पुणे : आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. आपल्याला आता एकत्रितपणे काम करायचे आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे काम उत्तम आहे. यापुढेही अशाच प्रकारे ट्रस्ट व कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे तर्फे श्री मंडई म्हसोबा ट्रस्ट दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन मुंबईतील मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अॅड.सुषमा अंधारे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, योगेश निकम, शेखर पवार, हर्षद पोरे, सुधीर साकोरे आणि शशांक गोसावी उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व अहवाल देऊन गौरव करण्यात आला. ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सर्व सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती उद्धव ठाकरे यांनी घेतली. तसेच हे कार्य पुढे असेच सुरु ठेवण्याकरीता मार्गदर्शन देखील केले.