कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

Date:

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल 2026) सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर एसटी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली.या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 10 डीटी 2697 क्रमांकाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस स्वारगेटहून सांगली जिल्ह्यातील विटा दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच 12 जीएस 9695 क्रमांकाची रिक्षा खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येत होती. घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबेवाडी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच रिक्षातील अन्य प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड), दशरथ निरगुडे (वय 43, रा. अप्पर बिबेवाडी), शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी) अशी जखमीची नावे आहेत.

जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, एसटी बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...