महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम

Date:

अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप

पुणे, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : देशाचे संवेदनशील आणि लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सेवा अभियान’ अंतर्गत ‘आँगन का मिलन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग स्कूल, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथे करण्यात आले. पुणे शहराच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या पुढाकाराने आणि अध्यक्षतेखाली आयोजित या उपक्रमात अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.

महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची भूमिका सौ. मंजुषा नागपुरे यांनी सातत्याने घेतली आहे. याच लोकाभिमुख दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत ‘आँगन का मिलन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बालकांच्या संगोपनापासून त्यांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वांगीण विकासापर्यंत अंगणवाडी सेविका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समाजाच्या भवितव्याची पायाभरणी करणाऱ्या या सेविकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या सेवाभावाला योग्य सन्मान मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.

“पुणे शहराच्या विकासाचा विचार करताना केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर शहरातील प्रत्येक घटकाचा सामाजिक आणि मानवी विकास महत्त्वाचा आहे. बालकांच्या जडणघडणीत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे,” असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी सांगितले.

महापौरांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित लहान बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व हवाई वाहतूक) मा. श्री. मुरलीधरजी अण्णा मोहोळ आणि राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. ॲड. वर्षाताई डहाळे, पुणे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. मनीषाताई लडकत, महिला मोर्चा पुणे शहर प्रभारी व मा. नगरसेविका सौ. ब्रिंदा गणत्रा यांच्यासह स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी, कोमल नवले, जयश्री भूमकर, नगरसेवक श्रीकांत जगताप, हरिदास चरवड, व सर्व महिला पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा, संवेदना आणि सहभाग’ या त्रिसूत्रीवर भर

पुणे शहराच्या महापौर म्हणून सौ. मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वातून ‘सेवा, संवेदना आणि सहभाग’ या त्रिसूत्रीला प्राधान्य दिले जात असून, समाजातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचाव प्रयत्न केला जात आहे. ‘आँगन का मिलन’ हा उपक्रम याच लोकाभिमुख आणि सेवाभावी नेतृत्वाची प्रचिती देणारा ठरला.

अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा सन्मान आणि बालकांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य यामुळे ‘आँगन का मिलन’ हा केवळ एक कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील नेतृत्वाचा संदेश देणारा उपक्रम ठरला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का...

राहुल-प्रियांका गांधींची २ तासानंतर सुटका (झुंज : इंदिराजींच्या नातवांची “व्हिडीओ”)

आकाशवाणी भवनातील दीर्घ ठिय्यानंतर पोलिसांची कारवाई; CEC ज्ञानेश कुमारांच्या...

पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप

पहिल्या आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ जानेवारी ते ऑगस्ट...