पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

Date:

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील खर्च, परवानग्या आणि झाडांच्या अस्तित्वाची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी

पुणे (माय मराठी वृत्तसेवा) :

पुणे शहरात गेल्या नऊ वर्षांत विकासकामांसह विविध कारणांसाठी किती झाडे तोडण्यात आली, किती झाडे मुळासकट काढण्यात आली, किती झाडांचे पुनर्रोपण झाले आणि त्या बदल्यात लावलेल्या नवीन झाडांपैकी प्रत्यक्षात किती झाडे आज जिवंत आहेत, याचा संपूर्ण हिशेब पुणे महापालिकेने नागरिकांसमोर मांडावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते साईनाथ बाबर यांनी केली आहे.

सन २०१७ पासून आजपर्यंत पुणे महापालिका हद्दीत झालेल्या वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र व सखोल लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे उद्देशून तयार केलेल्या निवेदनात केली आहे.

‘कागदावर झाडे लावली, पण प्रत्यक्षात किती जगली?’

पुण्यातील वाढते प्रदूषण, घटणारी हरितक्षेत्रे आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल याकडे लक्ष वेधत बाबर यांनी वृक्षसंवर्धनाच्या कामकाजातील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

महापालिकेच्या परवानगीने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि पुनर्रोपण केले जात असताना त्याबदल्यात होणाऱ्या भरपाई वृक्षलागवडीची प्रत्यक्ष स्थिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केवळ वृक्षलागवडीची आकडेवारी जाहीर करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी संपत नाही. लावलेल्या झाडांचे अस्तित्व, त्यांची वाढ, देखभाल आणि जिवंत राहण्याचे प्रमाण तपासले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

२०१७ पासूनच्या सर्व परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी

महापालिकेने २०१७ पासून वर्षनिहाय किती झाडे तोडण्यास, मुळासकट काढण्यास आणि पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली, याची प्रमाणित माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

परवानगी दिलेल्या संख्येनुसार प्रत्यक्ष किती झाडे तोडली गेली, संबंधित ठिकाणांची पाहणी झाली का आणि नियमांचे पालन करण्यात आले का, याचीही स्थळनिहाय पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भरपाई वृक्षलागवडीतील झाडे कुठे आहेत?

विकासकामांसाठी झाडे तोडण्यास परवानगी देताना नियमानुसार भरपाई वृक्षलागवडीच्या अटी घातल्या जातात.

मात्र अशा अटींनुसार किती झाडे लावणे आवश्यक होते, प्रत्यक्ष किती झाडे लावण्यात आली आणि त्यांची नेमकी ठिकाणे कोणती, याचा तपशील नागरिकांना उपलब्ध व्हावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

पुनर्रोपण केलेल्या आणि नव्याने लावलेल्या झाडांची प्रत्यक्ष मोजणी करून किती झाडे जिवंत आहेत, किती मृत झाली आणि किती ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागणार आहे, याचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

वृक्षलागवडीच्या खर्चाचेही ऑडिट करा

वृक्षलागवड, पुनर्रोपण, देखभाल आणि संवर्धनासाठी महापालिकेने किती निधी खर्च केला, याचे आर्थिक लेखापरीक्षण करण्याची मागणी बाबर यांनी केली आहे.

संबंधित कंत्राटे, कंत्राटदारांना दिलेली देयके, अनामत रक्कम आणि नियमभंगाबद्दल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई यांचा सविस्तर आढावा घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.

वृक्षलागवड किंवा देखभालीच्या अटींचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंत्राटदार, विकासक किंवा जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी

वृक्षतोड आणि भरपाई वृक्षलागवडीचे लेखापरीक्षण केवळ महापालिकेच्या अंतर्गत नोंदींपुरते मर्यादित ठेवू नये, अशी भूमिका बाबर यांनी मांडली आहे.

या कामासाठी पर्यावरणतज्ज्ञ, वृक्षतज्ज्ञ आणि स्वतंत्र लेखापरीक्षण तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

समितीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल तयार करावा. या अहवालात वर्षनिहाय वृक्षतोड, पुनर्रोपण, भरपाई वृक्षलागवड, खर्च आणि जिवंत झाडांची संख्या नमूद करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करा

लेखापरीक्षणाचा संपूर्ण अहवाल पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी साईनाथ बाबर यांनी केली आहे.

भविष्यात वृक्षतोडीच्या परवानग्या, पुनर्रोपण, भरपाई वृक्षलागवड आणि झाडांच्या सद्यस्थितीची माहिती नियमितपणे अद्ययावत करून सार्वजनिक करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

‘पुणेकरांना वृक्षलागवडीचे आकडे नाहीत, जगलेल्या झाडांचा हिशेब हवा!’

पुणे शहरातील वृक्षसंपदा ही केवळ विकासकामांमधील अडथळा नसून नागरिकांचे आरोग्य, हवेची गुणवत्ता आणि भविष्यातील पर्यावरणीय सुरक्षिततेशी संबंधित बाब असल्याचे बाबर यांनी नमूद केले आहे.

वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेत अनियमितता, निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच लेखापरीक्षणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्याचा अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘पुणेकरांना केवळ किती झाडे लावली याची आकडेवारी नको; तर किती झाडे प्रत्यक्ष जगली, याचा हिशेब हवा,’ असे साईनाथ बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

mymarathi.net चे सर्व वाचक, दर्शक स्नेही ,फौलोअर्स, जाहिरातदार ज्यांच्या पाठींब्यावर १४ वर्षे मराठी न्यूज देण्यासाठी कोणत्याही बड्या भांडवलदारा शिवाय आम्ही स्वतंत्रपणे अविरत वाटचाल सुरु ठेवली आहे. अशा सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा………







SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुणे विभागात एफडीएचा दणका! ५.२ टन खाद्यपदार्थ जप्त; २० आस्थापनांवर कारवाई

१४.८७ लाखांचा साठा जप्त; ५५९ किलो मिठाई व खाद्यपदार्थ...