नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल ॲप’वर खास सोय

Date:

प्रामुख्याने शेतकऱ्यांसह इतर वीजग्राहकांनाही सोय उपलब्ध

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२६: राज्यातील प्रामुख्याने शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणत्याही भागातील नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) माहिती थेट ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे एका क्लिकवर देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नादुरुस्त रोहित्र ताबडतोब बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होणार आहे. या अॅपद्वारे कोणालाही कोणत्याही ठिकाणच्या नादुरुस्त रोहित्राची माहिती देता येईल, हे विशेष. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईटवर किंवा कॉल सेंटरमध्ये देखील तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे.

महावितरणने नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तथापि, नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. त्याची गंभीर नोंद घेत मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्यासाठी नागरिकांना ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे खास सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ही सुविधा अॅपवर कार्यान्वित झाली आहे.

महावितरणकडून राज्यभरातील ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपींग पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्रांची माहिती देणे कोणालाही ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे अॅप डाऊनलोड केलेल्या सर्व मोबाईलधारकास कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्याची सोय मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले स्टोअर’ किंवा ‘अॅपल स्टोअर’वर उपलब्ध आहे.

नादुरुस्त रोहित्राची अशी करा तक्रार-
‘महावितरण मोबाईल अॅप’मध्ये ग्राहक क्रमांकासोबत लॉगिन किंवा लॉगिन न करता गेस्ट म्हणूनही नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवता येईल. ही माहिती कळविताना संबंधित नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणाजवळ असणे मात्र आवश्यक आहे. या अॅपमध्ये मुख्य पानावर ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या रकान्यावर क्लिक केल्यास पुढील पानावर नाव आणि व्हॉटस् अॅपचा मोबाईल क्रमांक (लॉगिन नसल्यास) विचारला जाईल. तत्पूर्वी या अॅपमधील लोकेशन परमिशन ‘ऑन’ असणे आणि मोबाईल संचाचे लोकेशन सुरू करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ओटीपी निर्माण करण्यास सांगितले जाईल. हा ओटीपी संबंधितांना व्हॉटस् अॅपवर प्राप्त होईल. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर एका चौकटीत नादुरुस्त किंवा बंद रोहित्राचा ‘फोटो काढा’ असा पर्याय येईल. संबंधित नादुरुस्त रोहित्राचा केवळ फोटो काढावा. या चौकटीखालीच एका नकाशामध्ये अक्षांश-रेखांशासह रोहित्राचे रेखाचित्र, रोहित्राचे नाव व क्रमांक (डीटीसी नंबर) दिसेल. एकापेक्षा अधिक रोहित्र असल्यास जे नादुरुस्त आहे त्यावर क्लिक करता येईल. त्यानंतर ‘नोंद करा’ (सबमीट) पर्याय क्लिक केला की ही माहिती तात्काळ संबंधित कार्यालयातील अभियंता व जनमित्रांना मोबाईल संदेशाद्वारे प्राप्त होईल व रोहित्राची तपासणी करण्यात येईल. लहान दोष असल्यास रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल किंवा रोहित्र नादुरुस्त असल्यास ते ताबडतोब बदलण्यात येईल. रोहित्र दुरुस्त झाले किंवा बदलले याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना देखील व्हॉटस् अॅपद्वारे कळविण्यात येणार आहे.

महावितरणच्या वेबसाईट किंवा कॉल सेंटरद्वारे तक्रारीची सोय–
मोबाईल अॅपसोबतच नादुरुस्त रोहित्राची तक्रार किंवा माहिती देण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर, संबंधित कार्यालय किंवा ग्राहक सुविधा केंद्रामध्ये किंवा २४ तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५/ १८००२३३३४३५/ १९१२ या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहक रकान्यात जाऊन ‘ऑनलाइन तक्रार नोंदवा’मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदविता येईल. यासह या वेबसाईट किंवा महावितरण मोबाईल अॅपवरील ‘ऊर्जा चॅट बॉट’द्वारे देखील इतर तक्रारींसोबतच मराठी व इंग्रजी संवादाद्वारे तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

राज्य शासनाकडून अभूतपूर्व निर्णय; बळीराजाला दिलासा विशेष निधीद्वारे शेतीसाठी अखंडित...

“पुणे बंदची भाषा खपवून घेणार नाही; महापौर नागपुरे-बिडकरांची तंबी”

‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकीय स्कोअर करू नका’; सभागृह नेते गणेश...