रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलावाच्या मुद्द्यावर प्रशांत जगताप आक्रमक,म्हणाले, ऐन उन्हाळ्यात तलाव बंद करणे कसे सुचते?

Date:

स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेते .. यांनी उपस्थित केला मुद्दा अन आयुक्तांनी लगेच निर्णय दिला ,म्हणाले तलाव सील करा
पुणे : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलावाचा मुद्दा चांगलाच तापला. या तलावाचे व्यवस्थापन अनेक वर्षांपासून एका खाजगी कंत्राटदाराकडे असून, कंत्राटाची मुदत २०२४ मध्ये संपल्यानंतरही त्याच्याकडेच व्यवस्थापन कसे राहिले, असा प्रश्न सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपस्थित केला.

या विषयावर आयुक्तांनी प्रतिक्रिया देताना नियमभंग झाल्याचे संकेत देत जलतरण तलाव तातडीने सील करण्याची भूमिका मांडली. मात्र, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर आक्षेप घेत स्थानिक नागरिकांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला.
जगताप यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्टीत परिसरातील अनेक मुले या तलावात पोहण्यासाठी येतात. प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांना फटका बसू नये. त्यामुळे तलावाचे व्यवस्थापन खाजगी कंत्राटदाराकडून काढून घेऊन महापालिकेने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.या सूचनेवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यामुळे तलावाच्या व्यवस्थापनाबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात प्रशांत जगताप यांनी असे सांगितले कि,’रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलावाचे व्यवस्थापन गेल्या अनेक वर्षांपासून एका खाजगी कंत्राटदाराकडे आहे. या तलावाच्या कंत्राटाची मुदत २०२४ सालीच संपुष्टात आलेली असताना आजपर्यंत या जलतरण तलावाचे व्यवस्थापन त्याच कंत्राटदाराकडे कसे ? हा मुद्दा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या विषयावर महानगरपालिका आयुक्तांनी प्रतिक्रिया देत तातडीने जलतरण तलाव सिल करण्याची भूमिका मांडली.

आपण प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेत स्थानिक नागरिकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले. उन्हाळ्याच्या सुट्टीत रास्ता पेठ व परिसरातील अनेक बालके या जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराचा फटका या बालकांना बसू नये. ठेकेदाराकडून जलतरण तलावाचे व्यवस्थापन महानगरपालिका प्रशासनाने स्वतःकडे घ्यावे अशी आपण मांडली. या सूचनेवर सकारात्मक विचार केला जाईल असे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...