नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्रावरच दस्तऐवज नोंदणीची डॉ. नीलम गोऱ्हे यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Date:

मुंबई : जुन्या नोंदणीकृत व अनोंदणीकृत कुलमुखत्यारपत्रांच्या आधारे राज्यात झालेले व्यवहार आणि त्याबाबत वारसांकडून निर्माण होणारे वाद यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेऊन सहानुभूतीपूर्वक नियमित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यासंदर्भात नागपूर येथील काही वृत्तपत्रांनी लक्ष वेधले होते, त्याची दखल घेत डॉ. गोऱ्हे यांनी महसूलमंत्र्यांकडे मागणी केली. नागपूरसह राज्यातील विविध भागांत जुन्या कुलमुखत्यारपत्रांद्वारे झालेले व्यवहार वारसांकडून अमान्य केले जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या प्रश्नावर शासनाने सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती

पुणे- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक –...

नवे शिक्षणमंत्रीही विचित्रच, जे बलात्काऱ्यांचे समर्थन करतात:अभिजित दीपकेंचा संताप, अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी

रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर लक्ष द्यावे छत्रपती...

जन्म-मृत्यू दाखले: कोणी बनवली समस्या ? महापालिकेच्या सभागृहात प्रशासनावर आरोप

पुणे, दि.२९ : शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास मोठ्या...

पुणे महापालिका : झाडणकामाच्या निविदेत कंत्राटदारासाठी मोठ्ठा गोंधळ

पुणे, दि २९ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व रस्ते...