पुण्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामाचा सचिन अहिर यांनी घेतला सविस्तर आढावा

Date:

मतदार पुनर्निरीक्षण, बीएलए नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

पुणे, दि. ३ ऑगस्ट : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुणे दौऱ्यादरम्यान शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तळागाळापर्यंत पोहोचून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सचिन अहिर यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला पुणे श्रमिक पत्रकार संघाला भेट दिली. यावेळी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्याच्या माजी महापौर मंजुषा नागपुरे यांनीही त्यांची भेट घेतली.

पत्रकारांशी संवाद साधताना अहिर यांनी लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पुण्याचे संपर्कप्रमुख म्हणून पूर्वी काम केले असल्याने पुणे हे आपले ‘होम ग्राउंड’ असून, शहरातील पत्रकारांशी अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

त्यानंतर अहिर यांनी पुण्यातील शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत पुणे शहरातील पक्षबांधणी, शाखास्तरावरील संघटन विस्तार, मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम, बूथ लेव्हल एजंटच्या नियुक्त्या तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने करावयाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेत अहिर यांनी संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रभाग आणि शाखास्तरावर पक्षाची यंत्रणा सक्षम करण्यासोबतच मतदारांशी नियमित संपर्क ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

अहिर म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील शिवसैनिकांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रशासकीय कामे झाली पाहिजेत. पदाधिकाऱ्यांना आवश्यक बळ मिळावे यासाठी त्यांच्या कार्याची सकारात्मक शिफारस उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल.”

विधान परिषद कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कामासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

“संघटना मजबूत असेल तर जनतेची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावता येतात. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याला सक्षम करण्याबरोबरच शिवसैनिकांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करावे आणि पक्षविस्तारासाठी तळागाळापर्यंत पोहोचावे,” असे आवाहन अहिर यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, उपनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेनेच्या विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. अहिर यांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बाळासाहेब भारदे, कुमार सप्तर्षीं नंतर आता गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव कदम

पुणे-महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व भारती...

महापालिकेच्या ३५ कोटींच्या थकीत भाडेवसुलीसाठी विशेष मोहीम राबवा

थकबाकीदारांना ३० दिवसांत अंतिम नोटिसा; जाणीवपूर्वक भाडे थकविणाऱ्यांवर कायदेशीर...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

पुणे.दि.३: महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर...

तीन वर्षांच्या हरवलेल्या चिमुकलीचा अवघ्या तासाभरात शोध

३८ पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने परिसर पिंजून काढला; कर्वेनगरमधील बिजली...