Home Blog Page 1471

महिंद्राने सादर केली 9.99  लाख रुपयांपासून सुरू होणारी थारची नवीन श्रेणी

·         आता रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) तसेच फोर व्हील ड्राइव्ह (4WD) कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध

·         नवीन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) श्रेणीसह थार आता 9.99च्या नवीन प्रारंभिक किंमतीसह व्यापक प्रमाणावरील ग्राहकांसाठी उपलब्ध

·         RWD प्रकारांच्या स्वागतमूल्य किमती पहिल्या 10,000 बुकिंगवर लागू

·         फोर व्हील ड्राइव्ह श्रेणी आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह सुसज्ज

·         ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट अशा दोन नवीन रोमांचक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध

·         RWD प्रकारांची डिलिव्हरी १४ जानेवारी २०२३ पासून होणार सुरू

मुंबई, 09 जानेवारी २०२३: भारतातील एसयूव्ही विभागाचे प्रणेते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज थारची सर्वात नवीन श्रेणी सादर केली. या नव्या श्रेणीमध्ये रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकार दोन इंजिन पर्यायांमध्ये आणि फोर व्हील ड्राइव्ह (4WD) प्रकार वर्धित क्षमतांमध्ये समाविष्ट आहे. RWD श्रेणीचे डिझेल प्रकार मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३००  Nm टॉर्क (८७.२ kW@३५०० rpm) निर्माण करणारे सर्व-नवीन D११७ CRDe इंजिनद्वारे समर्थित आहेत. RWD श्रेणीच्या गॅसोलीन प्रकाराला शक्ती देणारे mStallion १५० TGDi इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशनसह १५० बीएचपी आणि ३२० Nm टॉर्क (११२ kW@५००० rpm) निर्माण करते.

नवीन थार श्रेणी ₹ 9.99 लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीपासून सुरू होत असून एसयूव्ही  खरेदीदारांच्या व्यापक ग्राहक वर्गासाठी आणि ज्यांना नेहमीच ही प्रतिष्ठित एसयूव्हीची मालकी मिळविण्याची आकांक्षा आहे त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहे. ‘एक्सप्लोर द इम्पॉसिबल’ या वचनाचे उदाहरण देत थार एक अत्यंत अनोखा ड्रायव्हिंग आणि स्वतःची मालकी असलेल्या गाडीचा अनुभव देते.

4WD प्रकार आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह येतो जो अधिक आक्रमक आहे. बॉशच्या सहकार्याने विकसित केलेले असून ऑफ-रोड उत्साही लोकांना कमी ट्रॅक्शन  परिस्थिती अधिक सहजतेने हाताळण्यास अनुमती देईल. जे अजूनही मेकॅनिकल लॉकिंग डिफरेंशियल (एमएलडी) पसंत करतात त्यांच्यासाठी हे LX  डिझेल 4WD प्रकारांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल. 4WD पॉवरट्रेन लाइन-अप अपरिवर्तित आहे. हे 2.0L mStallion 150 TGDi पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असून १५० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते आणि 2.2L mHawk १३० डिझेल इंजिन १३० बीएचपी पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते. ही इंजिने ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह सादर केली जातात.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, “महिंद्रा थार ही केवळ एक सक्षम एसयूव्ही आहे असे नाही तर ती एक भावना आहे. २०२० पासून कोऱ्या करकरीत नवीन थारने एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून दररोज ८०,००० हून अधिक चाहते अशक्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची ऑफर आणखी चांगली करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांचे म्हणणे ऐकले आणि महत्त्वाच्या सुधारणांसह थारची नवीन श्रेणी तयार केली. नवीन RWD प्रकार सादर करून ज्यांना ‘थार लाईफ’ अनुभवायचे होते त्यांच्यासाठी आम्ही ते अधिक सुलभ केले आहे, तर 4WD प्रकारातील आमची जोड खऱ्या ऑफ-रोडर्सना खूश करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. आम्हाला खात्री आहे की थारची नवीन श्रेणी अशक्य गोष्टींचा शोध घेईल आणि थारच्या जीवनशैलीत नवीन उत्साही लोकांची भर घालेल.”

नवीन थार श्रेणी वैयक्तिकरण भागाला पुढील स्तरावर घेऊन जाते. ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट असे दोन रोमांचक नवीन रंग पर्याय आता ग्राहकांना निवडण्यासाठी उपलब्ध आहेत. बाह्य आणि अंतर्गत स्टाइलिंग पर्याय समाविष्ट असलेले नवीन अॅक्सेसरी पॅक चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सादर केले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, अॅक्सेसरीज म्हणून फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट्स सादर केल्या जात आहेत. आर्मरेस्ट अंगभूत स्टोरेजसह येतात. तसेच, मागील आर्मरेस्ट अधिक आराम आणि सोयीसाठी कप-होल्डर आणि यूएसबी  चार्जिंग पोर्टसह सुसज्ज असतील. RWD श्रेणी फक्त हार्ड टॉप पर्यायासह सादर केली जाईल.

नवीन थार श्रेणीबद्दल

·         नवीन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकार

डिझेल: मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३००  Nm टॉर्क निर्माण करणारे नवीन D११७ CRDe इंजिन

·         गॅसोलीन: mStallion १५०TGDI इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशन सह १५० बीएचपी आणि ३२० Nm तयार करते

• प्रगत ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह विद्यमान 4WD प्रकारांची वर्धित क्षमता

·         आव्हानात्मक भूभागावर सहजतेने चालवता येण्यासाठी 4WD श्रेणी आता प्रगत इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसह येते.

• दोन नवीन रोमांचक रंग

·         ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट

·         नवीन अॅक्सेसरी पॅक

·         थारचे एक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आहे परंतु आता बेस्पोक अॅक्सेसरीजची नवीन श्रेणी सह ते संपूर्णपणे वैयक्तिकृत केले जाऊ शकते

·         चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बाह्य आणि अंतर्गत शैली पॅक

·         आरामशीर ड्राईव्ह मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी फ्रंट आणि रियर आर्मरेस्ट्स स्टोरेजसह येतात. अधिक आराम आणि सोयीसाठी मागील आर्मरेस्ट कप-होल्डर आणि यूएसबी चार्जिंग पोर्टसह सुसज्ज असतील.

किंमत तपशील (एक्स शोरूम) खालीलप्रमाणे

AX (O) RWD – Diesel MT – Hard TopINR 9.99 Lakh
LX RWD – Diesel MT – Hard TopINR 10.99 Lakh
LX RWD – Petrol AT – Hard TopINR 13.49 Lakh

*स्वागतमूल्य किमती पहिल्या 10,000  बुकिंगवर लागू

ऑल न्यू थार बद्दल

अविस्मरणीय स्थान, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, नेहमीचा आरामदायी अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांसह चित्तथरारक कामगिरी यांसह २०२० मध्ये सादर केलेले स्वतःचे एक श्रेणी निर्माते थारने ग्राहकांना आणि उत्साहींना आकर्षित केले आहे

·         अविस्मरणीय स्थान: आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन असलेली ऑल-न्यू थार विशालता आणि वैशिष्ट्यपूर्णता यांनी जिथे जाते तिथे वेगळी उठून दिसते.

·         आरामशीरपणे संस्मरणीय सहली करा: प्रत्येक सहलीला आरामदायी आणि मजेदार बनवण्यासाठी अत्याधुनिक नवीन इंटीरियरमध्ये सर्वकाही आहे. स्पोर्टी फ्रंट सीट्स, रिक्लाइनिंग रिअर सीट्स, रूफ-माउंट स्पीकर यांनी सुसज्ज आहे.

·         नवीन तंत्रज्ञानासह रेट्रो कूल: ऑल-न्यू थार तंत्रज्ञानाने भरलेले आहे जे ग्राहकांना त्यांच्या थार, मित्र आणि बाहेरील लोकांशी जोडलेले ठेवते. यात प्रतिसादात्मक टचस्क्रीन, टायरेट्रॉनिक्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.

·         उत्कृष्ट सुरक्षितता: ईएसपी, रोल केज, एबीएस आणि एअरबॅग्जसह ग्लोबल NCAP द्वारे प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये ४ स्टार मानांकन असून थार अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशात इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांनी ‘सुरक्षित जावे, प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी  केले आणि “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव – परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले.

परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करून घेऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने राबवलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. “परदेशातील भारतीय समुदाय: भारताच्या अमृत काळातील प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे. 

उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की चार वर्षांच्या अंतरायानंतर संपूर्ण दिमाखात हा प्रवासी भारतीय दिवस साजरा होत आहे. या संमेलनातील व्यक्तिगत संवादाचे महत्त्व आणि त्यातील आनंद यांच्यावर त्यांनी भर दिला. या समारंभाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचे 130 कोटी भारतीयांतर्फे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की हा कार्यक्रम भारताचे हृदयस्थान समजल्या जाणाऱ्या आणि नर्मदेचे पवित्र जल, हिरवागार निसर्ग , आदिवासी संस्कृती आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेश राज्यात होत आहे. नुकतेच राष्ट्रार्पण करण्यात आलेल्या ‘महा काल महा लोक’ या स्थळाचा उल्लेख करून या कार्यक्रमासाठी जमलेल्या मान्यवरांनी आणि प्रतिनिधींनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे यजमान शहर असलेल्या इंदोरबद्दल बोलताना ते म्हणाले की हे केवळ शहर नसून तो  एक टप्पा  देखील आहे. “असा टप्पा जो  स्वतःच्या वारशाचे जतन करतानाच काळाच्या पुढे वाटचाल करतो.” पंतप्रधानांनी या शहराची सुप्रसिद्ध खाद्य संस्कृती तसेच स्वच्छता अभियानात मिळविलेल्या यशाचा देखील उल्लेख केला.

भारताने देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे नुकतीच पूर्ण केली असल्याने हा प्रवासी भारतीय दिवस अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताच्या वैभवशाली युगाचे पुन्हा एकदा दर्शन घडेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारताच्या आगामी 25 वर्षांच्या अमृतकाळातील वाटचालीमध्ये प्रवासी भारतीयांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत ते म्हणाले की भारताची वैशिष्ट्यपूर्ण जागतिक दृष्टी आणि जागतिक व्यवस्थेतील त्याची भूमिका यांना प्रवासी भारतीयांमुळे आणखी मजबुती मिळेल.

संपूर्ण विश्वाला स्वतःच्या देशाप्रमाणेच मान देण्याच्या आणि संपूर्ण मानव जातीला आपल्या बंधू-भगिनी मानण्याच्या भारतीय तत्वज्ञानाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की आपल्या पूर्वजांनी भारताच्या सांस्कृतिक विस्ताराचा पाया घातला. आजच्या जगाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय जगाच्या सर्व भागांमध्ये पोहोचले असून विविध संस्कृती आणि परंपरा यांच्यासह ते नांदत आहेत आणि तरीही व्यापारी भागीदारीच्या माध्यमातून समृद्धीची कवाडे खुली करण्याचे मार्ग शोधून काढत आहेत. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आम्ही जगाच्या नकाशावर विविध देशांत स्थायिक करोडो परदेशी भारतीयांकडे पाहतो तेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या कल्पनेचे चित्र साकार करणाऱ्या अगणित प्रतिमा एकाचवेळी उदय पावलेल्या दिसतात आणि जेव्हा कोणत्याही परदेशी भूमीवर दोन प्रवासी भारतीय एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ही भावना व्यक्त होताना दिसते. “जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक प्रवासी भारतीय सर्वात लोकशाहीवादी, शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध नागरिक आहेत अशी चर्चा जेव्हा ऐकायला येते तेव्हा आपला देश लोकशाहीची जननी असल्याची अभिमानाची भावना अनेक पटींनी वाढते,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा हे विश्व प्रवासी भारतीयांच्या योगदानाविषयी चर्चा करते तेव्हा प्रत्येक प्रवासी भारतीय हा भारताचा राष्ट्रीय राजदूत असून ते सर्वजण सामर्थ्यवान आणि सक्षम भारताचा प्रतिध्वनी आहेत. “तुम्ही भारताच्या वारशाचे, मेक इन इंडिया अभियानाचे, योग आणि आयुर्वेद शास्त्राचे, भारताच्या कुटिरोद्योगांचे आणि हस्तकलांचे राष्ट्रदूत म्हणजेच राष्ट्रीय राजदूत आहात,” ते म्हणाले, “आणि त्याच बरोबर, तुम्ही भारतातील भरड धान्यांचे सदिच्छा दूत सुद्धा आहात.” वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर झाले आहे याकडे निदेश करून पंतप्रधानांनी प्रत्येकाला घरी जाताना भरड धान्यांपासून तयार केलेली उत्पादने घेऊन जाण्याची विनंती केली.

जगाची भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा पूर्ण करण्यात प्रवासी भारतीयांची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. जग भारताकडे उत्सुकतेने पाहत आहे असे पंतप्रधान म्हणाले. अलिकडच्या वर्षांत देशाने केलेल्या असामान्य कामगिरीवर पंतप्रधानानी प्रकाश टाकला. यासंदर्भात पंतप्रधानांनी मेक इन इंडिया लसीचे उदाहरण दिले आणि भारतीयांना दिलेल्या 220 कोटींहून अधिक मोफत विक्रमी लसमात्रांची आकडेवारी सांगितली. सध्याच्या अस्थिरतेच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा उदय आणि जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील वाढती स्टार्टअप परिसंस्था आणि मेक इन इंडियाची उदाहरणेही पंतप्रधानांनी दिली. त्यांनी तेजस लढाऊ विमाने, विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आणि आण्विक पाणबुडी अरिहंत यांवर प्रकाश टाकत या कामगिरीमुळेच जगभरातील लोकांना भारताबद्दल उत्सुकता असणे स्वाभाविक असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी भारताच्या कॅशलेस इकॉनॉमी आणि फिनटेकचाही उल्लेख केला. जगातील 40% डिजिटल व्यवहार भारतात केले जातात, असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी शेकडो उपग्रह प्रक्षेपित करण्याचे अनेक विक्रम करत आहे, असे पंतप्रधानांनी अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल बोलताना सांगितले. त्यांनी भारतातील सॉफ्टवेअर आणि डिजिटल तंत्रज्ञान उद्योगावरही प्रकाश टाकला. या क्षेत्रांची क्षमता काळाबरोबर वाढत आहे, असे ते म्हणाले. “भारताच्या संदेशाचे आगळे महत्त्व आहे”, म्हणूनच भविष्यात देशाचे सामर्थ्य कायम वर्धित होत राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित प्रत्येकाने भारताच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलच नव्हे तर देशाच्या प्रगतीबद्दलचे ज्ञान समृद्ध करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारत या वर्षी G-20 अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहे आणि शाश्वत भविष्यासाठी भारताच्या भूतकाळातील अनुभवांची जगाला जाणीव करून देण्याची तसेच या अनुभवांमधून शिकण्यासाठी उत्तम संधी या जबाबदारीसोबत आली आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “G-20 हा केवळ राजनैतिक कार्यक्रम नसून जिथे ‘अतिथी देवो भव’ या भावनेचे दर्शन घडवणारा असा लोकसहभागाचा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरावा” असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचा भाग म्हणून 200 हून अधिक बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक देशांच्या प्रतिनिधींशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

आज भारताला केवळ ज्ञान केंद्रच नाही तर जगाची कौशल्य राजधानी बनण्याची संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारतीय तरुणांचे कौशल्य, मूल्ये आणि कार्य नैतिकता अधोरेखित केली. “ही  कौशल्य राजधानी  जागतिक विकासाचे इंजिन बनू शकते”, असे पंतप्रधान म्हणाले. पुढच्या पिढीतील प्रवासी भारतीय तरुणांमधील उत्साहाची पंतप्रधानांनी दखल घेतली. उपस्थितांनी या प्रवासी भारतीय तरुणांना त्यांच्या देशाबद्दल सांगावे आणि आपल्या देशाला भेट देण्याची संधी द्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “पारंपरिक जाण आणि आधुनिक दृष्टिकोनामुळे हे तरुण प्रवासी जगाला भारताबद्दल अधिक प्रभावीपणे सांगू शकतील. तरुणांमध्ये भारताविषयीची उत्सुकता वाढल्याने पर्यटन, संशोधन आणि भारताचे वैभव वाढेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उत्साही तरुण सणांच्या काळात भारताला भेट देऊ शकतात किंवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. 

विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या माध्यमातून प्रवासी भारतीयांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि आपापल्या देशांसाठी दिलेले योगदान यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला हवा, असे पंतप्रधानांनी सुचवले. प्रत्येक भारतवंशी संपूर्ण भारत आपल्यासोबत घेऊन जातो, असे पंतप्रधान म्हणाले. “गेल्या 8 वर्षांत भारताने आपला प्रवासी भारतीय समुदाय मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जिथेही असाल तिथे  देश तुमच्या आवडी आणि अपेक्षांसाठी उपस्थित असेल ही भारताची वचनबद्धता आहे,” असे ते म्हणाले.

विशेष अतिथी, रिपब्लिक ऑफ गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली आणि सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष एच.ई. श्री चंद्रिकापरसाद संतोखी यांनी केलेल्या भाष्य  आणि सूचनांसाठी पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी विशेष सन्माननीय निमंत्रित असलेले गयाना सहकारी प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली,  सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, व्ही मुरलीधरन आणि डॉ. राजकुमार रंजन सिंह उपस्थित होते.

पार्श्वभूमी

प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) संमेलन  हा भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संवादात सहभागी करण्यासाठी तसेच विविध देशांतील भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधता येणे शक्य करून देण्यासाठी या उपक्रमाने महत्त्वाचा मंच उपलब्ध करून दिला आहे. मध्य प्रदेश राज्य सरकारच्या भागीदारीसह केंद्र सरकारने 08 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन केले आहे. “भारतीय समुदाय: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे  विश्वासार्ह भागीदार” ही या वर्षीच्या पीबीडी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशांतील भारतीय समुदायांच्या साडेतीन हजारांहून अधिक सदस्यांनी या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनातील सहभागासाठी नोंदणी केली आहे. 

या अधिवेशनात नागरिकांच्या सुरक्षित,कायदेशीर,शिस्तबद्ध आणि कुशल स्थलांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘सुरक्षित जावे,प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव-परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील झाले.

पीबीडी अधिवेशनात पाच संकल्पनाधारित पूर्ण सत्रे होतील:

  • परदेशी भारतीय समुदायांतील युवकांची अभिनव संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील भूमिका’ या पहिल्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर भूषवणार आहेत.
  • दुसऱ्या पूर्ण सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय अध्यक्ष म्हणून तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग सहअध्यक्ष म्हणून ‘अमृत काळात भारतीय आरोग्य सेवा परीसंस्थेला चालना देण्यात भारतीय समुदायांची भूमिका: व्हिजन@2047’ या विषयावरील चर्चासत्र घेतील.
  • ‘भारतातील सुप्त सामर्थ्याला चालना- हस्तकला,पाककला आणि सर्जकता यांच्या माध्यमातून सदिच्छा निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी भूषवतील.
  • ‘भारतीय कार्यबळाची जागतिक गतिशीलता सक्षम करताना- भारतीय समुदायाची भूमिका’ या चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील.
  • ‘राष्ट्र उभारणीसाठी समावेशक दृष्टीकोनाप्रती भारतीय समुदायातील उद्योजकांच्या सामर्थ्याचा वापर’ या पाचव्या चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भूषवणार आहेत.
  • या  सर्व चर्चासत्रांमध्ये भारतीय समुदायांतील सन्मानीय निमंत्रितांच्या गटांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल. 

या 17 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोविड-19 महामारीची सुरवात झाल्यापासून चार वर्षांच्या काळानंतर प्रथमच प्रत्यक्ष पद्धतीने या अधिवेशनाचे आयोजन होत आहे. 2021 मध्ये कोविड काळात आभासी पद्धतीने याधीचे अधिवेशन भरवण्यात आले होते.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि.९: स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या क्रमवारीत पुणे शहराचा क्रमांक उंचावत देशात पहिल्या पाच शहरात समाविष्ट होण्याच्यादृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छ्ताविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित स्वच्छ तंत्रज्ञान चॅलेंज आणि स्वच्छ पुरस्कार २०२३ च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका स्वच्छता उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. सलील कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून देशात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी, स्वच्छतेबाबत महत्व पटवून देण्यासाठी विविध शहरात स्पर्धा, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून आपला परिसर, शहर, वसाहत, जिल्हा, राज्य व देश स्वच्छ होण्यास मदत होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहर देशात ९ व्या क्रमांकावर असून आपली क्रमवारी उंचावण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, पुणे शहराला चांगल्या उपक्रमात पुढाकार घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कचरा निर्मूलन तसेच व्यवस्थापनातही चांगले काम केले जात आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करुन जीवनाश्यक वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खत आणि गॅस निर्मितीबरोबरच वीज निर्मिती करण्यात येत आहे. कचरा आज एक प्रकारची मालमत्ता बनली आहे. रोजगाराचे साधन बनले आहे. कचरा निमिर्तीपासून ते कचरा निर्मूलन पर्यंतचा प्रवास विचारात घेता पुणे महानगरपालिका अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर कार्य करीत आहे. या स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. पाटील यांनी नागरिकांना केले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहरात नवीन हद्दवाढीमुळे सुमारे ६२ लाख लोकसंख्या असून शहरात दररोज सुमारे २ हजार २०० टन कचरा निर्माण होतो. महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी काम करीत आहे. पुणे महानगरपालिका कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याचे काम करते. या सर्व कार्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल आदीनी त्यांच्यास्तरावर कचरा निर्मूलन करण्याची प्रक्रिया करावी.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी पुणे महानगर पालिका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या घरात, परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले.

श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे कार्यक्रम ; प्रसिद्ध देवस्थानांच्या छायाचित्रांचा समावेश
पुणे : श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे संस्थेच्या दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन नुकतेच झाले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक विश्वकर्मा, सचिव रामअवध विश्वकर्मा, खजिनदार रामजनम विश्वकर्मा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराम शर्मा, उपाध्यक्ष नेमचंद विश्वकर्मा, प्रचारप्रमुख नरेंद्र शर्मा, संघटक सुनिल परदेशी, छोटेलाल विश्वकर्मा यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक विश्वकर्मा म्हणाले, प्रतिष्ठानची स्थापना सन २०११ साली झाली. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. दिनदर्शिका प्रकाशन हा देखील एक त्यातील कार्यक्रम असतो. यंदाच्या दिनदर्शिकेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातील दत्तमहाराज आणि श्री महालक्ष्मी देवी यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत.

वंचितांच्या कला-कौशल्याचे मोहक सादरीकरण

‘आश्रय इनिशिएटिव्ह फॉर चिल्ड्रन’ संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन, प्रदर्शन उत्साहात

पुणे : रंगतदार, चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण कला-कौशल्यांचे मोहक सादरीकरण करत वंचित घटकातील मुलामुलींनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते, कोरेगाव पार्क येथील डॉन बॉस्को युवा केंद्रात आयोजित ‘आश्रय इनिशिएटिव्ह फॉर चिल्ड्रन’ संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व प्रदर्शनाचे! वाघरी, महार, मातंग, पारधी, सिकलगार आदी भटक्या, विमुक्त जमाती व दुर्लक्षित समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या ‘आश्रय’ संस्थेचे संमेलन उत्साहात झाले.

पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मंगेश गोळे, विनोद पवार, ‘आश्रय’चे संचालक व टाटा कम्युनिकेशनच्या सीएसआर विभागाचे माजी प्रमुख संजीव तारे यांच्यासह बजाज फिनसर्व, झेडएस असोसिएट्स, टॉमटॉम, रोटरी क्लबच्या सीएसआर विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या केलेचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थी व समाजातील सदस्यांनी बनवलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद उपस्थितांनी घेतला.

एक आदर्श शाळा, व्यावसायिक संस्था व समुदायातील सदस्यांची एकी यातून आशादायी व सर्वसमावेशक भावभावनांचे दर्शन या कार्यक्रमात घडले.  सर्व मुले व समुदायातील सदस्यांच्या सहभागातून कार्यक्रमाची आखणी, नियोजन, सादरीकरण झाले. ५५० मुलेमुली व समुदायातील ६०० पेक्षा अधिक लोक यामध्ये सहभागी झाले. सुरुवातीला, व्यावसायिक शिक्षण उपक्रमांतील विद्यार्थ्यांचे स्टॉल, सादरीकरण झाले. त्यामध्ये विद्यार्थी आणि समाजातील सदस्यांनी तयार केलेले कपडे, पिशव्या, दागिने, पेंटिंग्ज, साबण, बुक-मार्क्स, कानातले दागिने, मेणबत्त्या आणि इतर कला प्रकारांचा समावेश होता. ब्युटीशियन-कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी टॅटू मेकिंग, मेहंदी, नेल आर्ट केले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “शिक्षण, आरोग्य, कौशल्य व सामाजिक विकास यातून या दुर्लक्षित घटकांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय ‘आश्रय’ संस्थेचे आहे. वर्षभर विविध उपक्रमांतून चालणाऱ्या कार्याचे दर्शन घडविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. शैक्षणिक, आरोग्य, मानसिक आरोग्य आधार व शाश्वत समाज विकास टीमने अतिशय रंजकपणे आपल्या कार्याचे सादरीकरण केले. ‘आश्रय’च्या प्रत्येक लाभार्थ्यांचा सहभाग असलेला हा रंगतदार, चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम होता.”

‘हमारी शाला’ हा वंचित घटकांतील मुलांसाठी सर्वात वेगळा असा शालेय कार्यक्रम आहे. यामध्ये प्रकल्पाधारित व प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा व कवितांच्या पुस्तकाचे सादरीकरण झाले. सामुदायिक प्रकल्प प्रदर्शित करत त्यातून समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षणाचा कसा उपयोग होईल, हे दाखवून दिले. स्वसंरक्षण वर्ग, संगीत वर्ग, नृत्य वर्ग आणि मूल्य शिक्षण वर्गातील मुलांनी प्रात्यक्षिके सादर केली. शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व सांगणारे सादरीकरण झाले.

‘सिंधी प्रीमियर लीग’ रंगणार २ फेब्रुवारीपासून

सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; चौथ्या हंगामात १६ संघ खेळणार
पुणे : देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्ती विषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा २ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. यंदाच्या चौथ्या हंगामात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.

पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार, त्याचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो. यंदा या निधीतून एएनपी केअर फाउंडेशनला डायलेसिस मशीन भेट देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वानी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.हितेश दादलानी म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ४’चे उद्घाटन २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. एक दिवस जगभरातील सर्व सिंधी समुदायांना आपापल्या शहरांमध्येही अशी स्पर्धा आयोजित करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”
कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या तिन्ही मोसमात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास ११ लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. १६ संघमालक आपल्या १६ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”
या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंद्रमणि, चंद्रमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमतानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (क्रिश लाडकानी, विजयराज असोसिएट्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा), जय बाबा स्ट्रायकर्स (सागर सुखवानी, सुखवानी असोसिएट्स), सिंधी इंडियन्स (मनीष मनसुखवानी, मनसुखवानी असोसिएट्स), अजराक सुपरजायंट्स (हितेश दादलानी, लाइफक्राफ्ट रियल्टी) व पिंपरी योद्धाज (कुणाल लखानी, सोहम मोबाईल) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत १६ संघ असून २४३ खेळाडूची नोंदणी झालेली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून २५ लाख आभासी (व्हर्च्युअल) चलनातून या खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. 

सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), एसएम ग्रुप (सागर मुलचंदानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), तेजवानी हॅण्डलूम्स अँड फर्निसिंग्स (अवि तेजवानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), कोमल असोसिएट्स (बग्गी मंगतानी), लीगसी ग्रुप (नरेश वासवानी), बालाजी होम्स (आशुतोष चान्दिरमणी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), जीएस असोसिएट्स (जितू पहलानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), रजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा), देवी काँक्रीट प्रोडक्ट (जितेश वनवारी), सिटी कार्स (रॉकी सेवानी), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), जय मोबाईल (गोपी आसवानी) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत परिषदेचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश

पुणे, दि. ९: ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्‌यू मेरियट येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

‘जी -२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे अशा शब्दात प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणूकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

‘जी -२०’ बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महाननगरपालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौंदर्यीकरण कामांची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात करण्यात आलेल्या विविध शहर सौंदर्यीकरण कामांची तसेच विकास कामांची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. विभागीय आयुक्त श्री. राव, मनपा आयुक्त श्री. कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. खेमनार, विकास ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विमानतळ येथे या पाहणीला प्रारंभ झाला. विमानतळ येथून ‘जी -२०’ परिषदेचे प्रतिनिधी जे. डब्ल्यू मेरियट हॉटेल या बैठक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाची संपूर्ण पाहणी यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. पुणे विमानतळ येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

विमानतळापासूनच्या प्रतिनिधींच्या प्रवासमार्गावरील विमानतळ, येरवडा कारागृहाची सीमाभिंत, पुणे रेल्वे स्थानक तसेच अन्य शासकीय संस्था, खासगी इमारतींच्या सीमाभिंतीवर करण्यात आलेली कलात्मक रंगरंगोटी, रंगवण्यात आलेली चित्रे, पुणेरी पाट्या, पुण्याची वैशिष्ट्ये असलेल्या संकल्पनाधिष्ठीत रंगकामाची व सुशोभिकरणाची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. झालेल्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणांचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

एल अँड टी च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने बरीच महत्त्वाची कंत्राटे मिळविली

मुंबई, जानेवारी ०९, २०२३: लार्सन अँड टुब्रो च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाही मध्ये महत्त्वाचे असे एकाहून अधिक कंत्राट मिळविले आहेत.

     एल अँड टी च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने परदेशी बाजारपेठेत मेक्सिको मधील एका रिफायनरीच्या सर्वात वजनदार अणूभट्टयांपैकी एकासाठी स्क्रू प्लग हीट एक्सचेंजर्स साठी कंत्राट मिळविले आहे. हे कंत्राट लार्सन अँड टुब्रोच्या जड अभियांत्रिकी व्यवसायाची वचनबद्धता आणि विश्वासार्हता यावर ग्राहकांचा असलेला विश्वास दर्शविते. त्यांनी यू एस् ए आणि उझ्बेकिस्तान मधील ब्ल्यू अमोनिया प्रकल्पांसाठी महत्त्वाच्या व जटिल अणूभट्टया आणि जहाजे पुरविण्यासाठी देखील कंत्राट मिळविले आहे. याशिवाय यूरोपियन ग्राहकांकडून प्रक्रिया प्लांट उपकरणांसाठी धोरणात्मक ऑर्डर सुद्धा मिळविली आहे. ही सर्व कंत्राटे विश्वसनीय कामगिरीच्या बळावर तीव्र आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या विरुद्ध एल अँड टी ने जिंकल्या आहेत.

     देशांतर्गत आघाडीवर, एल अँड टी च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने आयओसीएल (IOCL) च्या पानिपत रिफायनरी P२५ विस्तार प्रकल्पासाठी जटिल Mo-V स्टील सामुग्री सह महत्वाच्या जटिल अवशेष अद्ययावत अणूभट्टया (क्रिटिकल रेसिडयू अपग्रॅडिंग रिअॅक्टर्स) तयार करण्यासाठी आणि उच्च दाब स्क्रू प्लग हीट एक्सचेंजर्स ची रचना आणि निर्मिती करण्यासाठी कंत्राट मिळविले आहे. उच्च तंत्रज्ञान उपकरणांच्या निर्मितीसाठीचे हे आदेश भारत सरकारच्या ‘ ‘मेक इन् इंडिया’/ ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांमध्ये एल अँड टी सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे हेच दर्शविते.

याशिवाय, एल अँड टी जा अभियांत्रिकी च्या मॉडिफिकेशन, रिव्हॅम्प आणि अपग्रेड (MRU) व्यवसाय विभागाला इ पी सी आधारावर (इंजीनीरिंग, प्रॉक्यूरमेंट आणि कन्स्ट्रकशन) रेआ प्लांट (rea plant) मध्ये सुधारणा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या सुधारणेचे उद्दिष्ट एका ५० वर्षाहून अधिक जुन्या प्लांट ची विश्वासार्हता, सुरक्षितता आणि क्षमता वाढविणे आणि भारत सरकारच्या निर्धारित मानदंडांची पूर्तता करण्यासाठी त्याची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे हे आहे.

     या व्यतिरिक्त, एक नामांकित खत उत्पादकाकडून एल अँड टी जा अभियांत्रिकी व्यवसायाने स्टीम सुपर हीटर कॉईलस् बनवून ते बसविण्याचे कंत्राट देखील मिळविले आहे.

धर्मादाय कार्यालयात केलेली आॅनलाईन सक्ती रद्द करा

पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनतर्फे आंदोलन ; लाल फिती लावून निषेध
पुणे : धर्मादाय कार्यालयात केलेल्या आॅनलाईन सक्तीचा निषेध असो…आॅनलाईन सक्ती रद्द करा…बदल अर्ज घेतलेच पाहिजेत… आॅफलाईन फाईल देखील घेतल्या पाहिजेत… अशा घोषणा देत धर्मादाय कार्यालयात करण्यात आलेल्या आॅनलाईन प्रक्रियेचा निषेध केला. तसेच ही सक्ती रद्द करुन आॅफलाईन फाईल देखील घेतल्या पाहिजेत, अशी मागणी करीत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत लाल फीत लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्धार वकिलांनी केला आहे. 
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनतर्फे ढोले-पाटील रस्त्यावरील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस, सचिव अ‍ॅड. सुनिल मोरे, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त अ‍ॅड.  रंगनाथ ताठे, अ‍ॅड.  सतिश पिंगळे, अ‍ॅड. मुकेश परदेशी, अ‍ॅड.  हेमंत फाटे, अ‍ॅड.  राजेश ठाकूर, अ‍ॅड.  दिगंबर देशमुख, अ‍ॅड. गायत्री पंडित आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, आॅनलाईन प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया ही माहिती व तंत्रज्ञान कायदा, २००० या केंद्रीय कायद्यातील तरतूदींद्वारे नियमित होतो. या कायद्यातील तरतूदींनुसार सदरहू प्रकरणे दाखल करणा-या व्यक्तीची अधिकृतता ‘डिजिटल सिग्नेचर’ द्वारे सिद्ध होत असते. आॅनलाईन सक्ती करण्यापूर्वी अशी कोणतीही मानक प्रणाली धमार्दाय आयुक्तालयामार्फत जारी करण्यात आली नाही. त्यामुळे बनावट प्रकरणे दाखल होण्याचा धोका खूप मोठा आहे. हे टाळण्यासाठी ज्याप्रमाणे आयकर विवरणपत्र दाखल करताना सनदी लेखापालाची ‘डिजिटल सिग्नेचर’ अनिवार्य असते तसे धमार्दाय कार्यालयात आॅनलाईन प्रणाली अनिवार्य करताना तेथील वकिलांची ‘डिजिटल सिग्नेचर’ प्रकरणावर असावी. 
ज्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये कार्यरत वकिलांना ‘अ‍ॅडव्होकेट कोड’ दिला जातो व त्याचा अनिवार्य नोंद तेथील वकिलांना कोणतीही प्रकरणे दाखल करताना वापरावा लागतो त्याच धर्तीवर धमार्दाय कार्यालयात  आॅनलाईन प्रणाली अनिवार्य करण्यापूर्वी तेथील कार्यरत वकीलांनाही ‘अ‍ॅडव्होकेट कोड’ देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. 
काही अपवाद वगळता, राज्यातील धमार्दाय आस्थापनांच्या कार्यालयांमध्ये पूर्णत: आॅनलाईन प्रक्रिया राबवून सेवा देण्यास सक्षम नाहीत. मूलत: मुंबई येथील मुख्य कार्यालयाचा ‘सर्व्हर’ अतिशय कमी क्षमतेचा असल्याने प्रकरणे  आॅनलाईन  पद्धतीन अपलोड होतच नाहीत. सर्व विभागीय कार्यालये व जिल्ह्यांमधील न्यास नोंदणी कार्यालयांमध्ये आॅनलाईन सुनावणीसाठी पुरेशा तांत्रिक सोई नाहीत. ही प्रक्रिया सुरळीतपणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. अजूनही राज्यातील काही अपवाद वगळता सह, उप व सहाय्यक धमार्दाय आयुक्तांनी केलेले आदेश संकेतस्थळावर अपलोड केले जात नसल्याने ते आॅनलाईन पद्धतीने मिळू शकत नाहीत. किमान राज्यातील सर्व धमार्दाय कार्यालयातील सुनवणी साठी नेमलेल्या प्रकरणांची दैनंदिन कार्यतालिकासुद्धा संकेतस्थळावर अपलोड केली जात नसल्याने ती आॅनलाईन पद्धतीने पाहता येत नाही. अशा प्रकारे धमार्दाय आस्थापनेच्या संगणकीय विभागामध्येच अंतर्गत त्रुटी आहेत त्या सुधारल्याशिवाय आॅनलाईन सक्ती करणे निष्फळ आहे. 
राज्यातील अनेक भागात वर्षभर सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा होत नाही. इंटरनेट सेवा व वाय फाय सुविधादेखील दुर्गम भागात उपलब्ध नसते. अशा भागांमध्ये अनिवार्य आॅनलाईन दाखल प्रक्रिया सक्तीची केल्यास त्याचा अशा भागातील कामकाजावर विपरीत परीणाम होऊ शकतो.  
आॅनलाईन सेवा सुरू करण्यास पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे या संघटनेचा आक्षेप नाही. परंतु माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील अनिवार्य तरतूदींचे पालन, धमार्दाय अस्थापनेतील सर्व कार्यालयांचे सक्षम संगणकीकरण, प्रशिक्षित कर्मचारी वृंद व किमान संगणक साक्षरता होत नाही तोपर्यंत केवळ शासनाचा आदेश आला म्हणून २७ डिसेंबर २०२२ ला परिपत्रक क्र ६०१ निर्गमित करून दि १ जानेवारी २०२३ पासून मेहणजेच केवळ पाच दिवसात राज्यभर प्रकरणे आॅनलाईन पद्धतीने दाखल करण्याची सक्ती करणे हे पक्षकार व वकिलांवर अन्यायकारक व जाचक आहे. 
वरील सर्व बाबींचा सर्वंकष विचार करता या निवेदनामध्ये नमूद सुचनांचा सकारात्मक विचार  होईपर्यंत तसेच धमार्दाय अस्थापनेतील संगणक विभागातील मूलभूत त्रुटी दूर करेपर्यंत मा. धमार्दाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दि २७/१२/२०२२ रोजी निर्गमित केलेले विषयांकित परिपत्रक क्र. ६०१ मागे घेऊन धमार्दाय कार्यालयामध्ये प्रकरणे अनिवार्यपणे आॅनलाईन दाखल करण्याची सक्ती रद्द करण्यात यावी. 
धमार्दाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दि २७/१२/२०२२ रोजी निर्गमित केलेल विषयांकित परिपत्रक क्र. ६०१ मागे घेऊन धमार्दाय कार्यालयामध्ये प्रकरणे अनिवार्यपणे आॅनलाईन दाखल करण्याची सक्ती रद्द होत नाही तोपर्यंत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे याचे कार्यरत सर्व वकील सह धमार्दाय आयुक्त कार्यालय, पुणे तसेच अधिनस्त उप व सहाय्यक धमार्दाय आयुक्त कार्यालयात कोटवर ‘लाल फीत’ लावून निषेध व्यक्त करतील.
ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. दिलीप हांडे, अ‍ॅड. पराग एरंडे, अ‍ॅड. मोहन फडणीस, अ‍ॅड. रोहिणी पवार, अ‍ॅड. अश्विनी नलावडे व अ‍ॅड. रुपाली कोठे यांनी आॅनलाईन दाखल प्रक्रियेत येणा-या त्रुटींविषयी अनुभव कथन केले. सचिव अ‍ॅड. सुनिल मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

धुक्यासह थंडीची लाट:शिवाजीनगरला ८.६ तर माळीन ला ८.१ तापमान, महाराष्ट्रात गारठा वाढणार

पुणे- महाराष्ट्रासह देशभर थंडी वाढत असून आज सकाळी पुण्यातील वेध शाळेने आपल्या परिसरातील मालीन येथे सर्वाधिक कमी ८.१ एवढे तापमान नोंदविले तर शिवाजीनगर येथे ८. ६एव्धे नोंद झाले , लोणावळ्यात मात्र १७ .३ एवढे तापमान होते , शिरूर ला ९. ७ वडगाव शेरी ला १७.१ मगर पट्टा येथे १५.६ हडपसर १२. ८ पाषाण ८.९ हवेली ८.३ अशा पद्धतीने तापमानाची नोंद झाली

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातदेखील पहाटे धुके, सकाळी थंडी, तर दिवसभर गारठा जाणवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे विदर्भात आज यवतमाळ आणि नागपुरात सर्वात कमी ८. ५ एवढ्या तापमानाची नोंद झाली .तर गोंदियात त्याहून कमी ७ अंश तापमान नोंदविले गेले.

उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील िनम्म्याहून जास्त क्षेत्रात थंडीची लाट आहे. आठवड्यापासून पाकिस्तानच्या पेशावरपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालकडून बांगलादेशपर्यंत सुमारे १० लाख चौरस किलोमीटर भागात जास्त घनतेचे धुके दाटले आहे. दोन हजार किमी लांब दाट धुक्यामुळे देशातील ७० टक्के लोकसंख्येला थंडीचा कडाका जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत झाले. उशिरा रात्रीपासून सकाळी दहापर्यंत २०० मीटरपर्यंतच्या दृश्यमानतेत घट झाली. मैदानी क्षेत्रातील तापमान डाेंगराळ भागाहून कमी आहे. रविवारी राजस्थानच्या चुरू येथे तापमान उणे ०.५ अंश नोंदले गेले.

नवा विक्षोभ, तापमानात वाढ शक्य
हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेली थंडीची लाट १० जानेवारीनंतर आेसरू लागेल. कारण देशातील उत्तरेकडील हिमालयीन भागात मंगळवारी सायंकाळपासून एक नवे पश्चिमी विक्षोभ धडकेल. संपूर्ण उत्तर, मध्य भारतात किमान तापमान ३-४ अंश वाढीची शक्यता आहे.

आणखी दोन दिवस जास्त हुडहुडी
उत्तर, मध्य व पूर्व भारतात आणखी दोन दिवस थंडी जास्त राहील. मागील आठवड्यापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मूमध्ये दाट धुके पसरले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दृश्यमानता केवळ ५० मीटर राहते. दिल्ली, उत्तराखंड, आसामपर्यंत पसरल्याने दृश्यमानता २०० ते ५०० मीटरपर्यंत राहिली आहे.

राजधानी दिल्लीत सर्वाधिक थंडी
2019 4.00c 1 जानेवारी
2020 2.40c 1 जानेवारी
2021 1.10c 1 जानेवारी
2022 4.20c 1 जानेवारी
2023 1.90c 8 जानेवारी

अखेर विधी महाविद्यालय परिसरातील नागरिकांना मिळणार एम.एन.जी.एल चे कनेक्शन

शनिवारी मध्यरात्रीनंतर खोदाई पूर्ण – सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश

पुणे– विधी महाविद्यालयासारख्या वाहत्या रस्त्यावर एम.एन.जी.एल ला खोदाईला आणि विशेषत: रोड क्रॉसिंग खोदाईला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे भक्ती मार्ग, दामले पथ, अशोक पथ, शांतिशीला सोसायटी, कांचन गल्ली, प्रभात रस्ता यासह मोठ्या परिसरात नागरिकांना पैसे भरून देखील गॅस कनेक्शन मिळत नव्हते. माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी याबाबत मनपा अधिकारी, एम.एन.जी.एल अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी व नागरिक अशी संयुक्त पाहणी केली व संपूर्ण शहर खोदले असताना येथे मात्र खोदाईला परवानगी न मिळणे अयोग्य असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जय जोशी, नितीन आपटे,शेखर जोशी यांच्यासह ह्या भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणीत सहभाग नोंदवून नागरिकांची बाजू समर्थपणे मांडली. यानंतर अधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली व कॅनॉल रस्ता तसेच विधी महाविद्यालय रस्ता शुक्रवार, शनिवार मध्यरात्रीनंतर खोदण्याची परवानगी दिली. त्यानुसार काम पूर्ण झाले व ह्या भागातील हजारो नागरिकांचा प्रलंबित प्रश्न सुटला. आमदार सिद्धार्थ शिरोळे,पथ विभागाचे प्रमुख व्ही जी कुलकर्णी,वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर, मनपाचे उपायुक्त राजेंद्र मुठे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे,यांच्या सहकार्याने हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सुटला असल्याचे मंजूश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
वाहतूक पोलीस निरीक्षक बापूसाहेब शिंदे, मनपा पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंता कविता पाटील,एम. एन. जी. एल चे अभियंता शरद शिंदे यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे पहाटे 2 वाजता वाहतुकीस अडथळा न होता हा प्रश्न मार्गी लागला याबद्दल देखील सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.पुढील दोन महिन्यात अंतर्गत रस्ते खोदाई व वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण होईल व नागरिकांना मागणीनुसार घरपोच गॅस मिळेल.सौ. मंजुश्री खर्डेकर,श्री. जय जोशी यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करून काम पूर्णत्वास जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे श्री मंडई म्हसोबा ट्रस्ट दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन

पुणे : आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. आपल्याला आता एकत्रितपणे काम करायचे आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे काम उत्तम आहे. यापुढेही अशाच प्रकारे ट्रस्ट व कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे तर्फे श्री मंडई म्हसोबा ट्रस्ट दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन मुंबईतील मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अ‍ॅड.सुषमा अंधारे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, योगेश निकम, शेखर पवार, हर्षद पोरे, सुधीर साकोरे आणि शशांक गोसावी उपस्थित होते. 
ट्रस्टच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व अहवाल देऊन गौरव करण्यात आला. ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सर्व सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती उद्धव ठाकरे यांनी घेतली. तसेच हे कार्य पुढे असेच सुरु ठेवण्याकरीता मार्गदर्शन देखील केले.

स्काऊट चळवळ ही भिंतीबाहेरची सर्वोत्तम शाळा -लेखिका डॉ.संगीता बर्वे 

श्री शिवाजी कुल संस्थेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कुलरंग महोत्सव उद््घाटन, त्रैमासिक प्रकाशन व उत्कृष्ट कुलवीर पारितोषिक प्रदान
पुणे : खेळाचे शिक्षण हे अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. अभ्यासाप्रमाणे खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. अभ्यासामुळे आपण बुद्धीमान होतो. मात्र, खेळामुळे मानसिक व व्यक्तिमत्व विकास होतो. मैदानावरील खेळाचे शिक्षण हे आयुष्यभर पुरणारे शिक्षण असून हे शिक्षण देणारी स्काऊट चळवळ ही भिंतीबाहेरची सर्वोत्तम शाळा असल्याचे मत प्रख्यात लेखिका डॉ.संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.  
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रसिद्ध चित्रकार राहुल देशपांडे, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम, यश गुजराथी, सानिका काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
महोत्सवात उद््घाटनप्रसंगी संस्थेच्या कुलवार्ता या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कब शार्दुल राजूरकर, उत्कृष्ट बुलबुल जिया सखरानी, उत्कष्ट स्काऊट सक्षम वाईकर, उत्कृष्ट गाईड स्वरा पवार, उत्कष्ट अधिकारी साक्षी वाडकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तब्बल ५० वर्षांपूर्वी कुलमुख्य असलेल्या आणि आजही कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, योगिनी जोगळेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. 
राहुल देशपांडे म्हणाले, पुस्तक वाचन, कविता वाचनासोबत आपण चित्र बघायला देखील शिकले पाहिजे. आपल्या आजूबाजूचे किल्ले, मंदिरे यांना भेट देताना केवळ सहल म्हणून नाही, तर त्यांचा अभ्यास करीत इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्यावरुन स्वत: ती चित्रे रेखाटावी. आपल्या येथे अनेक प्रकारची संग्रहालये देखील आहेत, तो आपला ठेवा असून ती देखील अभ्यासपूर्ण पद्धतीने पहा, असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. धनश्री देवधर, किर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र धायगुडे यांनी आभार मानले.

विज्ञानप्रेमींनी अनुभवली विज्ञानाच्या दुनियेची अनोखी सफर

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ; राज्यस्तरीय चौथ्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे : भूकंप किंवा पूर व्यवस्थापनाचा प्रकल्प… दूषित पाणी शुध्द करणारी यंत्रणा… स्मार्ट सिटी कशी असावी याची प्रतिकृती…उर्जा प्रकल्पाची माहिती घेणारे विद्यार्थी…रसायनांचे रासायनिक प्रक्रियेचे रहस्य अशा विविध मॉडेल्समधून विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या दुनियेची अनोखी सफर अनुभविली. नवनवीन विज्ञान प्रयोगांची माहिती देखील उपस्थितांनी अगदी उत्सुकतेने घेतली.
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘चौथ्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले. यावेळी आयआयटीएमचे प्रकल्प संचालक डॉ.बी.एस.मूर्ती, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात २०० हून अधिक प्रकल्पांचा समावेश होता. ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावी, अकरावी ते बारावी आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात घेण्यात आली. 
सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इटस् इफेक्ट अ‍ँड रेमिडीज, ह्युमन बायोलॉजी अ‍ँड गेल्थ, आॅटोमेशन इन अ‍ॅग्रीकल्चर, क्लिन अ‍ँड ग्रीन इन्व्हार्नमेंट, क्लायमेट क्रायसिस अ‍ँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण केले. 
डॉ.बी.एस.मूर्ती म्हणाले, पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. तापमानवाढ आणि हवामानातील बदल यांचे अनेक परिणाम सध्या होत आहेत. मानवाची राहण्याची पद्धती व त्यामधील अमूलाग्र बदल हे देखील संतुलन बिघाडाचे एक कारण आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर असून हे टाळण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवेत. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जावा, याकरीता या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थीमधील विज्ञानबद्लचे कुतूहल निर्माण होते, त्यामुळे त्यांच्यातील संशोधन वृत्तीस देखील चालना मिळते. विद्यार्थीदशेतच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरीता असे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे.

विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे-राज ठाकरे

पुणे-राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली.
  जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
    संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी आयोजित या परिसंवादामध्ये राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी खच्चून भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये युवक-युवतींसह साहित्यप्रेमी रसिकांनी गर्दी केली होती.
  व्यंगचित्रकाराला एखादी व्यक्ती मग ती राजकारणातील असो किंवा बाहेरची. त्याच क्षणी त्यांचा हात व डोक्यातील ब्रश घंटीसारखा वाजतो. सध्याच्या राजकारण्यांना बघून मंदिरातला घंटा एकाचवेळी वाजण्यात अशी स्थिती असल्याचे भाष्य ठाकरे यांनी यावेळी केले.
  चित्रकला, व्यंगचित्रकला, या प्रश्नांवरून सुरु झालेल्या प्रश्नांचा प्रवास राजकीय विषय तसेच मधल्या काळातील राजकारणात घडलेल्या घटना, घडामोडींना स्पर्श करीत अनेक विषयांवरची आपली मते बेधडकपणे राज ठाकरे यांनी व्यक्त करत आपल्यामधील कलाकार व राजकारणी यामधील विविध रूपांचे दर्शन घडविले.
   डेव्हिड लो हे इंग्लंडमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार  हे माझे सुरुवातीपासून आदर्श होते. त्यानंतर आर. के. लक्ष्मण यांचा मी चाहता झालो. परंतु, मधल्या काळात वृत्तपत्रात व्यंगचित्राची जागा पहिल्या पानाऐवजी आतमध्ये येऊ लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करत मुद्रित माध्यमात छापून येणाऱ्या चित्राशिवाय समाधान लाभत नसल्याचे म्हटले. सध्याच्या सोशल मीडियावर देखील त्यांनी आपल्या शब्दांचे फटकारे ओढले. सोशल मिडियामध्ये कोणीही येऊन काहीही व्यक्त होण्याच्या या पद्धतीवर खरं  पाहता व्यक्त होण्यासाठी पैसे आकारायला हवे. तीच परिस्थिती चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनेलची आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक बाबींचे दर्शन घडत नाही तोपर्यंत काहीही ठीक नाही. राजकारण्यांची व्यर्थ बडबड या चॅनेलवाल्यांनी दाखवून सामाजिक प्रतिमा बिघडवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
   सद्यस्थितीमध्ये वातावरणातला शांतपणा निघून गेला असून आयुष्याच्या वेगाने जीवनाची माती केली आहे. १९९५ नंतर, मोबाईल चॅनेल, इंटरनेटचे युग आल्यानंतर तर शहरांची वाताहत झाली आहे.  विकास जो होतोच तो लोकसंख्येमुळे शहरात वाढणाऱ्या बेसूमार गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी होतोच ही खरी खंत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील एकदोन उद्योग गेले म्हणून बोंब मारण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने आता चांगल्या योजनांमध्ये लक्ष घालावे. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांचे सर्वच राज्यांकडे समान लक्ष हवे, जी काही योजना व प्रकल्प करायचे असेल ते आपल्याच राज्यात हवे ही भूमिका पंतप्रधानांना शोभत नाही. पंतप्रधानांनी काही चांगल्या गोष्टी ज्यामध्ये ३७० कलम, रामजन्मभूमी, आदी प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, अशी टिप्पणी ठाकरे यांनी यावेळी केली.
  राज्यकर्त्यांची व्याख्या स्पष्ट करताना त्यांनी, येथे काम करणाऱ्यांचा स्वभाव हा मोकळा-ढाकळा असायला हवा. तो व्यापारी नसावा तर मोठ्या मनाचा असावा. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणूनच पवार व ठाकरे या दोन नावांनी राज्यावर अद्यापही आपला प्रभाव टिकवून ठेवला असल्याचे ठाकरेंनी म्हटले. सुमारे दिड तास रंगलेला हा परिसंवाद तरुणाईला आनंद व ऊर्जा देणारा ठरला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे विश्वस्थ व खजिनदार यशराज पाटील यांनी राज ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार केला.