नवी मुंबईत एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची पुन्हा विक्री; FDAचा छापा, 76 लाखांचा माल जप्त

Date:

वेफर्स, नूडल्स, सूप, मेयोनिजसह शीतपेयांच्या कॅन्सचा साठा; तुर्भेतील ‘साधना एंटरप्रायझेस’वर कारवाई

नवी मुंबई : नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांची मुदत संपल्यानंतर त्यांच्या पॅकिंगवरील एक्स्पायरी तारीख बदलून ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठविण्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील तुर्भे येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, तब्बल 76 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुदत संपलेला खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 24 ते 29 ऑगस्टदरम्यान तुर्भे येथील ‘मेसर्स साधना एंटरप्रायझेस’ येथे कारवाई केली. तपासणीदरम्यान मुंबई, नवी दिल्ली आणि नोएडा येथील सुमारे 10 प्रमुख निर्यातदार कंपन्यांच्या विविध खाद्यपदार्थांचा साठा या ठिकाणी आढळून आला.

या उत्पादनांची मुदत संपल्यानंतर त्यांच्या लेबलवरील तारीख बदलणे तसेच पॅकिंगमध्ये फेरफार करून ते पुन्हा विक्रीसाठी तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले. ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल जप्त केला.

4,942 बॉक्स जप्त

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी 75 लाख 21 हजार 269 रुपये किमतीचे तब्बल 4,942 बॉक्स खाद्यपदार्थ जप्त केले. याशिवाय 1 लाख 30 हजार 600 रुपये किमतीचा लेबल नसलेला तसेच मुदत संपलेला अतिरिक्त माल हस्तगत करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विशेषतः वेफर्स, बटाटा चिप्स, लोकप्रिय ब्रँडचे नूडल्स, सूप, मेयोनिजची पाकिटे तसेच विविध शीतपेयांच्या कॅन्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समोर आले आहे.

लहान मुलांसह सर्वच वयोगटातील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या एक्स्पायरी तारखांमध्ये फेरफार होत असल्याचे समोर आल्याने या कारवाईचे गांभीर्य वाढले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि असा माल कुठे-कुठे विक्रीसाठी पाठविण्यात आला होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्णकर्कश आवाजाबाबत फडणवीसांची भूमिका ‘शहामृगी’ पद्धतीची : मुकुंद किर्दत

‘यांचेही चालू द्या, त्यांचेही चालू द्या’ अशी भूमिका; पुणेकरांच्या...

राजगड येथील मनसे कार्यालयाबाहेर राज ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध आंदोलन !

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा हटविल्याच्या...

गणेश बिडकर ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्काराने सन्मानित

सामाजिक व पर्यावरणीय कार्याची दखल; सभागृह नेते गणेश बिडकर...

15 सप्टेंबरपासून घाऊक विक्रेत्यांसाठी साखरेच्या साठ्याच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून 2000 क्विंटल इतकी कपात

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखरेच्या साठ्याची मर्यादा...