नागपूर-अपमानास्पद वागणूक देण्यासाठी एका माजी सैनिकाला आणि वकिलाला बेकायदा हातकड्या घालणाऱ्या पोलिसांच्या कृतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी राज्याच्या गृह विभागाने या दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई आठ आठवड्यांत द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
ऑगस्ट २०१० मध्ये अमरावतीच्या तळेगाव पोलिस ठाण्यात वकील योगेश्वर कवडे आणि माजी सैनिक अविनाश दाते एका गाडीच्या नुकसानीची तक्रार द्यायला गेले होते. समोरच्या व्यक्तीने उलट तक्रार दिल्याने पोलिसांनी मध्यरात्री या दोघांना बेकायदा ताब्यात घेतले. रात्रभर त्यांना केवळ अंतर्वस्त्रांवर बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी हातकड्या घालून एसटी बसने तहसील कार्यालयात नेले. तिथे तहसीलदारांनी पोलिसांना फटकारत हातकड्या काढण्याचे आदेश दिले व त्यांना जामीन दिला. या अमानुष वागणुकीविरोधात दोघांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
अपमानास्पद वागणूक देण्यासाठी एका माजी सैनिकाला आणि वकिलाला बेकायदा हातकड्या घालणाऱ्या पोलिसांच्या कृतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी राज्याच्या गृह विभागाने या दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई आठ आठवड्यांत द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने दिले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक आणि दोन हवालदारांनी जाणीवपूर्वक याचिकाकर्त्यांचा अपमान करण्यासाठी हे कृत्य केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

