियंता): ९०११८७३४३६
सम तारीख
१. मॉडेल कॉलनी, हनुमान नगर, वढारवाडी, शिवाजीनगर, रेव्हेन्यू कॉलनी
दुपारी ३.०० ते रात्री ८.०० सम तारीख
२. जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर, आशानगर
रात्री ८.०० ते ०१.३०
चतुशृंगी टाकी, होळकर टाकी व विद्यापीठ टाकी
१. श्री. अनुप गजलवार (प्र. उप अभियंता): ७७४९९०९०२०
२. श्री. अजय खामकर (कनिष्ठ अभियंता): ९६८९९४२२२३
३. श्री. राहुल गव्हाणे (कनिष्ठ अभियंता): ९६३७४९३३५०
सम तारीख
१. बोपोडी

सकाळी ४.०० ते ९.००


सम तारीख
२. चिखलवाडी
रात्री ११.०० ते १.००


सम तारीख
३. एनसीएल, अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर
सकाळी ८.०० ते ३.००


सम तारीख
४. बाणेररोड उजवी बाजू, माउली पेट्रोल पंपापर्यंतचा सर्व भाग
दुपारी १.०० ते ५.३०


सम तारीख
५. औंध गाव, प्रिझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत
दुपारी ३.०० ते १०.००

१. श्री. प्रवीणकुमार भावसार (उप अभियंता): ९६८९९३११४४
२. श्री. अनंता संकपाळ (कनिष्ठ अभियंता): ९३७३७९१२३६
सम तारीख
६. भोसले नगर, अशोकनगर, रेंजहिल, खैरेवाडी
दुपारी १.०० ते ५.००
चांदणी चौक टाकी (बी.पी.टी.) (सुस टाकी, बाणेर टाकी, पंचवटी टाकी)
१. श्री. अनुप गजलवार (प्र. उप अभियंता): ७७४९९०९०२०
२. श्री. किरण अहिरराव (कनिष्ठ अभियंता): ८२७५५८७२५३
३. श्री. अस्मिता गोरे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३८८०५
सम तारीख
१. संपूर्ण बालेवाडी, बालेवाडी गावठाण
२. मोहन नगर
दुपारी २.०० ते ८.३०
(मोहन नगर: सकाळी ५.३० ते १२.३०)


सम तारीख
३. धनकुडे वस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण
सकाळी ४.३० ते ८.३०


सम तारीख
४. वीरभद्र नगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, जुपिटर हॉस्पीटल, चाकणकर मळा
संध्याकाळी ५.३० ते ९.३०

श्री. अंजली झोडापे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३८४२१
सम तारीख
५. सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्ट
सकाळी ४.३० ते ७.३०


सम तारीख
६. सुस रोड
सकाळी ११.३० ते १.३०


सम तारीख
७. पंचवटी
दुपारी १२.३० ते ६.००
म्हाळुंगे ग्रामपंचायत टाकी
१. श्री. अनुप गजलवार (प्र. उप अभियंता): ७७४९९०९०२०
२. श्री. किरण अहिरराव (कनिष्ठ अभियंता): ८२७५५८७२५३
सम तारीख
म्हाळुंगे गाव
सकाळी ७.३० ते ९.३०
सुस गाव सिंटेक्स टाक्या
१. श्री. अनुप गजलवार (प्र. उप अभियंता): ७७४९९०९०२०
२. श्री. किरण अहिरराव (कनिष्ठ अभियंता): ८२७५५८७२५३
सम व विषम तारीख
सुस गाव
सम व विषम तारखेला टँकरद्वारे पाणीपुरवठा
होळकर टाकी
१. श्री. प्रवीणकुमार भावसार (उप अभियंता): ९६८९९३११४४
२. श्री. अनंता संकपाळ (कनिष्ठ अभियंता): ९३७३७९१२३६
सम तारीख
खडकी Cantonment Board, मुळा रोड
सकाळी ६.०० ते ११.३०



२. एसएनडीटी (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
गांधीभवन टाकी, चांदणी चौक टाकी (गोल व चौकोनी), एसएनडीटी एचएलआर, एसएनडीटी एमएलआर
१. श्री. मकरंद वाडेकर (उप अभियंता): ९६८९९३१२०९ (कोथरुड, बावधन)
२. श्री. नरेंद्र परदेशी (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३८२५४ (प्रभाग क्र. १०)
३. श्री. देवेंद्रकुमार राठोड (कनिष्ठ अभियंता): ९९६०७६९६७१ (प्रभाग क्र. ३१)
४. श्री. संदेश पाटील (कनिष्ठ अभियंता): ९५४५१८९६९१ (प्रभाग क्र. ११)
५. श्रीमती वैशाली भूक्तर (कनिष्ठ अभियंता): ९७६४४०१७७७ (प्रभाग क्र. २९)
विषम तारीख
संपूर्ण कोथरुड (लक्ष्मीनगर वगळून), कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट ते विठ्ठल मंदिर रस्त्याची डावी बाजू), एरंडवणे भाग, बावधन खु., बावधन बु.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
गांधीभवन टाकी, डुक्कर खिंड, कुंभारवाडी, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, रामनगर, अहिरेगाव टाकी, वारजे जीएसआर टाकी
१. श्री. राजेश खाडे (उप अभियंता): ९६८९९३१६०५ (वारजे माळवाडी, कर्वेनगर, एरंडवणे)
२. श्री. गणेश ढगे (कनिष्ठ अभियंता): ७९७२८९०३७१ (प्रभाग क्र. ३२, ३३)
३. श्रीमती अपर्णा देसाई (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३६२७१ (प्रभाग क्र. ३०)
सम तारीख
वारजे माळवाडी, कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवे पर्यंतचा संपूर्ण भाग), रामनगर, शिवणे उत्तमनगर, New कोपरे, कोंढवे धावडे, कोथरूडमधील फक्त लक्ष्मीनगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.



३. स्वारगेट क्र. १ (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
सच्चाई माता मंदिर टाकी
१. श्रीमती राजश्री बने (कनिष्ठ अभियंता): ९४२२७८६१९०
२. श्रीमती सुवर्णा शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३७५१८
विषम तारीख
संतोेषनगर संपूर्ण परिसर, दत्तनगर संपूर्ण परिसर, आंबेगाव खुर्द वाघजाई नगर परिसर, अटल अकरा, आंबेगाव खुर्द गावठाण परिसर, हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द व इतर परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
लेकव्हीस्टा ई.एस.आर.
१. श्रीमती राजश्री बने (कनिष्ठ अभियंता): ९४२२७८६१९०
२. श्रीमती सुवर्णा शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३७५१८
विषम तारीख
टेलको कॉलनी गल्ली क्र. १ ते १०, टेलको कॉलनी ४ था व ५ वा टप्पा, गणेश गॅलेक्सी सोसायटी, लेक व्हिस्टा सोसायटी, व्यंकटेश क्षितीज सोसायटी व ३ रा टप्पा, आंबेगाव खु. व शेजारील मेघस्पर्श सोसायटी, स्वामी नारायण मंदिर, सनसिटी सोसायटी, तुकारामनगर, निविता सोसायटी, सन ब्राईट शाळा इत्यादी परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
श्रीहरी टाकी
श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
सम तारीख
बालाजीनगर – पुण्‍याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा पॅलेस परिसर, पवार हॉस्पीटल परिसर, स. नं. २३/१०, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, किर्लोस्कर सोसायटी, विवेकानंदनगर, श्रीहरी सोसायटी, हिलपॉईंट सोसायटी व इत्यादी.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
केदारेश्वर टाकी
श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
सम तारीख
कोंढवा बु.॥ – साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर, गोकुळ हॉटेल परिसर, साळवे गार्डन, श्रीकृष्णा कॅलनी, काकडेवस्ती, अर्शफनगर, स. नं. ५, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, अलिफ टॉवर, सावकशनगर, राजीवगांधीनगर, अप्पर इंदिरानगरचा काही भाग, कोंढवा बु. गावठाण, लक्ष्मीनगर, वटोबा मंदिर, हागवणे वस्ती, टिळकनगर, मेहतानगर, खडी मशीन चौक, पारगेनगर, एच. अँड एम. सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, स. नं. १५, पिसोळी रोड, येवलेवाडी, कामठेपाटीलनगर, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
महादेव नगर टाकी + केदारेश्वर टाकी
श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
विषम तारीख
कात्रज – कात्रज गावठाण, गुजरवाडी फाटा, राजस सोसायटी, विद्यानगर, आनंदनगर, उत्कर्ष सोसायटी, महादेवनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुंदरबन, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज-कोंढवा रोड परिसर, पॅरामाउंट गार्डन, यशस्वी सोसायटी, आयडीयल पार्क, खेतेश्वर आश्रम, शिक्षक सोसायटी, स्वामी समर्थनगर, राजमाता कॉलनी इत्यादी.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
तळजाई चौकौनी टाकी
१. श्रीमती सुवर्णा शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३७५१८
२. श्रीमती राजश्री बने (कनिष्ठ अभियंता): ९४२२७८६१९०
सम तारीख
कात्रज चौक ते कात्रज दूध डेअरी पर्यंतचा परिसर, भारती विद्यापीठ मागील परिसर, त्रिमूर्ती चौक ते अशोका आगम पर्यंतचा भाग, भारती विद्यापीठ – भारती विहार, श्रीराम निवास, शामाप्रसाद सावंत विहार, सावंत गार्डन, सिक्ससेंन्स, कांचननगरी, वंडरसिटी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
तळजाई चौकौनी टाकी
१. श्रीमती सुवर्णा शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३७५१८
२. श्रीमती राजश्री बने (कनिष्ठ अभियंता): ९४२२७८६१९०
विषम तारीख
समीर, बाळकृष्ण, आदिशक्ती, सौदागर, राजमुद्रा, रिक्षा, विद्यादिप सोसायटी, गुलाबनगर व चैतन्यनगर परिसर. रिक्षा-स्वाती सोसायटी, राघवनगर, गिरीनगर, अक्षयनगर परिसर. आंबेगाव पठार – संपूर्ण परिसर स. नं. १७ ते ३९, सहकारनगर, सहकारनगर क्षितीज व आविष्कार सोसायटी परिसर, दाते बसस्टॉप व परिसर, आंबेगाव बु.॥ – गावठाण स. नं. ७, ८ परिसर धबाडी काही भाग, आंबेगाव बु.॥ – गावठाण परिसर वेताळनगर, फिरंगाई माता मंदिर परिसर व पोतदार स्कूल व इतर परिसर, अमित ब्लुमिफल्ड व इतर परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
तळजाई धनकवडी टाकी
१. श्रीमती सुवर्णा शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९३७५१८
२. श्रीमती राजश्री बने (कनिष्ठ अभियंता): ९४२२७८६१९०
सम तारीख
धनकवडी गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई सोसायटी, शंकरदर्शन सोसायटी, स. नं. २, आदर्शनगर, सह्याद्रीनगर, रामचंद्रनगर, तळजाई打綠 सोसायटी, केशव कॉम्प्लेक्स सोसायटी, फाईव्ह स्टार सोसायटी, स. नं. ३४ ते ३७, तळजाई पठार परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
उज्वल टेरेस (हायब्लीस)
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
विषम तारीख
उज्वल टेरेस, गणेश नभांगण, मानस परिसर, गोकुळनगर, कांबळेवस्ती, व्यंकटेश शर्विल, परांजपे अभिरुची, यश प्लॅटिनम परिसर, हायब्लीस, सुंदर समृद्धी, लिमयेनगर परिसर, सन रेसिडन्सी, उज्वल हेरीटेज, सिल्व्हर कॉईन, धायरी मुख्य रस्त्याची डावी बाजू (बी साईड), ओक वूड सोसायटी, विठ्ठल संस्कृती, व्यंकटेश हिल सोसायटी (७०० मि. मी.) सिंहगड रस्ता व डगाव पुल ते धायरी फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजू, लाडली साडी शॉप परिसर, धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मुख्य रस्त्याची डावी बाजू (बी साईड) गल्ली नं. १२ बी ते गल्ली नं. ३४बी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
व्यंकटेश सेरिनेटी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१6७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
विषम तारीख
दळवी वाडी परिसर, बारांगणी मळा, पोकळे बाग, ओयो गार्डन, राधिका रॉयल, व्यंकटेश सेरिनेटी परिसर, धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मुख्य रस्त्याची उजवी बाजू (ए साईड)
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
सुदत्त संकुल
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
सम तारीख
(६०० मि. मी.) साईनगर, खोराड वस्ती, अथर्व नगर, महादेवनगर, आनंद विहार फेज १ व २, गौरी शंकर नगर, दामोदरनगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
डब्ल्यू. टी. पी. वॉश आऊट टाकी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
सम तारीख
विश्रांतीनगर, विठ्ठल वाडी, स्काय डेल, हिंगणे खु॥, तरडे कॉलनी, आशिर्वाद हॉस्पीटल लेन, संतोष हॉल मागील परिसर (५०० मि. मी.) प्रगती हायस्कुल परिसर, रामनगर, टेल्कोरस्ता, गंगा भाग्योदय रस्ता, निरंजन पार्क, ब्रम्हा हॉटेलच्या मागील परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
आय. एच. पी. टाकी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
सम तारीख
शिवसागर सोसायटी, माणिकबाग, सनसिटी रस्ता, दौलतनगर, सुंदर सृष्टी परिसर, सारस्वत बँक परिसर (७०० मि. मी.) एकता नगरी परिसर, निंबज नगर, विठ्ठल मंदिर कमान, तिला पार्क
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
परांजपे टाकी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
सम तारीख
प्रयोेजा सिटी, सेरेन काऊंटी, मियामी सोसायटी, नांदेड फाटा, पीएमएवाय सोसायटी, राज योग, लोकमत ऑफिस परिसर, आनंद विहार, सिंहगड रस्ता धायरी फाटा ते गणेश गार्डन रस्ता उजवी बाजू पूर्ण परिसर.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
इन्स्टीट्युट ई. एस. आर. (वडगाव परिसर)
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
विषम तारीख
(६०० मि. मी.) जाधवनगर, वडगाव गावठाण संपूर्ण, हायवे वडगाव पुल ते नवले पुल रस्त्याची डावी बाजू, कुदळे बाग, नारायण बाग, नेवसे हॉस्पीटल परिसर, दबाडी परिसर.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
बिबवेवाडी टाकी
१. श्रीमती मनीषा पिसाळ (शाखा अभियंता): ९९२२९५२७०३
२. श्री. आशिष जमदाडे (कनिष्ठ अभियंता): ९६७३२२३E६४
३. श्री. शुभम देशमुख (कनिष्ठ अभियंता): ९१६७३००८७०
विषम तारीख
वसंतबाग, अटल सोसायटी, कोठारी ब्लॉक, मार्केटयार्ड, हमालनगर, इंदिरानगर, महर्षीनगर, डायसप्लॉट, सॅलसबरीपार्क, ढोलेमळा, श्रेयस सोसायटी, पारिजात सोसायटी, अनिकेत सोसायटी, आंबेडकर वसाहत, धवलगिरी, वास्तूनगर, झाला कॉम्प्लेक्स, केंजळेनगर, रम्यनगरी, पितळेनगर, हाईडपार्क, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, दामोदरनगर, संत एकनाथनगर, औद्योगिक वसाहत, कुमार पार्क सोसायटी, प्रेमनगर वसाहत, प्रेमनगर सोसायटी विमल विहार सोसायटी, महावीर इलेक्ट्रॉनिक्स, गंगाधाम परिसर, लुंकड हायलँड, विद्यासागर कॉलनी, संदेशनगर, भिमाले कॉम्प्लेक्स, अप्पर पंपिंग मागील एरिया क्रिसेंट हायस्कुल, सोपान महाराज परिसर, गिडनी पार्क, विष्णू विहार, सुर्यप्रभा गार्डन, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, कॅनरा बँक, चिंतामणीनगर भाग १, दामोदर सोसायटी, दत्त मंदिर, गणेश…
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
३. स्वारगेट क्र. १ (उर्वरित भाग)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
तळजाई गोल
१. श्री. विज्ञान गायकवाड (कनिष्ठ अभियंता): ९८६०२८२७०७
२. श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
३. श्रीमती मनीषा पिसाळ (शाखा अभियंता): ९९२२९५२७०३
४. श्री. आशिष जमदाडे (कनिष्ठ अभियंता): ९६७३२२३६३४
विषम तारीख
लोअर इंदिरानगर, सुवर्णनगरी, चिंतामणीनगर, इंदिरानगर संपवेल, दुर्गामाता गार्डन, सिद्धार्थनगर, गणेशनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे हॉल, सुवर्णयुग चौक, सुपरमंच, अप्पर काही भाग, तीरुपती भेळ, हिंदु सुपर मार्केट, बंधुत्व मित्र मंडळ, पासलकर भवन (सुपर टाकी अंतर्गतचा भाग), स्टेट बँंकनगर, महालक्ष्मीनगर, पुजा सोसायटी, पुनमपार्क, बालाजीनगर, पुण्‍याईनगर, काशिनाथ पाटील नगर (प्रत्येक भाग १ तास टप्प्याटप्प्याने), सिध्दांर्थनगर, चैत्रबन, पदमावती, तळजाई वसाहत, चव्हाणनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत

पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
सेमिनरी हिल
१. श्री. विज्ञान गायकवाड (कनिष्ठ अभियंता): ९८६०२८२७०७
२. श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
विषम तारीख
पापळ वस्ती, गणपतनगर (प्रत्येक भाग एक तास टप्प्याटप्प्याने), अप्पर पंपिंग मागील एरिया, बी-३७ मागील भाग, प्रसन्न सोसायटी, धर्मवीर पार्क, चिंतामणीनगर भाग १,२,३, बकुळनगर, शिवतेजनगर, खडकेवस्ती, सदगुरुनगर, ओंकारनगर, शक्ती बंगला, गायकवाड वस्ती, प्लाझा बेकरी, पवार मांडावले, मधु ठाकुर गल्ली, कदम बंगला, विघ्नहरनगर भाग २, जागडेनगर, गंगाधाम, प्रसाद, बिबवेनगर, पी. एम. टी. कॉलनी, आई माता मंदिर (प्रत्येक भाग १ तास टप्प्याटप्प्याने), वर्धमानपुरा सोसायटी, स्वयंभू हिल्स सोसायटी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
नवीन सेमिनरी टाकी
१. श्री. विज्ञान गायकवाड (कनिष्ठ अभियंता): ९८६०२८२७०७
२. श्री. दीपक रोमन (कनिष्ठ अभियंता): ९७८०५९७४६८
विषम तारीख
गणेशनगर, शेळकेवस्ती, श्रेयसनगर, स्वामी समर्थनगर, तुळजाभवानीनगर, खामकरवस्ती, मावळा हॉटेल गल्ली, बिलाल मस्जिद, पदमावतीनगर, गणेशनगर, जयहिंदनगर, पवननगर भाग १,२ श्रीमूर्तीनगर, साईनगर, आंबिकानगर, राम मंदिर, संगम हॉटेल, शिवरायनगर, सरगम चाळ, बुद्ध विहार, मंगेश शिलवंत गल्ली
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
एच. एल. आर. टाकी (चौकोनी)
१. श्रीमती मनीषा पिसाळ (शाखा अभियंता): ९९२२९५२७०३
२. श्रीमती चैताली पुजारी (कनिष्ठ अभियंता): ९६६५४३२८३६
विषम तारीख
म्हाडा वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती गावठाण, शिवदर्शन, आंबेडकर वसाहत, संध्या सोसायटी, शिरीष सोसायटी, गवळीवाडा, संजयनगर वसाहत, सारंग सोसायटी, तावरे बेकरी परिसर, निर्मलबाग, पर्वती दर्शन, शिंदे हायस्कुल परिसर, एस. टी. कॉलनी, पंचमी हॉटेल सातारा रोड परिसर, महात्मा फुले वसाहत, स्टेट बँक कॉलनी, वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, वेलनकर कॉलनी, संतनगर, राजश्री शाहू सोसायटी, महावीरपार्क, सहकारनगर नं.२, मोरेवस्ती, ऋतुराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, सुपार्श्वनाथ सोसायटी, आदर्शनगर सोसायटी, आदिनाथ, महर्षीनगर (भाग), सहकारनगर पोलिस स्टेशन परिसर, गुरुराज, गाडगीळ उद्यान परिसर, पर्वती दर्शन, फुले चौक, इंडस्ट्रीअल इस्टेट, वेलनकरनगर, पर्वती दर्शन, मित्र मंडळ, स्टेट बँक कॉलनी, शिवदर्शन.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
वाघजाई टाकी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
३. श्रीमती भाविका ठाकूर (कनिष्ठ अभियंता): ९१३०५१२२११
विषम तारीख
जनता वसाहत गल्ली क्र. १ ते ९० डोंगर माथ्याकडील परिसर, जनता वसाहत गल्ली क्र. ९१ ते १०८, वाघजाई परिसर जनता वसाहत रोड कडील परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
एल. एल. आर. टाकी (जनता वसाहत)
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
३. श्रीमती भाविका ठाकूर (कनिष्ठ अभियंता): ९१३०५१२२११
सम तारीख
आशा हॉटेल ते दांडेकर पुल उजवी व डावी बाजू पुर्ण, दांडेकर पुल ते मांगीर बाबा चौक डावी बाजू, फरशी पुल, दत्तवाडी परिसर, पानमळा, अगरवाल शाळा, ग्लोबल हॉस्पीटल, आशा हॉटेल ते म्हात्रे पुल उजवी बाजू पुर्ण.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
पी. एल. डी. टाकी
१. श्री. सुहास महेंद्रकर (उप अभियंता): ९६८९९३१६७२
२. श्री. सतीश शिंदे (कनिष्ठ अभियंता): ९७६४१६३५५७
३. श्रीमती भाविका ठाकूर (कनिष्ठ अभियंता): ९१३०५१२२११
सम तारीख
राजाराम पुल ते आशा हॉटेल सिंहगड रस्त्याची उजवी व डावी बाजू, आण्णा भाऊ साठे वसाहत, सावित्रीबाई फुले वसाहत, नवशा मारुती मंदिर मागील परिसर, आशा हॉटेल ते म्हात्रे पुल रस्त्याची डावी बाजू, शाम सुंदर सोसायटी, म्हसोबा चौक, आंबेडकर वसाहत, बुध्द विहार, शनी मंदिराची मागील बाजू.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.



४. स्वारगेट क्र. २ (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
एलएलआर व एमएलआर टाकी
१. श्री. महेश गायकवाड (उप अभियंता): ९६८९९३१७६९
२. श्री. मुस्तफा बासले (उप अभियंता): ९६८९९३१६७६
३. श्री. केतन जाधव (कनिष्ठ अभियंता): ९९७०१३८२३९
४. श्री. सागर शिनगारे (कनिष्ठ अभियंता): ७७७५०५५५५६
५. श्री. शेख सलाउद्दीन (कनिष्ठ अभियंता): ९८६००२१३०८
सम तारीख
काशेवाडी, लोहियानगर, सहकारनगर, चुडामन तालीम, गुरुनानक नगर, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, शुक्रवार पेठ, जुना बाजार, सोमवार पेठ, कसबा पेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, महात्मा फुले पेठ, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ, मोमीनपुरा, स्वारगेट (पोलिस लाईन), नवी पेठ, पर्वती गाव, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ, नानापेठ, भवानीपेठ, पुणे स्टेशन, सोमवारपेठ पोलिस लाईन
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.


५. बंडगार्डन विभाग (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
सं. नं. ५८, टाकी नं. १, २, ३
१. श्री. नितीन जाधव (प्र. उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. राजेंद्र फुंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९५१२८१
विषम तारीख
आपले घर, तुळजाभानी नगर, समर्थनगर राजाराम पाटील नगर, ईओन आयटी पार्क, खराडी, पाटील बुवा नगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
भनगाई वस्ती
१. श्री. नितीन जाधव (प्र. उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. राजेंद्र फुंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९५१२८१
विषम तारीख
भनगाई वस्ती, गेरा बंगलो, शेतकरी नगर, गेरा पार्क साऊथ आणि नॉर्थ.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
चंदननगर वडगाव शेरी (झोन ३३)
१. श्री. नितीन जाधव (प्र. उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. रमेश सानप (कनिष्ठ अभियंता): ९९२२८८३११४
३. श्री. सचिन लवटे (कनिष्ठ अभियंता): ७९७२०२५५४६
विषम तारीख
प्रभाग क्र ३ धनलक्ष्मी पार्क मित्रमंडळ सोसा, दत्त प्रसाद सोसायटी, सुनिता नगर, प्रभाग क्र ५ गणेशनगर, स्वामी समर्थ मंदिर, समता सोसायटी, आनंद पार्क, आनंद मंगल सोसायटी, राजश्री कॉलनी, इंदिरा नगर, मतेनगर, पुण्यनगरी, महावीरनगर.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
सोमनाथ नगर
१. श्री. नितीन जाधव (प्र. उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. सचिन लवटे (कनिष्ठ अभियंता): ७९७२०२५५४६
विषम तारीख
सोमनाथ नगर काही भाग, सोपाननगर काही भाग
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
बायपास-खराडी
१. श्री. नितीन जाधव (प्र. उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. राजेंद्र फुंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९५१२८१
सम तारीख
शंकर नगर, चौधरी वस्ती, सताव वस्ती, पंढरी नगर, बोराटे वस्ती, पाटील बुवा नगर, थिटे नगर, काळूबाई नगर, खराडकर पार्क, राघोबा पाटील नगर, साईनाथ नगर, समर्थ नगर, श्रीराम सोसायटी लेन नं. १ ते ११, खुळेवाडी, खांदवेनगर, चंदननगर भाजी मंडई.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
चंदननगर टाकी
श्री. राजेंद्र फुंदे (कनिष्ठ अभियंता): ९६८९९५१२८१
सम तारीख
दिनकर पठारे वस्ती, तुभे पठारे नगर, एकनाथ पठारे वस्ती, अशोक नगर, चंदननगर, शिवाजी पुतळा, संघर्ष चौक, चव्हाणनगर, प्रितनगर, राघवेंद्र नगर, बोराटे वस्ती, करनगर, म्हाडा, यशवंतनगर, तुकाराम नगर अनुसया पार्क, वृंदावन नगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
ठाकरसी टाकी
१. श्री. राजेंद्र नगरे (उप अभियंता): ९६८९९३१४०४
२. श्री. गणेश हारेर (कनिष्ठ अभियंता): ८३०८६८१०८६
सम तारीख
येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गदळीवाडा, जिजामाता, मदार तेरेसा, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नुरानी मस्जिद, नेताजी नगर, गांधीनगर, काश्मीर कॉलनी, भीमा शंकर वसाहत, यशवंत नगर, खडडा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, डॉ. आंबेडकर वसतिगृह, सुभाष नगर, नवी खडकी तालिीमी पर्यंत. बाराते वस्ती, भोसले वस्ती, कुमार आंगन.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
ठाकरसी, कल्याणी नगर टाकी
१. श्री. राजेंद्र नगरे (उप अभियंता): ९६८९९३१४०४
२. श्री. गणेश हारेर (कनिष्ठ अभियंता): ८३०८६८१०८६
३. श्री. सचिन लवटे (कनिष्ठ अभियंता): ७९७२०२५५४६
विषम तारीख
संगमवाडी, जयजवाननगर, रामनगर, यु. पी हॉटेल परिसर, अशोक नगर, गांधी नगर, शास्त्री नगर बं.नं.५, नगर रोड, डंकर लाईन, कल्याणी नगर, अधीक्षक बंगला परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
हरीगंगा टाकी
१. श्री. राजेंद्र नगरे (उप अभियंता): ९६८९९३१४०४
२. श्री. चोपडे परशुराम (कनिष्ठ अभियंता): ९९२२४८९२८०
सम तारीख
प्रतिक नगर सेक्टर नं. १ ते ६, जेसीडी पार्क, पंचशील नगर, मित्तल सोसायटी, सैनिक नगर, कामगार नगर, चंद्रमा नगर, प्रेस कॉलनी, ड्रिम सोसायटी, शिवाई कॉलनी, श्रमिक नगर, महिला जेल
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.


विषम तारीख
आंबेडकर सोसायटी, राम सोसायटी, हरीगंगा सोसायटी, समाजकल्याण वस्ती गृह, फुलेनगर, इंदिरा नगर, राम सोसायटी भारत नगर, शांतीनगर, अहिल्यानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, कतारवाडी, साप्रस, आरोग्यभवन, विश्रांतवाडी पोलिस लाईन.

गणेश नगर
१. श्री. राजेंद्र नगरे (उप अभियंता): ९६८९९३१४०४
२. श्रीमती कविता जगताप (कनिष्ठ अभियंता): ९३०७७९९४३१
सम तारीख
गणेश नगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
म्हस्के वस्ती

सम तारीख
म्हस्के वस्ती

कळस गावठाण

सम तारीख
कळस गावठाण

माळवाडी जाधव वस्ती

सम तारीख
माळवाडी जाधव वस्ती

मिलिट्री ग्रेप सेंटर
१. श्री. नितीन जाधव (उप अभियंता): ९६८९९३४३१४
२. श्री. रमेश सानप (कनिष्ठ अभियंता): ९९२२८८३११४
सम तारीख
मिलिट्री ग्रेप सेंटर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
वडार वस्ती, विश्रांतवाडी
१. श्री. राजेंद्र नगरे (उप अभियंता): ९६८९९३१४०४
सम तारीख
वडार वस्ती विश्रांतवाडी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.



६. लष्कर पाणीपुरवठा (सुधारित आवृत्ती १)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
रामटेकडी टाकी
१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्री. संदीप दिपके (कनिष्ठ अभियंता): ८६६९६२८६७०
सम तारीख
तुकाई टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:- काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. निलकंठ शीलवंत (उप अभियंता): ९६८९९३११५६
२. श्री. प्रवीण कळमकर (कनिष्ठ अभियंता): ८६०५००८१८२
सम तारीख
महमदवाडी लाईनवरून होणारा पाणीपुरवठा भाग:- महमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, हेवन पार्क, टँकर पॉईंट
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्रीमती दिपाली तिकोने (कनिष्ठ अभियंता): ९८८११५३४९४
सम तारीख
रामनगर लाईनवरून होणारा पाणीपुरवठा भाग :- रामनगर झोपडपट्टी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता): ७०६६९९०९०९
३. श्रीमती दिपाली तिकोने (कनिष्ठ अभियंता): ९८८११५३४९४
विषम तारीख
हडपसर लाईनवरून होणारा पाणीपुरवठा भाग :- रामटेकडी SRPF, वैदुवाडी, भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर १ ते १४ गल्ली, हडपसर गावठाण (अंशतः)
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. अभिजीत भुजबळ (कनिष्ठ अभियंता): ९०९६४५७०९७
विषम तारीख
खराडी लाईनवरून होणारा पाणीपुरवठा भाग :- माळवाडी, मुंढवा, १५ नंबर, मगरपट्टा सिटी, संजीवनी हॉस्पीटल, भोसले गार्डन, ओरीयंट गार्डन, साधुनाना तुपे वस्ती, इंद्रप्रस्थ, अमर सृष्टी, सोलापूर रोड डावी बाजू, ज्ञानदीप सोसायटी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.


सम व विषम तारीख
केशवनगर, साडेसतरा नळी (एक दिवसाआड पाणीपुरवठा)


१. श्री. निलकंठ शीलवंत (उप अभियंता): ९६८९९३११५६
२. श्री. प्रवीण कळमकर (कनिष्ठ अभियंता): ८६०५००८१८२
विषम तारीख
सेलेनापार्क टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:- म्हसोबा नगर, काळेबोराटेनगर, हांडेवाडीरोड
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

विषम तारीख
भुजबळ टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग :- भुजबळ वस्ती, सैयद नगर



१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्रीमती दिपाली तिकोने (कनिष्ठ अभियंता): ९८८११५३४९४
विषम तारीख
टँकर पॉईंट
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
वानवडी २८५
१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
विषम तारीख
वानवडी गावठाण, चौगुले मळा, शितळादेवी मंदिर व परिसर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
६. लष्कर पाणीपुरवठा (उर्वरित भाग)

पाण्याची टाकी
पाणीपुरवठा विभाग (तक्रारीसाठी संपर्क)
सम / विषम तारीख
पाणीपुरवठा होणारा भाग
वेळ
वानवडी २८५
१. श्री. धनाजी घागरे (कनिष्ठ अभियंता): ९५७९८७१०७०


पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
बेकरी हिल
१. श्री. निलकंठ शीलवंत (उप अभियंता): ९६८९९३११५६
२. श्री. सुनील पोपळे (कनिष्ठ अभियंता): ७०२०३०२१५७
सम तारीख
कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्री. धनाजी घागरे (कनिष्ठ अभियंता): ९५७९८७१०७०
विषम तारीख

जगताप चौक व इतर परिसर, आझादनगर, मानेवस्ती, राजीवगांधी नगर, शांतीनगर, रिव्हेरा सोसायटी, शिवानंद गार्डन सोसायटी, गंगा सॅटेलाईट सोसायटी व परिसर, सनग्रेस स्कूल भाग, केदारी नगर व विकास नगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
जलमंदिर टाकी
१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता): ७०६६९९०९०९
सम तारीख
कोरेगाव पार्क, बंडगार्डन रोड, ताडीवाला रोड झोपडपट्टी
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
ससून
१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता): ७०६६९९०९०९
सम तारीख
ससून हॉस्पिटल
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
हाय सर्व्हिस टाकी
१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता): ७०६६९९०९०९
सम तारीख
बी.टी.कवडेरोड दोन्ही बाजू, भीमनगर, घोरपडी (अंशतः), भारत फोर्ज कंपनी लगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग – तारादत्त कॉलनी, डोबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्री. धनाजी घागरे (कनिष्ठ अभियंता): ९५७९८७१०७०
विषम तारीख
उदयबाग, सोपानबाग, शिवकर वस्ती, लक्ष्मीनगर, जांभूळकर मळा, होलेवस्ती, प्रेझेंट पार्क, सेंट पॅट्रिक टाऊन, क्लासिक अपार्टमेंट, विवेक अपार्टमेंट, मधुबन सोसायटी, कवडे मळा, ब्रह्माबाग, प्रीतिप्रकाश सोसायटी, कंदर सोसायटी, अमेया सोसायटी, ९३ मॉलपासून रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, एस.व्ही.नगर, हडपसर कचरा डेपो, शांतीनगर
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.

१. श्री. निलकंठ शीलवंत (उप अभियंता): ९६८९९३११५६
२. श्री. गौतम गावंडे (कनिष्ठ अभियंता): ७७४४७४२४०६
विषम तारीख
संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, भीमपुरा गल्ली नं. १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, एम.जी.रोड, इस्ट स्ट्रीट, जी.ई. (साउथ/नॉर्थ/सेंट्रल)
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
कॅम्प
श्री. गौतम गावंडे (कनिष्ठ अभियंता): ७७४४७४२४०६
विषम तारीख
संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
रेसकोर्स टाकी
१. श्री. संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता): ७०६६९९०९०९
२. श्री. गौतम गावंडे (कनिष्ठ अभियंता): ७७४४७४२४०६
विषम तारीख
घोरपडी (अंशतः), श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, कोरेगाव पार्क (अंशत)
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
खराडी pumping
१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. अभिजीत भुजबळ (कनिष्ठ अभियंता): ९०९६४५७०९७
विषम तारीख
सर्वोदय कॉलनी, धायरकर वस्ती, पासपोर्ट ऑफिस, नॉर्थ मेन रोड.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
सेमिनरी हिल
१. श्री. निलकंठ शीलवंत (उप अभियंता): ९६८९९३११५६
२. श्री. सुनील पोपळे (कनिष्ठ अभियंता): ७०२०३०२१५७
विषम तारीख
भाग्योदयनगर, शिवनेरी नगर, साईबाबा नगर,
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
मांजरी
१. श्री. दत्तात्रय टकले (उप अभियंता): ९६८९९३१८१५
२. श्री. संदीप दिपके (कनिष्ठ अभियंता): ८६६९६२८६७०
सम तारीख / विषम तारीख
दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.
फुरसुंगी देवाची उरुळी
१. श्री. महेंद्र बच्छाव (उप अभियंता): ९६८९९३१८०७
२. श्री. गौतम गावंडे (कनिष्ठ अभियंता): ७७४४७४२४०६
सम तारीख / विषम तारीख
२ दिवसांनी पाणीपुरवठा चालू आहे.
पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.



तांत्रिक अडचणींमुळे भामा आसखेड प्रकल्पातून सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत, या प्रकल्पातून ज्या भागास पाणीपुरवठा होत आहे तो भाग (उत्तर पूर्व भाग) तूर्तास एक दिवसाआड पाणीकपातीच्या नियोजनातून मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार वगळण्यात आलेला आहे. या भागातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर त्या भागाचे पाणीकपातीचे नियोजन अलाहिदा (स्वतंत्रपणे) जाहीर करण्यात येणार आहे .





























पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा गरजेचा आहे का? सजग नागरिक मंचाचा प्रश्न

पुण्यात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर सजग नागरिक मंचाने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. खडकवासला धरणसाखळीत 15 जून रोजीही 4 टीएमसीपेक्षा जास्त पाणी शिल्लक राहील, असा हिशेब देत सध्या एवढी मोठी कपात करण्याची गरज नसल्याचं मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी म्हटलं आहे.

महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रात वेलणकर यांनी म्हटलं आहे की, 9 जून 2025 रोजी वरसगाव धरणात 1.87 टीएमसी, पानशेतमध्ये 2.25 टीएमसी आणि खडकवासला धरणात 0.82 टीएमसी असा एकूण 4.94 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

सध्या शेतीसाठी सुरू असलेलं आवर्तन 14 जूनपर्यंत चालणार आहे. त्यासाठी लागणारं आणि पुण्याला लागणारं पाणी वजा केल्यावर 15 जून रोजी खडकवासला धरणसाखळीत 4 टीएमसीहून जास्त पाणी शिल्लक राहील. पालखी सोहळ्यासाठी 0.5 टीएमसी पाणी गृहीत धरलं तरी 15 जूननंतर पुण्याच्या पिण्यासाठी 3.5 टीएमसी पाणी शिल्लक राहील. पुणे महापालिका दरमहा दीड टीएमसी पाणी खडकवासलातून आणि उर्वरित भामा आसखेडमधून घेते. या हिशेबाने 15 जून रोजी असलेलं पाणी साधारण 31 ऑगस्टपर्यंत पुरेल.आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवलं तर हेच पाणी जवळपास 10 सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा दावा मंचाने केला आहे.

यंदा पाऊस 90% पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 75% पाऊस झाला तरी खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरतात, असंही पत्रात नमूद आहे.
अशा परिस्थितीत 15 जूनपासूनच एक दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होईल आणि हा निर्णय टँकरवाल्यांसाठी फायद्याचा ठरेल, असं मंचाचं म्हणणं आहे.

सजग नागरिक मंचाने 15 जून ते 15 जुलैपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावं, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत पावसाच्या वाटचालीचा आढावा घेऊन गरज असल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठ्याबत निर्णय घ्यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.

महापालिकेच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी असताना, मंचाने मांडलेला हा आकडेवारीसहचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

१ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा पकडला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त-अतुल कानडे

पुणे, दि. ११: राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता . प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क , सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून “Royal Select Deluxe Whisky” या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले.

मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला आहे. त्यांच्याकडे कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्याविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ कामे करा:विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. 11: पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे महानगर प्रदेशातील भविष्यातील वाहतुकीचे एकात्मिक नियोजनाच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजनांच्या प्रकल्पांवर काम करत असतानाच सध्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या तात्काळ हाती घेता येतील अशा उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश श्रीमती तेली- उगले यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., पुणे मनपा अपर आयुक्त पवनीत कौर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, पुणे शहरात प्रस्तावित बोगदांचे जाळे अर्थात ‘पाताल लोक प्रकल्प’, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत वर्तुळाकार मार्ग आदी दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी जाणार आहे. या प्रकल्पांचे नियोजन, आरेखन, विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याला गती द्यावी.

दीर्घकालीन प्रकल्पांचा कालावधी पाहता सध्या अस्तिवात असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा तसेच क्षमतावाढ व्हावी यासाठी महानगरपालिका, पोलीस, रेल्वे, महामेट्रो, पीएमपीएमएल, एसटी, परिवहन विभाग या विभागांची उपसमिती स्थापन करून विचार विनिमय करावा व त्याबाबतचे सादरीकरण प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो, रेल्वे आदी सेवांचा पूर्ण वापर व्हावा यासाठी शेवटच्या ठिकाणाहून त्यांच्या इच्छित स्थानी जाण्यासाठी प्रवाशांना जोडणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीएमल बसेस, रिक्षा थांबे यांची सुविधा त्या त्या ठिकाणी झाली पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

बोगद्यांचे नियोजन करताना त्यात मर्यादीत वाहनांचा समावेश न करता सार्वजनिक वाहतूक वाहनांना प्रवेश मिळाल्यास वाहतूक गतीने होईल, असे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा समावेश प्राधान्याने प्रकल्पांमध्ये करण्यात यावा. दोन्ही महानगरपालिका तसेच महानगर प्रदेश क्षेत्रात वाहतूक एकात्मिक पद्धतीने गतीमान होईल यासाठी समन्वयाने प्रकल्पांची आखणी व्हावी, असे श्री. चौधरी म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी वाहतूक विभागाबाबत सादरीकरण केले. सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्याकडील सांख्यिकी माहिती (डेटा) एकमेकांना दिल्यास योग्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने काम होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्टेशन येथे नवीन 6 रेल्वे फलाट करण्यासह अस्तित्वात असलेल्या 6 फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्यावतीने सादरीकरणात देण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगररचना, वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी, मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
0000

भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी नाही

नवी दिल्‍ली

नेपाळमध्ये भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे किंवा स्थगिती देण्यात आली आहे, अशा आशयाची माहिती काही प्रसार माध्यमांनी दिल्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नजरेस आले आहे. ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.

भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी घातलेली नाही, असा खुलासा नेपाळ सरकारने आपल्या वनस्पती अलगीकरण व कीटकनाशके व्यवस्थापन केंद्र (राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना, नेपाळ) च्या माध्यमातून 10 जून 2026 रोजी केला आहे. वनस्पतीच्या आरोग्याविषयी लागू अटीशर्तींच्या पूर्ततेच्या निकषावर आयातीला परवानगी आहे. अटीशर्तींच्या पूर्ततेनंतर भारत सरकारने दिलेली वनस्पतीच्या आरोग्याबद्दलची वैध प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर आयात परवाने आणि माल सोडण्याचे आदेश दिले जात आहेत.

भारतीय आंब्याची नेपाळला निर्यात विनाव्यत्यय सुरू आहे. जानेवारी 2026 पासून एकूण 149 खेपांमध्ये 2005 मेट्रीक टन आंबा नेपाळला निर्यात केला आहे. एकट्या जून 2026 मध्ये आजतागायत 18 खेपांमध्ये एकूण 266 मेट्रीक टन आंबा निर्यात केला आहे.

नेपाळने अलीकडेच आयातविषयक ठराविक अटींमध्ये सुधारणा केल्या असून त्यामध्ये नियंत्रित तापमानाच्या गरम पाण्यात आंबे धुण्याची प्रक्रिया – हॉट वॉटर ट्रीटमेंटचा समावेश आहे. नेपाळने निश्चित केलेल्या आयातविषयक अटींचे पालन करून भारताने निर्यात कायम ठेवली आहे. त्याचबरोबर, पूर्व सल्लामसलतीविना वनस्पती आरोग्यविषयक नव्या अटी लागू केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, जागतिक व्यापार संघटनेचा आरोग्य व वनस्पती आरोग्य करार (डब्ल्यूटीओ एसपीएस) आणि आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण करार – आयपीपीसीच्या चौकटीला अनुसरून योग्य द्विपक्षीय व्यासपीठांवर भारत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.

आयात व निर्यात नियंत्रणाविषयी माहितीसाठी अधिकृत संवादावर अवलंबून राहावे आणि भारतीय आंब्याच्या नेपाळमधील आयातीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातल्याच्या कथित व अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला भागधारक, व्यापारी आणि जनतेला मंत्रालयाने दिला आहे.

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त

ठाणे-ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा समावेश आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे पोहवा अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी रात्री ११.५० च्या सुमारास खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. तेथून मुंब्रा बाजूकडे जाणाऱ्या फिरोज अब्दुल खान (५२, रा. अंकलेश्वर, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ कोटी रुपयांचे चरस आणि ४ लाख ४८ हजार ५१४ रुपयांच्या प्रतिबंधित ‘स्पॅस्मो-प्रॉक्सिव्हॉन आर-प्लस’ (ट्रामाडॉल) कॅप्सुल्स मिळून आल्या. मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेदा, शौकत मीरला यांना काश्मीरमधून अटक केली.

AAIB चा अहवाल न आल्याने रोहित पवार भडकले,म्हणाले,’वाट पाहा म्हणणारे सत्तेचे दलाल, नमकहराम आणि कृतघ्न लोक…

अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या म्हणणाऱ्यांवर घणाघात
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवाला
एक वर्षात देणे बंधनकारक, तरीही अंतिम रिपोर्ट नाही”

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालावरून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही विमान अपघात तपास यंत्रणा (AAIB) अंतिम अहवाल सादर करू शकलेली नाही, याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत आले आहे. नियमानुसार अशा दुर्घटनांचा अंतिम तपास अहवाल एका वर्षाच्या आत सादर करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही अंतिम अहवाल समोर आलेला नाही. त्यांनी पुढे म्हटले की, AAIB चा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये गुन्हेगारी (क्रिमिनल) तपासाचा समावेश नसतो. असे असतानाही अहवाल वेळेवर येत नाहीत, हे सर्वांनाच माहिती आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचाही उल्लेख केला. “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असे सांगणाऱ्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला.

ते म्हणाले की, अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक “सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमकहराम आणि कृतघ्न” आहेत. फक्त सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी काही लोक अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये भावनिक प्रश्नही उपस्थित केला. “मैत्री, नातीगोती आणि संबंध याबद्दल अनेकजण व्यासपीठावर बोलतात. पण प्रत्यक्षात त्याचे काहीच महत्त्व नसते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्याशी राजकीय जवळीक दाखवणाऱ्या, पण त्यांच्या विमान अपघात प्रकरणात ठोस भूमिका न घेणाऱ्या नेत्यांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळ परिसरात अपघात झाला होता. या घटनेचा तपास AAIB कडून करण्यात आला. प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, धावपट्टीशी संबंधित बाबी आणि ऑपरेशनल कारणांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र या निष्कर्षांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रोहित पवार यांचा आरोप आहे की, या प्रकरणात केवळ तांत्रिक निष्कर्षांवर अवलंबून न राहता अधिक व्यापक चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी AAIBच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार विमान अपघात प्रकरणातील अहवालाची वाट पाहण्याचा सल्ला देणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.रोहित पवार यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकीकडे विमान दुर्घटनांच्या तपासातील विलंबाचा मुद्दा पुढे आला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.