मुंबई, जानेवारी ०९, २०२३: लार्सन अँड टुब्रो च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाही मध्ये महत्त्वाचे असे एकाहून अधिक कंत्राट मिळविले आहेत.
एल अँड टी च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने परदेशी बाजारपेठेत मेक्सिको मधील एका रिफायनरीच्या सर्वात वजनदार अणूभट्टयांपैकी एकासाठी स्क्रू प्लग हीट एक्सचेंजर्स साठी कंत्राट मिळविले आहे. हे कंत्राट लार्सन अँड टुब्रोच्या जड अभियांत्रिकी व्यवसायाची वचनबद्धता आणि विश्वासार्हता यावर ग्राहकांचा असलेला विश्वास दर्शविते. त्यांनी यू एस् ए आणि उझ्बेकिस्तान मधील ब्ल्यू अमोनिया प्रकल्पांसाठी महत्त्वाच्या व जटिल अणूभट्टया आणि जहाजे पुरविण्यासाठी देखील कंत्राट मिळविले आहे. याशिवाय यूरोपियन ग्राहकांकडून प्रक्रिया प्लांट उपकरणांसाठी धोरणात्मक ऑर्डर सुद्धा मिळविली आहे. ही सर्व कंत्राटे विश्वसनीय कामगिरीच्या बळावर तीव्र आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या विरुद्ध एल अँड टी ने जिंकल्या आहेत.
देशांतर्गत आघाडीवर, एल अँड टी च्या जड अभियांत्रिकी व्यवसायाने आयओसीएल (IOCL) च्या पानिपत रिफायनरी P२५ विस्तार प्रकल्पासाठी जटिल Mo-V स्टील सामुग्री सह महत्वाच्या जटिल अवशेष अद्ययावत अणूभट्टया (क्रिटिकल रेसिडयू अपग्रॅडिंग रिअॅक्टर्स) तयार करण्यासाठी आणि उच्च दाब स्क्रू प्लग हीट एक्सचेंजर्स ची रचना आणि निर्मिती करण्यासाठी कंत्राट मिळविले आहे. उच्च तंत्रज्ञान उपकरणांच्या निर्मितीसाठीचे हे आदेश भारत सरकारच्या ‘ ‘मेक इन् इंडिया’/ ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांमध्ये एल अँड टी सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे हेच दर्शविते.
याशिवाय, एल अँड टी जा अभियांत्रिकी च्या मॉडिफिकेशन, रिव्हॅम्प आणि अपग्रेड (MRU) व्यवसाय विभागाला इ पी सी आधारावर (इंजीनीरिंग, प्रॉक्यूरमेंट आणि कन्स्ट्रकशन) रेआ प्लांट (rea plant) मध्ये सुधारणा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या सुधारणेचे उद्दिष्ट एका ५० वर्षाहून अधिक जुन्या प्लांट ची विश्वासार्हता, सुरक्षितता आणि क्षमता वाढविणे आणि भारत सरकारच्या निर्धारित मानदंडांची पूर्तता करण्यासाठी त्याची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे हे आहे.
या व्यतिरिक्त, एक नामांकित खत उत्पादकाकडून एल अँड टी जा अभियांत्रिकी व्यवसायाने स्टीम सुपर हीटर कॉईलस् बनवून ते बसविण्याचे कंत्राट देखील मिळविले आहे.