राहुल-प्रियांका गांधींची २ तासानंतर सुटका (झुंज : इंदिराजींच्या नातवांची “व्हिडीओ”)

Date:

आकाशवाणी भवनातील दीर्घ ठिय्यानंतर पोलिसांची कारवाई; CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना ताब्यात घेतले. अनेक तास चाललेल्या ठिय्यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळ रिकामे करण्यासाठी कारवाई केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना नंतर सोडण्यात आले.

आकाशवाणी भवन परिसरात राहुल आणि प्रियांका गांधींसह काँग्रेस व INDIA आघाडीचे अनेक नेते तळ ठोकून होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याची मागणी त्यांनी कायम ठेवली होती. पोलिसांनी वारंवार आंदोलन संपवण्याचे आवाहन केल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना हटवण्याची कारवाई करण्यात आली.

याआधी संसद परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेला विरोधकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला होता. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी, डेरिक ओ’ब्रायन यांच्यासह अनेक नेत्यांनाही दिवसभरात ताब्यात घेण्यात आले होते.

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी पूर्वनियोजित औपचारिक भेट मागण्यात आली नसल्याचे म्हटले. त्यामुळे आंदोलन आणि निवडणूक आयोगातील संघर्ष दिवसभर कायम राहिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का...

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम

अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप पुणे,...

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप

पहिल्या आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ जानेवारी ते ऑगस्ट...