तळजाईला कॉंक्रीटचा कॅन्सर भाग-२: सॅटेलाईट पुराव्यांनंतरही बिल्डर पुढे प्रशासन हतबल?

Date:

सहकारनगरचे रस्ते रुंद किती आणि इमारतींची उंची किती ? प्रश्न वादाच्या भोवऱ्यात !

विशेष शोधनिबंध (इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – भाग २)
पुणे:
पुण्यातील तळजाई टेकडी आणि विवेकानंद नगरच्या सीमेवरील सर्व्हे नंबर ८ आणि ९ मधील ३० फूट खोल डोंगर फोडीचा महाखुलासा ‘माय मराठी’ने पुराव्यांसह केल्यानंतर महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे मात्र, या गंभीर पर्यावरण ऱ्हासावर आणि नागरिकांच्या सुरक्षेवर अधिकृत भूमिका घेण्याऐवजी पुणे महानगरपालिका (PMC) आणि सर्वोच्च अधिकाऱ्यांनी मौन’ बाळगले आहे. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी आपण याप्रकरणी चौकशी करू एवढेच मायमराठीला सांगितले आहे . तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण २०२३ ला मंजूर झालेले असल्याचे सांगितले आहे.

अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, बातमी प्रसिद्ध होताच संबंधित बांधकाम विकास विभागाच्या अभियंत्यांनी तक्रारदार पत्रकाराला सोबत घेऊन ‘संयुक्त मोजणी’ करण्याचे टाळत,या संदर्भात महापालिकेत जाब विचारला असता, ‘तिथे डोंगर उतार नाहीच, सर्व काही २ मजली तळघराच्या (Double Basement) मंजुरीनुसार कायदेशीर सुरू आहे,’ असा छातीठोक दावा करत अधिकाऱ्यांनी फाईल पुढे सरकवली.

🔴 कागदावर ‘निवासी झोन’चे कवच, पण नैसर्गिक कड्याचे काय?

‘माय मराठी’च्या हाती लागलेल्या महापालिकेच्या अधिकृत दस्तऐवज आणि मंजूर नकाशांनी (Sanctioned Layout) या क्लिन चीटमधील खोटेपणा उघडा पाडला आहे. प्रकल्पाच्या ‘LOCATION PLAN’ मध्ये स्पष्टपणे ‘कंटूर लाईन्स’ (डोंगर उताराच्या तांत्रिक रेषा) उमटलेल्या आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर तीव्र डोंगर उतार असतानाही, नगररचना विभाग आणि महापालिकेच्या काही महाभागांनी जुन्या काळात केवळ बिल्डर लॉबीच्या आर्थिक फायद्यासाठी या संवेदनशील क्षेत्राचे आरक्षण बदलून ते कागदोपत्री ‘निवासी झोन’ (Yellow Zone) घोषित करून घेतले आहे.

महापालिका आता याच ‘कागदोपत्री मंजुरीचे’ कवच पुढे करून निसर्गाचा गळा घोटत आहे. पण आमचा सवाल आहे की, जर ही जमीन आधीपासूनच नैसर्गिकरीत्या सपाट निवासी भूखंड होती, तर मग इमारतीच्या पाठीशी ३० ते ४० फुटांचा उभा कापलेला डोंगराचा कडा (Vertical Cliff) आला कुठून? कागदावर झोन बदलला म्हणून भूगर्भाचे नियम बदलतात का?

🔴 हारीने वेढलेल्या वस्त्या आणि प्रशासनाची पळकुटी भूमिका

सॅटेलाईट नकाशावरून स्पष्ट दिसते की, हा ११,१७१ चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड चारी बाजूंनी दाट लोकवस्तीने वेढलेला आहे. भूखंडाच्या अचूक उजव्या बाजूला थेट विवेकानंद नगरची दाट वस्ती आहे, तर वर आणि खाली इतर निवासी इमारती आहेत. या चारी बाजूंच्या इमारतींच्या मध्यभागी ३५ फूट खोल खड्डा खणल्यामुळे संपूर्ण परिसराचा पाया (Structural Base) खिळखिळा झाला आहे. पावसाळ्यात वरून वेगाने येणारे पाणी उजव्या बाजूच्या विवेकानंद नगरची माती खचण्याचा आणि बड्या दरडी कोसळण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे.

या डोंगर फोडीचे थेट सॅटेलाईट पुरावे व्हॉट्सॲपवर पाठवून संपर्क साधला असता, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी फोन उचलणे उत्तर देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. अधिकाऱ्यांचे हे मौन नक्की काय दर्शवते? सुमारे २२ हजार चौरस मीटरचे काँक्रीटचे जंगल उभारणाऱ्या बिल्डर लॉबीपुढे संपूर्ण यंत्रणा हतबल झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे .

महापालिकेला सवाल : येथील बांधकामांना मंजुरी देण्यापूर्वी येथील जमिनीचा नैसर्गिक उतार किती तीव्र होता, त्या तांत्रिक नकाशाचा फोटो वेब साईट वर जाहीर कराल? …ही जागा ‘हिल टॉप हिल स्लोप’ (HTHS) क्षेत्रातून रहिवासी क्षेत्रात बदलल्याचा अधिकृत शासकीय आदेश कधीचा आहे ? ते योग्य कायदेशीर होते काय ? हे जाहीर कराल ? आणि यासाठी कोणी का प्रयत्न केले ?वनीकरण हद्दीपासून ३० मीटर (१०० फूट) अंतराचा बफर झोन नकाशात प्रत्यक्ष दाखवला आहे का, याची तपासणी कराल ?

१. सहकारनगरमधील रस्त्यांची रुंदी

“सहकारनगर हा पुण्याचा असा परिसर आहे ज्याने नेहमीच तळजाई टेकडीचे रक्षण केले आहे . २०१९ चा आंबील ओढ्याचा पूर आणि २०२४ मध्ये सहकारनगरमधील सोसायट्यांवर आलेल्या आपत्तीचा इतिहास ताजा असतानाही, महापालिका प्रशासन पुन्हा एकदा संपूर्ण सहकारनगर आणि तळजाई ला मोठ्या आपत्तीच्या खाईत तर लोटत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे..”

सहकारनगर हा परिसर मुख्यत्वे दोन भागांत विभागला गेला आहे:

  • मुख्य रस्ते: सहकारनगरमधील मुख्य रस्ते (उदा. तळजाई पठाराकडे जाणारे रस्ते किंवा मुख्य सावरकर चौक परिसर) हे प्रामुख्याने १२ मीटर (४० फूट) ते १५ मीटर (५० फूट) रुंदीचे आहेत.
  • अंतर्गत सोसायट्यांचे रस्ते: जुन्या सहकारी सोसायट्यांच्या आतील रस्ते हे ९ मीटर (३० फूट) किंवा त्यापेक्षाही कमी रुंदीचे (साधारण २० ते २५ फूट) आहेत.

२. रस्त्याच्या रुंदीनुसार इमारतींच्या उंचीचे नियम (UDCPR) आहेत

युनिफाइड डीसीपीआरनुसार, सामान्य सपाट जमिनीवर रस्त्याच्या रुंदीनुसार पुढील प्रमाणे उंची दिली जाते:९ मीटरपेक्षा कमी रस्ता: इमारतीची उंची जास्तीत जास्त १५ मीटर (साधारण ५ मजले).९ ते १२ मीटर रस्ता: इमारतीची उंची १५ ते २४ मीटर (साधारण ७ ते ८ मजले).१२ ते १५ मीटर रस्ता: इमारतीची उंची २४ ते ३६ मीटर (साधारण १० ते १२ मजले).

पण सहकारनगर आणि पर्वतीसाठी विशेष निर्बंध

  • सर्वात महत्त्वाचा नियम: सहकारनगर आणि पर्वतीसाठी ‘विशेष निर्बंध’ (Special Height Restriction)
  • युनिफाइड डीसीपीआरच्या प्रकरण १० (Chapter 10 – Special Regulations) मध्ये पुणे शहरातील काही ऐतिहासिक आणि संवेदनशील भागांसाठी विशेष नियम आहेत. पर्वती आणि तळजाई टेकडीच्या परिसरासाठी (सहकारनगरचा मोठा भाग यात येतो) महापालिकेने एक विशेष ‘कॅप’ (मर्यादित उंची) लावली आहे:
  • २१ मीटरची मर्यादा (Height Cap): तळजाई टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य आणि डोंगरमाथा शहरातून स्पष्ट दिसावा (View Corridor बाधित होऊ नये), तसेच निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून सहकारनगरच्या अनेक भागांत समोरचा रस्ता कितीही मोठा असला, तरी इमारतीची एकूण उंची २१ मीटरपेक्षा (साधारण ६ ते ७ मजल्यांपेक्षा) जास्त ठेवता येत नाही.
  • डोंगर पायथ्याचा नियम (Hill Buffer Zone): राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) आदेशानुसार, डोंगर उताराच्या किंवा टेकडीच्या वनीकरण हद्दीपासून १०० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नवीन इमारतीला किंवा उंचीला मंजुरी देता येत नाही.

“सहकारनगर आणि तळजाईच्या संवेदनशील पट्ट्यात इमारतींच्या उंचीवर २१ मीटरचे कडक निर्बंध असताना, या विशिष्ट भूखंडावर २२.९० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या टोलेजंग इमारतींना मंजुरी दिलीच कशी? समोरचा रस्ता आणि अंतर्गत रस्ते अरुंद असताना, २ मजले खोल तळघर (Basement) आणि ७ ते ८ मजल्यांचे काँक्रीटचे जंगल उभारण्याची परवानगी देऊन महापालिकेने सहकारनगरच्या मूळ नियमांना आणि सौंदर्याला हरताळ फासला आहे.”

जर एखादा मोठा प्रकल्प (जसे की ११,१७१ चौरस मीटरचा हा भूखंड) वनाच्छादित टेकडी किंवा आरक्षित वनक्षेत्राच्या (Reserved Forest) सीमेला लागून असेल, तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांनुसार वनक्षेत्राच्या सीमेपासून १०० मीटरचा इको-सेन्सेटिव्ह बफर झोन (Eco-Sensitive Zone) तपासला जातो. या परिघात मोठ्या प्रमाणात उत्खनन करायचे असल्यास विशेष वन्यजीव आणि पर्यावरण परवानग्या लागतात.
खडी क्रशर आणि उत्खनन नियम: डोंगराळ भागात खडी क्रशर किंवा मोठ्या व्यावसायिक खाणी चालवायच्या असल्यास रहिवासी वस्ती आणि डोंगर कड्यापासून १०० ते २०० मीटर अंतराचा नियम लागू होतो.

सहकारनगरचा इतिहास आणि स्वरूप

  • सहकारी चळवळीचा पाया: १९६०-७० च्या दशकात प्रामुख्याने मध्यमवर्गीय, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि बँकेत काम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन ‘सहकारी गृहनिर्माण सोसायट्या’ (Co-operative Housing Societies) स्थापन केल्या, म्हणूनच या परिसराला ‘सहकारनगर’ हे नाव पडले.
  • पुण्याचे फुफ्फुस (Green Lungs): हा भाग संपूर्ण पुण्यात तिथल्या हिरवाई, रुंद रस्ते, बंगले आणि शांत संस्कृतीसाठी ओळखला जातो . सहकारनगर नंबर १ आणि २ हे थेट तळजाई टेकडीच्या वनक्षेत्राला लागून आहेत.

पर्यावरणीय संवेदनशीलता आणि दरडीचा धोका (Landslide History)

तळजाई टेकडीच्या थेट खाली हा परिसर असल्याने येथील डोंगर कटिंग सहकारनगरसाठी टाइम बॉम्ब सारखी आहे:

  • पावसाळ्यातील दुर्घटना: सहकारनगर हा परिसर डोंगराच्या नैसर्गिक उतारावर (Natural Drainage Path) वसलेला आहे. जुलै २०१९ मधील पुण्यात आलेला महापूर (आंबील ओढा पूर) आणि जून २०२४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसात थेट तळजाई डोंगरावरूनमोठा वेगाने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांनी सहकारनगरमधील सोसायट्यांना हैराण केले होते
  • नैसर्गिक प्रवाहांची छेडछाड: तळजाईवरून पावसाचे पाणी खाली वाहून नेणारे आंबील ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह आणि डोंगराळ नाले सहकारनगरमधून जातात. वरच्या भागात (जसे की सर्व्हे नंबर ८, ९ मध्ये) ३० फूट खोल उत्खनन आणि काँक्रीटीकरण झाल्यामुळे हे पाण्याचे नैसर्गिक मार्ग ब्लॉक होऊ शकतात , ज्यामुळे खालच्या भागात अचानक पाणी घुसण्याचा (Flash Floods) धोका वाढतो.

३. रहिवाशांची सजगता (Citizen Activism)

सहकारनगरची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिथले सजग आणि सुशिक्षित नागरिक.तळजाईच्या उत्तरेकडील सहकारनगरची बाजू नागरिकांनी लढून वनक्षेत्र म्हणून टिकवून ठेवली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गर्भलिंग निदानविरोधी कारवाईला गती; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलैला विभागीय आढावा बैठक

पुणे.दि.१७: राज्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध...

राजाराम पूल ते म्हात्रे पुल –डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश एक महिन्यात दीर्घकालीन उपाययोजनांचा...

अमेरिकेचा भारतीय गुंतवणूक असणाऱ्या चाबहार पोर्टवर हल्ला:कंट्रोल टॉवर उडवले

अमेरिकेने सलग सहाव्या रात्री इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले...