कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

Date:

  • पूर्वपरवानगीशिवाय उभारलेली भव्य इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात
  • संपूर्ण बांधकाम निष्कासित करण्यासाठी पुढील दोन दिवस कारवाई सुरू राहणार

पुणे : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे पूर्वपरवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या सुमारे ९,५०० चौरस फुटांच्या भव्य अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने बुधवारी (दि. १९) धडक कारवाई केली. पहिल्याच दिवशी इमारतीचा बहुतांश भाग पाडण्यात आला असून, हे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यासाठी पुढील दोन दिवस कारवाई सुरू राहणार आहे.

कदमवाकवस्ती येथील गट क्रमांक ४७७ व ४९२ मध्ये हेमंत हडके यांनी ‘पीएमआरडीए’ची पूर्वपरवानगी न घेता हे बांधकाम केले होते. ‘पीएमआरडीए’च्या पाहणीदरम्यान ही बाब निदर्शनास आली होती. ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात तहसीलदार रवींद्र रांजणे व तहसीलदार आशा होळकर यांचा समावेश होता.

“नागरिकांनी ‘पीएमआरडीए’च्या मंजुरीशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या अशा अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाकडून यापुढेही कठोर व कायदेशीर कारवाई केली जाईल.”

डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने हटवा : केंद्रीय मंत्री मोहोळ

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सूचना ⁠पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षितता...