विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Date:

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात

_२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क

_२७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

_निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. १९ :महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाच जागांसाठी १८२ उमेदवार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७ आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार असून, या पाचही मतदारसंघांत मिळून १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर व्यवस्था

पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.

मतदानासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ८४२, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ७४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ४४५, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ८१ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

६ डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार

विधान परिषदेच्या ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण गणपती लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...

पुणे मेट्रो मार्गावरील कामांच्या दर्जावर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी; त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश!

बाणेर–गणेशखिंड रस्त्यावरील प्रलंबित कामांचा आढावा; मध्य दुभाजकांची अयोग्य रेषा,...