भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती

Date:

पुणे- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय आणि विविध संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. २०२३-२०२६ या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडियात १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चिफ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अमोल कविटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी नव्या जबाबदारीत यशस्वी कार्य करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

“भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार !

  • अमोल कविटकर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे: बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे...

डिजिटल नकाशांतून जलसमृद्धीकडे…!!

५७,८५८ सूक्ष्म पाणलोट नकाशांनी घडवले महाराष्ट्रातील जलनियोजनाचे नवे पर्व प्रधानमंत्री...

नवे शिक्षणमंत्रीही विचित्रच, जे बलात्काऱ्यांचे समर्थन करतात:अभिजित दीपकेंचा संताप, अमित शहांच्या राजीनाम्याची केली मागणी

रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर लक्ष द्यावे छत्रपती...