बाळासाहेब भारदे, कुमार सप्तर्षीं नंतर आता गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव कदम

Date:

पुणे-महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. गेले सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर आता ही निवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांचा विश्वस्त मंडळात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी दिली. या व्यतिरिक्त तुषार गांधी, लक्ष्मीकांत देशमुख, सिसिलिया कार्व्हालो, अॅड. अभय छाजेड, मच्छिंद्र गोर्डे, एम. एस. जाधव, रमेश आढाव यांचा विश्वस्त मंडळात समावेश आहे. तसेच सुनील पाटील हे निमंत्रित विश्वस्त आहेत.

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे विचार व कार्य कायम राखून वाढवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात गांधी स्मारक निधी अंतर्गत गांधीभवन त्या त्या राज्याच्या नावाने उभारण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात १९५० नंतर या कार्याची सुरुवात होऊन १९६१ मध्ये पुण्यात कोथरूड येथे गांधी भवन साकारले गेले. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मामासाहेब देवगिरीकर, बाळासाहेब भारदे आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गेल्या ७५-७६ वर्षांत अध्यक्षपदाची धुरा सांभाळी.

डॉ. शिवाजीराव कदम हे भारतीय विद्यापीठाचे कुलपती असून दीर्घकाळ महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत. त्याचे ज्येष्ठ बंधू कै. डॉ. पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच डॉ. शिवाजीराव कदम यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मोठा पुढाकार घेतला. गांधीभवन येथील गांधी दर्शन शिबीरे आणि पहिल्या पुण्यातील गांधी विचार साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा विशेष पुढाकार होता. विवेक सावंत हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. चे व्यवस्थापकीय संचालक होते. आता मुख्य मार्गदर्शक म्हणून ते काम बघत आहेत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना देखील संगणक प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेला एम. एस. सी. आय. टी. हा संगणक प्रशिक्षण कोर्स खूप लोकप्रिय व परिणामकारक झाला.

गांधीवादी विचारसरणीचे पुण्यातील कॉंग्रेस चे अॅड. अभय छाजेड हे अपघातानंतर पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी संचेती हॉस्पिटल येथे जाऊन अॅड. अभय छाजेड यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्म स्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वागत

घटनात्मक धर्मस्वातंत्र्य कायम ठेवून फसवणूक, प्रलोभन आणि दबावाद्वारे होणाऱ्या...

पुण्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामाचा सचिन अहिर यांनी घेतला सविस्तर आढावा

मतदार पुनर्निरीक्षण, बीएलए नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

महापालिकेच्या ३५ कोटींच्या थकीत भाडेवसुलीसाठी विशेष मोहीम राबवा

थकबाकीदारांना ३० दिवसांत अंतिम नोटिसा; जाणीवपूर्वक भाडे थकविणाऱ्यांवर कायदेशीर...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

पुणे.दि.३: महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर...