रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने हटवा : केंद्रीय मंत्री मोहोळ

Date:

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सूचना
  • ⁠पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षितता वाढवण्याच्याही सूचना
  • ⁠’रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करा’

पुणे : मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांतील खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आणि परिसरातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधत विकासकामांना गती देण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण याबाबत ठोस सूचना केल्या.

पुणे रेल्वे स्थानकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्रस्तावित अतिरिक्त सहा प्लॅटफॉर्मच्या कामाचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना मोहोळ यांनी केली. प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करावे, जेणेकरून भविष्यात वारंवार फेरबदल किंवा विस्कळीत बांधकामाची वेळ येणार नाही, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या प्रश्नावर मोहोळ यांनी विशेष भर दिला. स्थानकावरील सर्व अनधिकृत प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग तातडीने बंद करावेत, तसेच संरक्षक भिंत अधिक मजबूत करावी, अशी सूचना त्यांनी केली. स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर २४ तास टीसी आणि आरपीएफ कर्मचारी उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकाधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली.

पावसाळ्यात पुणे रेल्वे स्थानक परिसरात तसेच प्लॅटफॉर्म आणि कार्यालयांमध्ये पाणी साचणे व गळती होण्याच्या समस्या उद्भवतात. या समस्येवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. पार्सल कार्यालयात पावसाचे पाणी शिरून ग्राहकांच्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठीही दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने खालील बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही मोहोळ यांनी केली..

  • रेल्वेगाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक किमान ३० मिनिटे आधी जाहीर करावेत.
  • स्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची देखभाल अधिक चांगल्या पद्धतीने करावी.
  • खानपान सेवांमधील जादा दर, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी दूर कराव्यात.
  • वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खानपान कंत्राटदारांवर निलंबन आणि करार समाप्तीची कारवाई करावी.
  • स्थानकावरील पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्सल आदी कंत्राटांमध्ये होणारी अतिरिक्त वसुली रोखावी.
  • लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करा !

पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड परिसरातील रेल्वेच्या मोक्याच्या जागांचा योग्य व्यावसायिक वापर करून रेल्वेला महसूल मिळवून देण्याची आवश्यकता असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. रेल्वेच्या मौल्यवान जागांचे संरक्षण करतानाच त्यांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्यावर त्यांनी भर दिला.

हडपसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर महत्त्वाच्या गाड्या हाताळल्या जात असताना तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दाही मोहोळ यांनी उपस्थित केला. प्रसाधनगृह, स्वच्छतागृह यांसह आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. खडकी येथील टर्मिनलमध्येही कायमस्वरूपी बांधकाम, निवारा, आसनव्यवस्था, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.

डेक्कन क्विनला पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आणा

पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ऐतिहासिक डेक्कन क्विन एक्स्प्रेसचे पुणे स्थानकावरील संचालन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.

डेक्कन क्विन ही पुणे-मुंबई प्रवासाची ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित ओळख आहे. त्यामुळे तिचे पुणे स्थानकावरील संचालन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

तसेच डेक्कन क्विनच्या डायनिंग कारचीही पूर्वी मोठी प्रतिष्ठा होती. मात्र सध्या डायनिंग कारमधील अन्नाची गुणवत्ता आणि सेवेबाबत तक्रारी असल्याने पूर्वीचा दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा कायम करण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी सूचनाही मोहोळ यांनी केली.

पुणे-हडपसर स्थानकांवरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

पुणे आणि हडपसर रेल्वे स्थानकांवर ऑटोचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींचीही मोहोळ यांनी दखल घेतली. रेल्वे प्रशासनाने आरटीओ आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय साधून ही व्यवस्था सुरळीत करावी. तसेच प्रीपेड ऑटो आणि टॅक्सी सेवा सुरू करण्याबरोबरच स्थानकांसमोरील अनियमित पार्किंगवर नियंत्रण आणावे, अशी सूचना त्यांनी केली.

“पुणे आणि परिसरातील रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रेल्वेच्या विकासकामांना गती देतानाच प्रवाशांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि सेवांचा दर्जा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पुणे रेल्वे स्थानकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन झाले पाहिजे. त्याचबरोबर रेल्वेच्या मौल्यवान जमिनींचे संरक्षण आणि अतिक्रमणमुक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. डेक्कन क्विनसारख्या ऐतिहासिक रेल्वेच्या बाबतीत प्रवाशांच्या मागण्या आणि पुण्याची ऐतिहासिक ओळख लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय व्हावेत. या सर्व प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून विकासकामांना गती द्यावी.”

बैठकीत मांडलेल्या या सर्व प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाने कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, तसेच पुणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुविधायुक्त आणि दर्जेदार सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षा मोहोळ यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का...

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम

अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप पुणे,...

राहुल-प्रियांका गांधींची २ तासानंतर सुटका (झुंज : इंदिराजींच्या नातवांची “व्हिडीओ”)

आकाशवाणी भवनातील दीर्घ ठिय्यानंतर पोलिसांची कारवाई; CEC ज्ञानेश कुमारांच्या...