नागपूर येथे शक्ती आणि सेवेचा संगम; भारतदुर्गा मंदिर व अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन

Date:

नागपूर -रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल नागपूर येथे डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी 461 बेडचे रुग्णालय ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूटचे’ भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. तसेच डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेद्वारे संचालित भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित धर्मसभा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजनाला संतांचा आशीर्वाद लाभला आहे. देशातील सर्वार्थाने सुंदर आणि शक्तिशाली मंदिर उभे राहील, तसेच देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक रुग्णालय येथे उभारले जात आहे. ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चा मुख्य उद्देश गरिबांपर्यंत दर्जेदार उपचार आणि आरोग्यसेवा पोहोचवणे हा आहे. त्याच हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. याच अंतर्गत ४६१ खाटांचे मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. हे इन्स्टिट्यूट दर्जाच्या बाबतीत कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, श्री कार्ष्णि पीठाधीश्वर पूज्य श्री गुरु शरणानंदजी महाराज, जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, पूज्य स्वामी मित्रानंदजी महाराज, पद्मभूषण दीदी माँ पूज्य साध्वी ऋतंभराजी, बागेश्वर धाम सरकार चे पीठाधीश्वर पूज्य पं. धीरेन्द्र शास्त्रीजी, एनसीआयचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याच्या गृह विभागाला न्यायालयाने फटकारले आणि केला ५० हजाराचा दंड

नागपूर-अपमानास्पद वागणूक देण्यासाठी एका माजी सैनिकाला आणि वकिलाला बेकायदा...

विद्यार्थ्यांचे मातीशी नाते जोडण्यासाठी विद्यार्थी सहायक समितीचा पुढाकार

समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन; ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि...