पुणे- महाराष्ट्रासह देशभर थंडी वाढत असून आज सकाळी पुण्यातील वेध शाळेने आपल्या परिसरातील मालीन येथे सर्वाधिक कमी ८.१ एवढे तापमान नोंदविले तर शिवाजीनगर येथे ८. ६एव्धे नोंद झाले , लोणावळ्यात मात्र १७ .३ एवढे तापमान होते , शिरूर ला ९. ७ वडगाव शेरी ला १७.१ मगर पट्टा येथे १५.६ हडपसर १२. ८ पाषाण ८.९ हवेली ८.३ अशा पद्धतीने तापमानाची नोंद झाली


मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातदेखील पहाटे धुके, सकाळी थंडी, तर दिवसभर गारठा जाणवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे विदर्भात आज यवतमाळ आणि नागपुरात सर्वात कमी ८. ५ एवढ्या तापमानाची नोंद झाली .तर गोंदियात त्याहून कमी ७ अंश तापमान नोंदविले गेले.

उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील िनम्म्याहून जास्त क्षेत्रात थंडीची लाट आहे. आठवड्यापासून पाकिस्तानच्या पेशावरपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालकडून बांगलादेशपर्यंत सुमारे १० लाख चौरस किलोमीटर भागात जास्त घनतेचे धुके दाटले आहे. दोन हजार किमी लांब दाट धुक्यामुळे देशातील ७० टक्के लोकसंख्येला थंडीचा कडाका जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत झाले. उशिरा रात्रीपासून सकाळी दहापर्यंत २०० मीटरपर्यंतच्या दृश्यमानतेत घट झाली. मैदानी क्षेत्रातील तापमान डाेंगराळ भागाहून कमी आहे. रविवारी राजस्थानच्या चुरू येथे तापमान उणे ०.५ अंश नोंदले गेले.
नवा विक्षोभ, तापमानात वाढ शक्य
हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेली थंडीची लाट १० जानेवारीनंतर आेसरू लागेल. कारण देशातील उत्तरेकडील हिमालयीन भागात मंगळवारी सायंकाळपासून एक नवे पश्चिमी विक्षोभ धडकेल. संपूर्ण उत्तर, मध्य भारतात किमान तापमान ३-४ अंश वाढीची शक्यता आहे.
आणखी दोन दिवस जास्त हुडहुडी
उत्तर, मध्य व पूर्व भारतात आणखी दोन दिवस थंडी जास्त राहील. मागील आठवड्यापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मूमध्ये दाट धुके पसरले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दृश्यमानता केवळ ५० मीटर राहते. दिल्ली, उत्तराखंड, आसामपर्यंत पसरल्याने दृश्यमानता २०० ते ५०० मीटरपर्यंत राहिली आहे.
राजधानी दिल्लीत सर्वाधिक थंडी
2019 4.00c 1 जानेवारी
2020 2.40c 1 जानेवारी
2021 1.10c 1 जानेवारी
2022 4.20c 1 जानेवारी
2023 1.90c 8 जानेवारी