विणकर सभागृहासमोरील जनसंपर्क कार्यालयावर पडणार महापालिकेचा हातोडा

Date:

ॲमेनिटी स्पेसवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश; शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची ‘माय मराठी’ला माहिती

पुणे : शहरभर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका लावला असतानाच, विणकर सभागृहासमोरील ॲमेनिटी स्पेसवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी आज सकाळी ‘माय मराठी’शी संपर्क साधून ही माहिती दिली.

विणकर सभागृहासमोरील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बांधकामावरून महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत मायमराठी ने प्रश्न उपस्थित केले होते. या कार्यालयाच्या दर्शनी भागावरील फलकावर प्रभाग क्रमांक ३६ च्या भाजप नगरसेविका शैलजा अरुणशेठ भोसले आणि अनिरुद्ध (बाप्पू) अरुणशेठ भोसले यांची नावे आहेत.मात्र या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही .

पाच वेळा तक्रारी; तरीही प्रत्यक्ष कारवाई नाही!

विणकर सभागृहासमोरील विणकर सोसायटीसह परिसरातील विविध सोसायट्यांसाठी असलेल्या सामायिक खुल्या जागा आणि ॲमेनिटी स्पेसमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती.यासंदर्भात सोसायटीच्या सभासदांनी बांधकाम विभागाकडे पाच वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी संबंधित बांधकाम सोसायटीनेच हटवावे आणि सात दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महापालिकेने सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना पाठविल्याचे वृत्त काही माध्यमांतून आज प्रसिद्ध झाले आहे.मात्र या माध्यमांनी नगरसेविका आणि राजकीय पक्ष यांचे नाव प्रसिद्ध करणे टाळले होते.

सामायिक जागेच्या भाडेपट्ट्यावरूनही वाद

सर्व सोसायट्यांसाठी सामायिक असलेली जागा एका सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने भाडेपट्ट्याने दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर या जागेवर घाईघाईने बांधकाम उभारण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. संबंधित भाडेपट्टा कराराविरोधात न्यायालयातही दाद मागण्यात आल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही दिली होती कार्यालयाला भेट

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या निमित्ताने या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

शहर अभियंत्यांनी दिले कारवाईचे आदेश

दरम्यान, आज या वृत्ताबाबत मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी ‘माय मराठी’शी संपर्क साधला. विणकर सभागृहासमोरील ॲमेनिटी स्पेसवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र त्यांनी पक्षाचे किंवा नगरसेविकेचे नाव घेतले नाही .

या आदेशाची व्याप्ती आणि संबंधित जनसंपर्क कार्यालयाचा त्यामध्ये समावेश असल्याबाबत लेखी आदेशातून अधिक स्पष्टता मिळू शकेल.

संबंधित नगरसेविकेची भूमिकाही अद्याप समोर आलेली नाही.

शहरातील छोट्या बड्या व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालविला आहे. आता विणकर सभागृहासमोरील अनधिकृत बांधकामाबाबत दिलेल्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल असे स्पष्ट झाल्याने , याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धंगेकर, मग एकनाथ शिंदेंवरही कारवाईची मागणी करणार का? भाजप नेते पुष्कर तुळजापूरकरांचा सवाल!

अशोक खरात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्यावरील कारवाईच्या मागणीला भाजपचे...

लग्नाचे आमिष दाखवून १४ महिलांचे शोषण केल्याचा आरोप; दुबईत लपलेल्या फरार आरोपीला भारतात आणले!

एका पीडितेकडून १८ लाख रुपये उकळल्याचा आरोप; महिलांचे खासगी...