महामार्गाच्या कामात वीजवाहिन्यांचे नुकसान; NHAI च्या कामावर महावितरणचा आक्षेप

Date:

वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान वारंवार केबलचे नुकसान; कंत्राटदाराविरोधात पोलिसांत तक्रार

पुणे, दि. १ नोव्हेंबर २०२६ : वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कामादरम्यान १६, १७ आणि ३१ ऑक्टोबर रोजी वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने महावितरणला आर्थिक फटक्याबरोबरच वीज ग्राहकांना नाहक अंधारात राहावे लागले आहे. वारंवार सूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप महावितरणने घेतला आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणासह सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्यांचे नियमानुसार स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने महावितरणकडून अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंजुरी घेतली आहे; मात्र, पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी अशी परवानगी घेतलेली नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वसूचना देऊनही काम सुरू ठेवल्याने वीजवाहिन्यांचे नुकसान होत असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांच्या रोषाला महावितरणला सामोरे जावे लागत आहे.

तीन वेळा केबलचे नुकसान

महामार्गाच्या कामादरम्यान १६ ऑक्टोबर रोजी २२ केव्ही बेव्हर्ली फिडरची केबल तोडण्यात आली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी बिटवाइज चौक परिसरात २२ केव्ही निया फिडरच्या केबलचे नुकसान झाले. ३१ ऑक्टोबर रोजीही केबल नादुरुस्त झाल्याची घटना घडली. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवताना महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. केबल दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, महावितरणच्या महसुलावरही परिणाम होत आहे.

लाखो ग्राहकांच्या वीजपुरवठ्याला धोका

या मार्गावरील २२ केव्ही उच्चदाब आणि लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे योग्य नियोजन न करता रस्त्याचे काम पूर्ण केल्यास भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील मोठ्या संख्येने वीजग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी वीजवाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक आहे.

काँक्रीटखाली गाडलेल्या केबलची दुरुस्ती कशी करणार?

रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजवाहिन्या रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध येण्याची किंवा काँक्रीटखाली गाडल्या जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत केबलमध्ये बिघाड झाल्यास दोष शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत कठीण होईल. त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदण्याची वेळ आल्यास दुरुस्तीला विलंब होऊन लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. महामार्गासारखी महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारताना वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊनच काम करावे, अशी महावितरणची भूमिका आहे.

महावितरणची पोलिसांत तक्रार

महावितरणच्या औंध उपविभागांतर्गत बाणेर शाखा कार्यालयाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी बावधन पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. पूर्वसूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप तक्रारीत नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान

तब्बल २ हजार ७०१ शाळांमधून ‘पिलर ऑफ व्हॅल्यूज’ या...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सक्रिय; राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना !

सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट यांच्या विभागांतर्गत महामंडळाच्या व्यवस्थापकीय...

दिवाळीच्या स्वच्छतेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; कसबा मतदारसंघात तब्बल २० टन घरगुती वस्तूंचे संकलन

आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसब्यात अनोखा उपक्रम; २...