शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती

Date:

‘लेक शिकली, प्रगती झाली’ ही केवळ एक म्हण नाही, तर आजच्या बदलत्या समाजाचा मार्गदर्शक विचार बनली आहे. महिलांचे शिक्षण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिक्षित महिला म्हणजे सक्षम कुटुंब, जागरूक समाज आणि प्रगत राष्ट्र ही जाणीव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी शंभर टक्के शुल्क माफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हा निर्णय राज्यातील हजारो कुटुंबांसाठी दिलासा देणारा आणि मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत आहे.

तंत्रशिक्षण हे रोजगारक्षम शिक्षण मानले जाते. इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमामुळे मुलींना कमी कालावधीत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता येतात. प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या (प्रॅक्टिकल) माध्यमातून त्यांना कामाचा अनुभव मिळतो. त्यामुळे त्या केवळ सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून राहत नाहीत, तर उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी तयार होतात.

आज उत्पादन उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, ऑटोमोबाईल आणि आता नव्या युगामध्ये संगणक अभियांत्रिकीसोबतच इतर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स आदी अनेक क्षेत्रांमध्ये मुलींसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. तंत्रशिक्षणामुळे त्या आत्मनिर्भर बनतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याची क्षमता विकसित करतात. एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा आधारस्तंभ बनते.

अनेक कुटुंबांमध्ये आजही आर्थिक मर्यादा ही मुलींच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरते. विशेषतः तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक मुली दहावी किंवा बारावीनंतर शिक्षण थांबवतात. अशा परिस्थितीत ही फी माफी योजना मुलींसाठी एक मोठा आधार ठरते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत आहे, अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येते. त्यामुळे आर्थिक अडथळ्यांमुळे शिक्षण थांबण्याची वेळ येत नाही.

ही योजना अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महाडिबीटी (DBT) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतो आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण होते. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते. विद्यार्थ्यांना कार्यालयीन प्रक्रियेमध्ये अडकून पडावे लागत नाही आणि त्यांना सहजपणे योजनेचा लाभ मिळतो. डिजिटल प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्र अधिक आधुनिक आणि सोयीस्कर बनले आहे.

या योजनेमुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार सहज उपलब्ध होतो. त्यामुळे केवळ शहरी भागातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलीही तंत्रशिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. यामुळे शिक्षणातील असमानता कमी होण्यास मदत होत आहे. प्रत्येक मुलीला तिच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेण्याची समान संधी मिळत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एखाद्या छोट्या गावातील मुलगी तंत्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहू शकते, हे या योजनेमुळे शक्य होत आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि समाजात समान संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षित आणि आत्मनिर्भर महिला समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलतात. त्यामुळे अशा योजनांचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही.

आजच्या काळात मुली शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा वेळी आर्थिक अडचणी त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरू नयेत, यासाठी ही फी माफी योजना अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी ही योजना राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अधिक माहितीसाठी https://msbte.ac.in तसेच https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

— संकलन: विभागीय माहिती कार्यालय, पुणे
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जाहिरात माफियांच्या दबावापुढे नमले,होर्डींग्ज धोरण मागे घेतले

आपल्या जाहिरात व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही जाहिरात माफियांनी...

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...