चाकणपाठोपाठ थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!

Date:

  • थेऊर येथील १० एकर गायरान जागेवर १५० टीपीडी क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
  • सन २०४३ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्यावाढीचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन
  • आमदार ज्ञानेश्वर कटके व महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित घनकचरा प्रकल्पाच्या निर्णयानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील कचराकोंडी फोडण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. थेऊर आणि परिसरातील १३ गावांसाठी (एकूण १४ ग्रामपंचायती) मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी थेऊर येथील पीएमआरडीएची १० एकर गायरान जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सन २०४३ मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून १५० टीपीडी (टन प्रतिदिन) क्षमतेचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या नियोजनाबाबत पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज (दि. ६ ऑक्टोबर) शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत आणि महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, उपअभियंता रितेश मुंढे, उपअभियंता अरविंद सिद्राल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, हवेलीचे गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्यासह संबंधित १४ गावांचे सरपंच, प्रशासक व विस्तार अधिकारी उपस्थित होते.

थेऊर (ता. हवेली) येथील उपलब्ध गायरान क्षेत्रापैकी १० एकर जागा या घनकचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. सन २०४३ मधील संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन १५० टीपीडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर योजनेनुसार, प्रकल्पस्थळापासून २० किलोमीटर अंतराच्या आतील सहभागी ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलित करून तो या प्रकल्पस्थळी आणून देणे अपेक्षित आहे. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी निश्चित केलेली ‘टिपिंग फी’ संबंधित ग्रामपंचायतींना भरावी लागणार आहे. तसेच, या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यात आले आहेत.

या प्रकल्पामुळे पूर्व हवेलीतील १४ ग्रामपंचायतींच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यामध्ये थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोळवडी या गावांचा समावेश आहे.

आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी ‘पीएमआरडीए’ने हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. “ज्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्यांना कचरा वाहतुकीसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, या भागातील लगतच्या इतर ग्रामपंचायतींनीही या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

चाकणपाठोपाठ पूर्व हवेलीलाही दिलासा

चाकण एमआयडीसी परिसरातील १९ ग्रामपंचायती व दोन नगरपरिषदांसाठी पीएमआरडीएकडून मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता थेऊर परिसरासाठी हा दुसरा मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पीएमआरडीएच्या दोन्ही औद्योगिक व निमशहरी पट्ट्यांमधील पुढील ३० वर्षांच्या कचरा व्यवस्थापनाचा आराखडा अधिक स्पष्ट झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आशुतोष दीक्षित आता भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 31 ऑक्टोबरला स्वीकारणार पदभार

3,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव; ऑपरेशन सफेद सागर, रक्षक...

आकाशवाणी भवनात राहुल-प्रियांकांचा ठिय्या सुरूच; राहुल यांना हटवण्यासाठी पोहोचले पोलिस, कार्यकर्त्यांनी घेरले.

मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांना चकवा देत दोघे आवारात; EC म्हणते—भेटीसाठी...

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल ॲप’वर खास सोय

प्रामुख्याने शेतकऱ्यांसह इतर वीजग्राहकांनाही सोय उपलब्ध मुंबई, दि. ६ ऑक्टोबर...

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

राज्य शासनाकडून अभूतपूर्व निर्णय; बळीराजाला दिलासा विशेष निधीद्वारे शेतीसाठी अखंडित...