महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

Date:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती
​
​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या महान कार्याचा आणि पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग राज्यभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.अल्पसंख्याक समुदायातील महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांपर्यंत महात्मा फुले यांचे विचार प्रभावीपणे पोहोचवणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
​
अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये अनेकविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या वसतिगृहांमध्ये “महात्मा फुले ग्रंथ कोपरा” स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये महात्मा फुले यांचे साहित्य मराठी, उर्दू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये “सत्यशोधक विचार” या संकल्पनेवर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धा सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची आणि विचारांची माहिती देणाऱ्या विशेष रील्स आणि व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या जाणार आहेत. या क्लिप्स विभागाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच विविध समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट मदरशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित आणि वाचन स्पर्धांचा समावेश असलेला “महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह” आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या अत्यंत महत्त्वाच्या व निवडक ग्रंथांचा उर्दू भाषेत अनुवाद करून त्यांचे प्रकाशन केले जाईल,अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

​महात्मा फुले यांच्या समतावादी आणि शैक्षणिक क्रांतीच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत, विशेषतः अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व उपक्रम अत्यंत मोलाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

mymarathi.net चे सर्व वाचक, दर्शक स्नेही ,फौलोअर्स, जाहिरातदार ज्यांच्या पाठींब्यावर १४ वर्षे मराठी न्यूज देण्यासाठी कोणत्याही बड्या भांडवलदारा शिवाय आम्ही स्वतंत्रपणे अविरत वाटचाल सुरु ठेवली आहे. अशा सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा………







SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...

पुणे विभागात एफडीएचा दणका! ५.२ टन खाद्यपदार्थ जप्त; २० आस्थापनांवर कारवाई

१४.८७ लाखांचा साठा जप्त; ५५९ किलो मिठाई व खाद्यपदार्थ...