रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट; म्हणाले- मराठी शिकवू पण वाद नको

Date:

मुंबई- राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.या निर्णयानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांच्या परवान्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता. यामुळे चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून 4 मेपासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी चालकांना 4 मे रोजी ताकद दाखवण्याचे आवाहन करत बाहेरून आलेल्या लोकांवरही टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे हा विषय आणखीच चिघळला असून सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चा रंगली आहे.या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतुलित भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य देणे चुकीचे नाही. मात्र, या विषयावर वाद निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. ज्यांना मराठी येत नाही, अशा चालकांना मराठी शिकवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याच मुद्द्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, रिक्षा-टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा असावी, पण त्यांची चाचणी घेऊ नये. हे चालक उच्चशिक्षित नसतात, त्यामुळे कठोर अटी लादणे योग्य नाही. तसेच, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी किंवा डिलिव्हरी सेवांमध्ये काम करणारे सर्वजण मराठीत बोलतात का, असा सवाल त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी भाषा, रोजगार आणि स्थानिक अस्मिता या तिन्ही मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मराठीचा आग्रह योग्य असल्याचे मत आहे, तर दुसरीकडे अंमलबजावणीच्या पद्धतीवर आक्षेप घेतले जात आहेत. आता सरकार पुढे कोणता मार्ग निवडते आणि हा वाद कसा निवळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप म्हणजे ‘बकासुराचा’ पक्ष!:न्याय हवा असेल तर ‘बागेश्वर बाबां’कडे जायचे का?

मुंबई-भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना...

नागपूर येथे शक्ती आणि सेवेचा संगम; भारतदुर्गा मंदिर व अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन

नागपूर -रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या...

राज्याच्या गृह विभागाला न्यायालयाने फटकारले आणि केला ५० हजाराचा दंड

नागपूर-अपमानास्पद वागणूक देण्यासाठी एका माजी सैनिकाला आणि वकिलाला बेकायदा...