अविरत 25 वर्षांच्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर

Date:


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावातील 10 महत्त्वपूर्ण बाबी

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

सरकारचे प्रमुख म्हणून अविरत 25 वर्षांच्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केला. हे केवळ औपचारिक अभिनंदन नसून राष्ट्र प्रथम आणि नागरिक प्रथम हे तत्त्व शिरोधार्ह मानून पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या असाधारण वाटचालीचा हा सन्मान आहे. गुजरातमध्ये मिळालेले तीन प्रचंड जनादेश आणि सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेला पाठिंबा, यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास दिसून येतो.

पुढील दहा वैशिष्ट्ये, गुजरातमधले त्यांचे नेतृत्व ते भारताचे नेतृत्व अशा अखंड सूत्राबद्दल सांगतात. 

1. गुजरातच्या नेतृत्वापासून भारताच्या नेतृत्वापर्यंत -विकासाचा दृष्टिकोन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे यशस्वी उपक्रम राष्ट्रीय स्तरावर कसे नेले, याचा मागोवा या ठरावात घेतला आहे. स्वागत(SWAGAT) उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तीशः नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. या उपक्रमाला 2010 मध्ये संयुक्त राष्ट्र लोक  सेवा पुरस्कार मिळाला. नंतर याच उपक्रमाने प्रगती (PRAGATI) मंचासाठी  प्रेरणा दिली. या मंचाने रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांची पूर्तता जलद करण्यासाठी सरकारांना एकत्र आणले. त्याचप्रमाणे, ज्योतिग्रामचे स्वतंत्र कृषी वीज फीडर हे एक राष्ट्रीय दृष्टिकोन ठरले.  गुजरातचा अनुभव संपूर्ण भारतात पोहोचला.

2. गरिबांबद्दलची संवेदना व्यापक स्तरावरील सन्मानात रूपांतरित
आपल्या आईला दैनंदिन जीवनातील अडचणींशी संघर्ष करताना पाहणे आणि प्रवासादरम्यान गरिबी व अभाव यांचे दर्शन, यातूनच पंतप्रधान मोदी यांच्यात गरिबीविषयीची संवेदनशीलता विकसित झाली. यातून प्राप्त झालेला दृष्टिकोन घरकुल, पाणी, बँकिंग सुविधा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या विविध योजनांमध्ये प्रतिबिंबित झाला  आहे.  जवळपास 60 कोटी जन-धन खाती, 4 कोटींहून अधिक घरे आणि 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर येणे हे  वैयक्तिक जाणिवेचे रूपांतर जनहिताच्या कृतीत होऊन त्यातून कुटुंबांना कसा सन्मान प्राप्त झाला, ते दर्शवतात.

3.सक्षमीकरणामुळे समाजातील सर्व घटकांसाठी नव्या संधींची दारे खुली

लोकांना स्वतःचे भविष्य घडविण्यास सक्षम करण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार या ठरावातून सातत्याने अधोरेखित होतो. सुमारे 3.5 कोटी महिला लखपती दीदी झाल्या, तर नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. स्टार्टअप्स, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सुधारणांमुळे युवांसाठी संधी विस्तारल्या. पीएम-किसान अंतर्गत हस्तांतरित करण्यात आलेली रक्कम ₹4 लाख कोटींहून अधिक झाली आहे. तसेच, पीएम-जनमनच्या माध्यमातून विशेषतः असुरक्षित आदिवासी समुदायांसाठी लक्ष केंद्रित करून सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि  ऐतिहासिकदृष्ट्या विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्यात आल्या आहेत.

4.सुधारणांसाठी अढळ वचनबद्धता

राजकीय जोखीम पत्करूनही सुधारणा घडवून आणण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या इच्छाशक्तीवर  या ठरावात विशेष भर देण्यात आला आहे. जीएसटी, कल्याणकारी योजनांमधील सुधारणा आणि वसाहतकालीन कायदे बदलणे, यातून दीर्घकाळापासून चालत आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याचा त्यांचा दृढनिश्चय दिसून येतो. स्वच्छता, डिजिटल पेमेंट आणि स्थानिक उत्पादनांबाबतच्या त्यांच्या आवाहनांनी नागरिकांना बदलासाठी आकर्षित केले. सुधारणांप्रती अढळ वचनबद्धता, त्यांच्या नेतृत्वाचा अविभाज्य भाग राहिला आहे.  त्याला  दृढनिश्चय, लोकसहभाग आणि राष्ट्रीय उद्देश यांची जोड लाभल्याने बळकटी मिळाली आहे. 

5.आत्मनिर्भर भारताच्या पायाची उभारणी

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सार्वजनिक भांडवली खर्च 2 लाख कोटी रुपयांवरून 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. यासोबतच महामार्गांचा विस्तार आणि रेल्वेचे विद्युतीकरण झाले आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे मूल्यही सुमारे 2 लाख कोटी रुपयांवरून 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. याला समांतरपणेच देशात होत असलेल्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादन आणि सेमीकंडक्टर निर्मितीवरून देशाची गरजा भागवण्याची क्षमता अधिक मजबूत करण्याचा त्यांचा दृढनिश्चय दिसून येतो.

​6.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा विस्तार

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तंत्रज्ञानावरील विश्वास रोजच्या सेवांपासून ते विज्ञानाच्या क्षेत्रातील यशातून दिसून येतो. जनधन, आधार आणि मोबाईल अशा त्रिसूत्री जोडणीमुळे कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यात सुधारणा झाली, तर युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांचे स्वरूप बदलले. देशात कोविड लस विकसित करणे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान 3 उतरवणे अशा कामगिरींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन दिसून येतो. अंतराळ क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचा सहभाग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कामही याच संकल्पनेला पुढची दि़शा देणारे ठरले आहे. एकूणात तंत्रज्ञानामुळे जीवनमानात सुधारणा घडून आली आहे आणि त्याचवेळी राष्ट्रीय शक्यतांचा विस्तारही घडून येतो आहे.

​7.आव्हानात्मक काळातही खंबीर नेतृत्व

​जागतिक उलथापालथीच्या काळातही भारताला दिशा देण्याची पंतप्रधान मोदी यांची क्षमताही या ठरावातून अधोरेखित केली गेली आहे. कोविड साथरोगाच्या काळात त्यांनी देशाची एकजूट ठेवली, स्वदेशी लस निर्मितीला पाठबळ दिले आणि वेगाने लसीकरण शक्य केले. पश्चिम आशियातील संकटाच्या काळादरम्यान योग्य वेळेत घेतलेले निर्णय आणि ऊर्जा सुरक्षेसाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे भारताला या आव्हानाचा सामना करता आला. तातडीने दिलेला प्रतिसाद आणि गेल्या काही वर्षांत उभारलेली क्षमता यांमुळे आव्हानात्मक प्रसंगांमध्येही देशाला खंबीरता आणि आत्मविश्वास मिळाला.

​8.निर्णायक नेतृत्वामुळे शांतता आणि विश्वास

​2016 मधील सर्जिकल स्ट्राईक, 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राईक आणि 2025 मधील ऑपरेशन सिंदूर या मोहीमा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने रणनीतिक  आवाका दर्शवितात. या सोबतच कलम 370 हटवणे, एक पद एक निवृत्तीवेतन (वन रँक वन पेन्शन) लागू करणे तसेच, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती करणे या निर्णयांचाही या ठरावात समावेश आहे. नक्षलवादाविरोधातील कारवाई आणि ईशान्य भारतातील शांततेसाठी राबवलेल्या उपक्रमांमधून राष्ट्रीय निर्धार, विकास, स्थैर्य आणि जनतेचा विश्वास यांचा संगम साधणारे नेतृत्व ठळकपणे दिसून येते.

​9.जागतिक मंचावर भारताचा आवाज अधिक मजबूत

​जागतिक मतभेदाच्या काळातही  सहकार्य प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेमुळे जागतिक मंचावर भारताचे स्थान अधिक उंचावले आहे. जी20 आणि ब्रिक्स परिषदेतील सर्वसहमतीने घेतलेले निर्णय, ग्लोबल साउथ अंतर्गत येणाऱ्या देशांची मांडलेली बाजू आणि आफ्रिकन युनियनचा जी20 मध्ये केलेला समावेश यातून पंतप्रधानांचे राजनैतिक कौशल्य दिसून येते. लस मैत्री या उपक्रमामुळे भारताची क्षमता इतरांसाठीही कामी आली. 36 देशांकडून मिळालेल्या सन्मानातून पंतप्रधान मोदी आणि भारताचा वाढता प्रभाव तसेच परस्पर सामायिक उपाययोजनाच्या अनुषंगाने मिळालेल्या आंतरराष्ट्रीय आदराची प्रचिती येते.

​10.प्रगतीला वारसा आणि जबाबदारीतून मिळते बळ

​पंतप्रधान मोदींची  दूरदृष्टी विकास, सांस्कृतिक आत्मविश्वास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा मेळ साधते. हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी  गुजरातमधील समर्पित विभागापासून ते  नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यापर्यंत प्रगती झाली आहे. योग, भरडधान्ये, काशी विश्वनाथ धाम आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून भारताचे आपल्या वारशाशी असलेले नाते अधिक दृढ केले. 2047 पर्यंत समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्याच्या एकत्रित प्रयत्नांच्या त्यांच्या संकल्पाप्रती  पुन्हा एकदा प्रतिबद्धता  व्यक्त करत या ठरावाची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आशुतोष दीक्षित आता भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 31 ऑक्टोबरला स्वीकारणार पदभार

3,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव; ऑपरेशन सफेद सागर, रक्षक...

आकाशवाणी भवनात राहुल-प्रियांकांचा ठिय्या सुरूच; राहुल यांना हटवण्यासाठी पोहोचले पोलिस, कार्यकर्त्यांनी घेरले.

मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांना चकवा देत दोघे आवारात; EC म्हणते—भेटीसाठी...